लोहचुंबकाच्या ध्रुवांमध्ये तांब्याच्या
तारेची हालचाल केली असता वीज तयार होते - हे जेंव्हा आपल्या एका व्याख्यानाच्या
प्रसंगी मायकल फॅरडेने दाखवून दिले तेंव्हा त्याला एक शंकेखोर ठोंब्या भेटलाच. भाषण
संपल्या संपल्या रीतसर हात वर करून त्याने फॅरडेला विचारले,
"हे ठीक
आहे हो! पण याचा उपयोग काय?"
फॅरडेला संशोधन
करताना हा प्रश्न पडला असेल का?
आता
गुरुत्वाकर्षण लहरींबाबत संशोधन करणारे शास्त्रज्ञ असा विचार करीत असतील का?
अशा अनपेक्षित
प्रश्नांना जी उस्फूर्त उत्तरे मिळतात ती त्या व्यक्तीबद्दल, तिच्या कामाबद्दल, निष्ठांबद्दल सृजनशीलतेबद्दल खूप काही सांगून जातात.
उदा. महात्मा
गांधींच्या आयुष्यातला एक प्रसंग. लोकमान्यांचे निधन झालेले आहे. मुंबईत असणारे
गांधी तेथे पोहोचतात. अंत्ययात्रेची वेळ येते. लोकमान्यांना खांदा द्यायला गांधीजी
पुढे येतात आणि लोकमान्यांचा एक सनातनी अनुयायी त्यांना सांगतो - "तुम्ही
वैश्य! ब्राह्मणाला खांदा द्यायचा तुम्हाला अधिकार नाही."
अनुल्लघनीय
अडथळा! पण त्या क्षणी गांधीजींनी तो सहज पार केला. ते उत्तरले "समाजसेवकाला
जात नसते."
अशी उत्तरे कशी
स्फुरतात?
शॉच्या भाबड्या
जोन ऑफ आर्कने याचे फार सुंदर उत्तर दिले आहे. तिच्या परगण्याचा देशमुख तिला सांगत
असतो कि - "अग पोरी तुझ्या कानात कुजबुजणारे आवाज म्हणजे सगळा कल्पनेचा खेळ
आहे!"
यावर जोन म्हणते
"अगदी
बरोबर! आपल्याशी बोलण्याची परमेश्वराची तीच तर पद्धत नाही का? आपल्या कल्पनाशक्तीमधून तर परमेश्वर आपल्याशी बोलतो!"
फॅरडेने त्या ठोंब्याला दिलेले उत्तर त्याच कोटीतले! फॅरडे म्हणाला "नवजात बालकाचा काय उपयोग असतो?"
त्याचे उत्तर किती भविष्यदर्शी ठरावे? या बाळाशिवाय मानवी जीवनाची आपण कल्पना तरी करू शकतो का?
हा जादूच्या दिव्यातला राक्षसच ठरला आहे. आपले कोठलेही काम असो. आपण ते याच्या मदतीने पार पाडतो.

एक तारेतून येणारा प्रवाह! तो उजेड
देतो. तो टोस्ट भाजतो. पाणी गरम करतो. संगीत ऐकवतो. चित्रपट दाखवितो आणि कसली कसली
माहिती देखील शोधून देतो.
विजेचा प्रवाह
हा एक उर्जा स्त्रोत आहे. पण इतर उर्जांपेक्षा किती चतुरस्त्र! या स्त्रोताचा अजून
एक विशेष गुण आहे. प्रकाश किंवा उष्णतेप्रमाणे तो विखरून जात नाही. त्याचा प्रवास आखलेल्या
मार्गानेच होतो. त्या मार्गाला आपण मंडल (circuit) म्हणतो. अशा न विखरणा-या स्त्रोताला कमी एंट्रोपी असणारा स्त्रोत असे
संबोधतात. आणि विखरत जाणार्या उर्जा प्रकारांना जास्त एंट्रोपी असणारे स्त्रोत म्हणतात.
कमी एंट्रोपी उर्जा आपल्या फार कामाला येते.
पण विखरत जाणे
हा नैसर्गिक उर्जास्त्रोतांचा धर्म आहे. विखरत जाणा-या उर्जेपासून न विखरणारी
उर्जा मिळविता येते खरी पण या उलट प्रवासाची किंमत मोजावी लागते. विखरणारी उर्जा जास्त खर्च करून कमी न विखरणारी
उर्जा मिळवावी लागते.
वीज आणि चलन यात
साम्य आहे.
पूर्वी वस्तूंचा
विनिमय व्हायचा. पण चलन ही कल्पना आल्यावर विनिमय सोपा झाला, सोयीचा झाला.
कोणत्याही उर्जा
प्रकाराचे विजेत रूपांतर करता येते आणि ही वीज हव्या त्या स्वरूपात हवी तिथे उर्जा उपलब्ध
करून देऊ शकते. पण चलन अस्तित्वात आल्यावर चलनाचे व्यवस्थापन करणारांचा वाटा त्यांना
देणे भाग पडते तसेच विजेचे आहे.
विजेच्या
निर्मितीपासून वहनापासून तिची रूपे जिथे जिथे बदलतात तिथे तिथे त्याची किंमत मोजावी लागते.
कोळसा जाळून जी
ऊष्णता उपलब्ध होते त्यामधील 40% ऊर्जाच वीज रूपाने उपलब्ध होते. ती वीज वाहून नेली कि त्यात काही वीज
खर्च होते. दाब वाढविला किंवा कमी केला तरी वीज खर्च
होते. एसीचे डीसी केले कि वीज खर्च. कोणतेही रूपांतर केले कि वीज खर्च होते. हा
खर्च लक्षात घेता सर्व काही वीजमार्गे साधायचा प्रयत्न करणे खर्चिक ठरते. अनुभव
असा आहे कि निरनिराळ्या कारणांमुळे 1 युनिट वीज वापरायची
असेल तर 1.5 यूनिट्स तयार करावी लागतात.
पूर्वी पाणचक्की
किंवा पवनचक्कीवर वीज तयार न करता त्यावर पिठाची चक्की चालवत किंवा पाणी उपसणारे पंप चालवत. ते नक्कीच जास्त
शहाणपणाचे होते. तिथे वीज निर्माण करून त्यावर पिठाची चक्की चालवली तर कमी ऊर्जा उपलब्ध होईल. रेल्वेचे विजेचे इंजिन घ्या. शताब्दीसारख्या
गाडीचे इंजिनाला 4000 किवॉ वीज आवश्यक असते. कोळसा जाळून वीज तयार करायची वाहून आणायची त्यात दाब कमी-जास्त
करायचे यात कितीतरी उर्जा खर्च होते. वाफेच्या इंजिनात रूपांतरे कमी असतात. कदाचित
कोळसा आणि पाणी यांचा दर कि मी मागे खर्च कमी होत असेल.
सोलापूर जवळील
अंकोली या गावी अरुण आणि सुमंगल देशपांडे यांनी विज्ञानग्राम उभे केले आहे. त्या
ठिकाणी जो विज्ञानसंवाद चालतो त्यात ऊर्जा साक्षरता हा एक विषय आहे. तिथे आपल्याला
काही प्रात्यक्षिके करावी लागतात. करवतीने लाकूड कापणे किंवा एखादा मग भरून पाणी
आपल्या डोक्याएवढे उंचीवर चढविणे ही कामे स्थिर सायकल मारून वीज तयार करून त्या विजेवर
चालणार्या यंत्राद्वारे करून बघावी लागतात. आपण आपली शक्ती वापरून जेंव्हा हे
करून बघतो तेंव्हा वीजेच्या वाटेने
नेणारा हा मार्ग किती खडतर आहे याचे आपल्याला ज्ञान होते.
एका अत्यंत कमी
वजनाच्या तरंगीला (ग्लायडरला) प्रणोदक (प्रॉपेलर) बसवून फक्त मानवी शक्ती वापरून
इंग्लिश खाडी ओलांडली गेली आहे. असे काम एक अत्यंत तगडा सायकलपटूच करू शकला. पण
अशाच एका अत्यंत तगड्या सायकलपटूला सायकलवर वीज तयार करून त्या विजेवर टोस्ट काही
भाजून दाखविता आला नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे.
वीज हे फॅरडेचे बाळ आहे हे शंभर टक्के खरे
आहे. आज आपण जो विद्युतप्रवाह वापरतो तो फॅरडेच्याच
पद्धतीने निर्माण केलेला असतो. बॅटरीमधून मिळणाऱ्या प्रवाहाला व्होल्टाचे बाळ म्हणावे लागेल. फॅरडेच्या
पद्धतीमध्ये गतिजन्य उर्जेचे रूपांतर विद्युतप्रवाहात केलेले असते. गती असेपर्यंत वीजनिर्मिती सुरूच रहाते
मग त्यापासून काम करून घ्या अथवा घेऊ नका. दुस-या शब्दात सांगायचे म्हणजे वीज वाचवता येत नाही.
कोणी वापरला नाही तरी आपल्या मंडलामधून हा प्रवाह वहाणारच.

विद्युतप्रवाह निर्माण करणारी विविध उर्जा
स्त्रोत वापरणारी केंद्रे असतात. त्यामधील कोळशावर आधारित
औष्णिक केंद्रात विद्युत पुरवठा कमी जास्त करायला जास्त वेळ लागतो. पूर्ण बंद करताच येत नाही. मागणी
घटली तरी कोळसा जाळणाऱ्या बाष्पित्रावर (बॉयलरवर) आधारलेल्या औष्णिक वीज केंद्राचे किमान पातळीवरील उत्पादन सुरूच रहाते. रात्रीच्या वेळी वीज वापरल्यास सवलतीने वीजपुरवठा करण्याचे आश्वासन राज्याच्या उर्जामंत्र्यांनी दिलेले सर्वांना आठवत असेलच. त्यामागे या वाया जाणाऱ्या विजेचा उपयोग व्हावा हाच हेतू असणार आहे. वायुचक्कीवर (गॅस टर्बाइन वर) आधारलेली वीजनिर्मिती जास्त लवचिक असते. चालू करणे अथवा बंद करणे अल्प वेळात करता येते. पण याबाबत जलविद्युत सर्वात लवचिक !

आपण आपल्या घरामधील वापर कमी केला तर
विद्युत निर्मिती केंद्राला ते समजून विद्युत निर्मिती कमी होत नाही कारण एकूण
मागणीत त्यासाठी काहीतरी किमान घट व्हावी लागते. तरच मागणी कमी झाल्याची नोंद (जाणीव)
होऊ शकते. वीज वाचविणे व्यक्तिच्या हातात नाही. ते सामुहिक रित्याच होऊ शकते.
निसर्गात विजेचा असा वाहत राहणारा प्रवाह नसतोच. वीज असते पण वाहत राहणारा प्रवाह नसतो. ढगांवर साचलेला विद्युतभार जमिनीकडे झेपावतो पण ही घटना काही क्षणांचीच असते. सजीवांच्या शरीरात माहितीचे दळणवळण या विद्युतभाराच्या सहाय्याने घडते. पण सतत वाहणारा विद्युतकणांचा प्रवाह ही मात्र माणसाची निर्मिती आहे. ही गोष्ट नैसर्गिक नाही म्हणूनच ती घडवून आणण्यासाठी किंमत मोजावी लागते आणि ती किंमत एवढी मोठी होते की या फॅरडाच्या बाळाला कळकीचे बाळ असे म्हणायची वेळ येते.

कळकीचे बाळ हे रत्नाकर मतकरी यांच्या एका
गोष्टीचे नाव आहे. गोष्टीचा सारांश असा - कळकी नावाच्या एका स्त्रीला मोठ्या नवसा-सायासांनी
मुलगा होतो खरा पण तो दिसायला विद्रूप भीतिदायक असा असतो. जवळपासचे लोक कळकीला या
अवलक्षणी बाळाला जंगलात सोडून द्यायचा सल्ला देतात पण कळकीला तो सल्ला काही मानवत
नाही. ती या बाळाला संभाळत रहाते. पाजत रहाते. हे बाळ मोठ्या वेगाने वाढीस लागते. त्याची
भूक फार मोठी असते. त्याला आईचे दूध पुरेनासे होते ते दुधाऐवजी आईचे रक्त ओढायला
लागते. या बाळाला कळकीचे बाळ म्हणावे अशी वेळ खरोखर आली आहे का? मला वाटते कि त्या दिशेने आपली वाटचाल वेगाने सुरू आहे.
असे मी का म्हणतो आहे - ते आता सांगतो.
वीज तयार करण्यासाठी पाणी खर्च होते याचे
बहुधा आपल्याला भानच नसते. वीज म्हंटले कि आपल्याला आठवते कोयना! जलविद्युतमध्ये
पाणी खर्च ते काय होणार?
आपले काम करून ते जलविद्युत केंद्राच्या बाहेर पडते. हे खरे आहे. पण जलविद्युतमध्ये
पाणी खर्च होऊ शकते. कसे ते पुढे ओघात येईल.
काही जणांना औष्णिक वीज आठवेल आणि आपण असा
विचार करू कि वायुचक्की (टर्बाइन) फिरवायला वाफ तयार करावी लागणार खरी पण तेच पाणी
पुनःपुन्हा वापरता येत असणार. खर्च म्हणावा असा काही फार असणार नाही. साधारण तीन
वर्षांपूर्वीपर्यंत माझा समज असाच होता. पण काही वर्षांपासून अधूनमधून उन्हाळ्यात पाण्याअभावी
परळीची वीजनिर्मिती बंद. चंद्रपूरचे काही संच पाण्याअभावी बंद अशा बातम्या वाचून
औष्णिक वीजनिर्मितीला पाणी लागते तरी किती? असे कुतुहल जागृत झाले. प्रयास या वीजविषयक प्रश्नांचा अभ्यास करणा-या
संस्थेच्या काही प्रकाशनांमधून मला याबाबत प्रथम निश्चित माहिती मिळाली.
उष्णता ही शक्ती वापरून वीज तयार केली तर
त्याला औष्णिक वीज म्हणतात.
यामध्ये कोळसा जाळून वीज करता येते तसेच
वायू जाळून! कोळसा जाळून वीज केली जाते तिथे पाण्याची वाफ करून त्यावर जनित्र
फिरवले जाते. वायुचक्की (गैस टर्बाइन)मध्ये मात्र पाणी लागत नाही. पण एकूण वीज
उत्पादनात कोळश्यावर आधारित वीज सर्वात महत्वाची.
तर या कोळश्यावर आधारित विजेला पाणी किती
लागते?
भारतामाधील सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍथॉरिटीच्या
अनुभवानुसार त्याचे उत्तर आहे दर 100
मेवॉ साठी दर वर्षाला 3.92 दशलक्ष घनमीटर. दर
मेवॉ साठी दर तासासाठी हा आकडा येतो 4475 लि. महाराष्ट्र राज्यात आजमितीस एकूण 40589 मेवॉ
एवढी क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी कोळशावर आधारित क्षमता आहे 26478
मेवॉ. यावरून आपण आपल्या राज्यात औष्णिक विजेसाठी पाणी किती खर्च
होते हे सहज समजू शकतो. हा आकडा येतो 1038 द ल घनमीटर. म्हणजे
35 टिएमसी.
याचा अर्थ राज्यातले कोळशावर आधारलेले विद्युत प्रकल्प वर्षभर पूर्ण क्षमतेने चालले तर एवढे पाणी खर्च होईल. वरील आकडा ही एक माहिती झाली. हे पाणी किती आहे हे स्पष्ट होण्यासाठी आपण अजून एक आकडेमोड करू. शहरी भागात माणसाची पाण्याची गरज दररोज दरडोई 135 लि आहे हे आपल्या देशातले मानक आहे. 1038 दलघनमीटर पाणी किती लोकांची एक वर्षाची गरज भागवेल? उत्तर आहे 2,10,64,180.
आता आपण मोठमोठ्या आकड्यांच्या जंजाळात शिरतो आहोत तर या आकड्यांशी थोडी जानपहचान करून घेऊ. mcm हे मेट्रिक पद्धतीतले माप पाण्याच्या बाबतीत वापरले जाते. mcm= दशलक्ष घनमीटर. एक घनमीटर म्हणजे 1000 लि. याचा अर्थ एक mcm = 1,00,00,00,000 लि. = एक अब्ज लि.
पाण्याच्या बाबतीतले जुने माप आहे tmc. त्याचा अर्थ हजार दशलक्ष घनफूट. म्हणजेच एक अब्ज घनफूट. एक
घनफूटात 29 लि बसतात. म्हणजे एक tmc म्हणजे
29 अब्ज लि.
मी पाण्याचा खर्च असा शब्दप्रयोग करतो आहे
त्याचा खुलासा करणे आवश्यक आहे. पाणी आपल्याला वापरता येण्याजोगे न रहाणे म्हणजे
खर्च होणे. औष्णिक वीज केंद्रात पाण्याचा काही भाग वाफ होऊन जातो. पण कोळशाची राख
साठविण्यासाठी देखिल पाणी लागते. 630 मेवॉ क्षमता असणा-या केंद्राला तासाला 300 टन कोळसा
लागतो आणि दर मेवॉ क्षमतेमागे दिवसाला 4 ते 5 टन राख रोज तयार होते. ही राख सुरक्षितपणे साठविण्यासाठी दर मेवॉ तासाला 1300
लि पाणी लागते. हे पाणी दुसऱ्या काही कामासाठी वापरता येत नाही म्हणजे
खर्च झाले असेच म्हणावे लागते. कोळश्यामध्ये नको त्या अज्वलनशील गोष्टींची भेसळ
असते. कोळसा वापरण्याआधी धुवावा लागतो आणि त्यासाठी पाणी खर्च होते.
जलविद्युत निर्मितीमध्ये पाणी खर्च होऊ
शकते असे मी यापूर्वी नमूद केले आहे.
ते कसे? हे आता पाहू.
सध्या भारत पाकिस्तानमध्ये जम्मू कश्मीर राज्यामधील चिनाब या नदीवरील प्रस्तावित जलविद्युत योजनेवरून वाद चालू आहे. हा काय वाद आहे? या दोन देशांत नदी पाणीवाटप करार गेली 60 वर्षे अस्तित्वात आहे. यानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या उत्तरेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानला आणि रावी, सतलज, बियास या नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे. भारत चिनाब नदीवर धरण बांधून त्यावर जलविद्युत निर्मिती करू इच्छितो. याला पाकिस्तानचा आक्षेप आहे कारण चिनाब त्यांच्या वाट्यात आली.
यावर भारताची बाजू अशी कि आम्ही वीजनिर्मिती करून पाणी परत चिनाब नदीपात्रात सोडणार असल्याने पाकिस्तानचे वापराचे पाण्यात कपात होत नाही. या ठिकाणी वीज निर्मिती केल्यावर अवजल पुढे वापरता येते. म्हणजे या वापराला खर्च म्हणता येणार नाही. टेहरी योजना अशीच आहे. वीज तयार होते आणि पाणी वापरता येते. म्हणजे पाण्याचा खर्च होत नाही. पण चीन प्रस्तावित ब्रह्मपुत्र नदावरील योजनेबाबत असे म्हणता येईल का? चीनने तिबेटात धरण बांधून जलविद्युत तयार करून पाणी नदीत परत सोडून दिले तर वादाचे खरेतर कारण नाही. पण हे पाणी त्यांनी चीनकडे वळविले तर नदीचे पाणी कमी होणार हे उघड आहे. या ठिकाणी पाणी भारत आणि बांगला देश यांचे दृष्टीने खर्च झाले. त्यामुळे भारत आणि बांगला देश यांनी या पाणी वळविण्यास विरोध करणे रास्त ठरते.

आपल्याकडे भीमा खोऱ्यामधून असे पाणी
वळविले गेले याला आता 90 वर्षे लोटली आहेत. हे पाणी वळवून टाटा पॉवर कंपनी 450 मेवॉ जलविद्युत तयार करते. अवजलाचे पुढे काय होते? तर
कोकणामधील रायगड, ठाणे या जिल्ह्यामधील काही उद्योग यामधील
काही पाण्याचा उपयोग करतात पण बरं बहुतांश पाणी तसेच समुद्रात जाते. हे पाणी किती
आहे? DNA या वृत्तपत्रात टाटा पॉवर
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 54 टिएमसी पाणी कोकणात
वळविण्याचा अधिकार आहे आणि पुढे यामधील बहुतांश पाण्याचा वापर होत नाही. या ठिकाणी
हे देखिल लक्षात घेतले पाहिजे कि ठाणे रायगड हे 200 सेंमी
पावसाचे प्रदेश आहेत. पावसाचे पाणी साठवून तेथील गरजा भागविल्या जाऊ शकतात.
कोयना योजना 1960 मध्ये पूर्ण झाली वीजनिर्मितीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर
तेथे 1950 मेवॉ वीज तयार होऊ शकते. त्यासाठी पाणी किती
वळविले जाते? 67 टिएमसी! राज्याचे
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी हे 67 टिएमसी पाणी
वाया जात असल्याने हे पाणी आम्ही मुंबईला नेऊ असे विधान केल्याचे वृत्त आठवणीत
असेलच. तेंव्हा कोयनेचे 67 टिएमसी पाणी नक्की वाया जाते
म्हणजे खर्च होते. उद्योजक आणि वृत्तपत्र व्यावसायिक श्री प्रतापराव पवार यांचा या
विषयावर एक लेख दै. सकाळमध्ये वाचायला मिळाला. ते म्हणतात कि कोयना अवजलापैकी 15
टिएमसी पाणी चिपळूण परिसरामधील उद्योग वापरतात. उरलेले पाणी वाया
जाऊ नये यासाठी त्या पाण्याचा वापर बाटलीबंद पाणी,शीतपेये
आणि डिस्टिलरी उद्योगासाठी करावा अशी त्यांची सूचना आहे. आधी वर्षानुवर्षै पाणी
वाया घालवायचे आणि तिकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले कि
त्याचे उपयोग शोधायचे असे चालले आहे.
या दोनही योजनांसाठी वळविले गेलेले पाणी नैसर्गिकदृष्ट्या पूर्वेकडे वहाणारे होते. म.प्र. पासून तमिळनाडूपर्यंत भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यातून जो अवर्षणप्रवण प्रदेश पसरलेला आहे त्यामधून हे पाणी वहात होते. या मधील काही प्रदेशाला या पाण्याचा उपयोग होऊ शकला असता. वीज तयार झाल्यावर हे अवजल कोकणामधून वहाते. तिथे त्याची गरज नाही. यामधील बहुतांश पाणी समुद्राला सोडून दिले जाते. म्हणजे हे पाणी खर्च झाले असेच म्हणावे लागते. कोकणात या पाण्याचा उपयोग होवो अथवा न होवो देशभागाच्या दृष्टीने हे पाणी खर्चच होते. 67+54=121 टिएमसी एवढे हे पाणी आहे. (तुलनेसाठी) पुण्यासारखे सढळपणे पाणी वापरणारे 50 लाखांहून जास्त वस्ती असणारे शहर वर्षाला 16 टिएमसी पाणी वापरते.

एवढे पाणी वापरून वीज तयार किती होते? तर 2400 मेवॉ! राज्याच्या आताच्या
औष्णिक विजेच्या 10% देखिल नाही. आकडेमोड करून बघा. एवढ्या
पाण्यात साधारणपणे 1लाख मेवॉ औष्णिक वीज तयार होऊ शकते आणि
राज्याची आताची एकूण निर्मिती क्षमता आहे 40000 मेवॉ. ही वीज तयार करण्यासाठी एकूण 156 टिएमसी
(35+121) पाणी खर्च होते आहे असे म्हणावे लागते.
पण हे इथेच संपलेले नाही.
प्रयास या वीजविषयक प्रश्नांचा अभ्यास
करणा-या संस्थेने विभागीय अनुशेषाचा अभ्यास करणा-या केळकर समितीला जून 2012 मध्ये एक अभ्यास सादर केला आहे. त्यामधील माहिती विचारात
घेतली पाहिजे. ही माहिती पुढीलप्रमाणे –
2011 मध्ये राज्यात 18171 औष्णिक क्षमता
स्थापित झालेली होती. यामध्ये विदर्भात 41195 मेवॉ आणि कोकणात
30978 मेवॉ अशी औष्णिक क्षमता स्थापित करण्याचे प्रस्ताव
मंजूर झाले होते. पैकी कोकणातल्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करता येईल कारण
समुद्राचे पाणी शुद्ध करून औष्णिक वीज तयार करण्यासाठी वापरता येते. आणि दुसरे
म्हणजे कोकणात पाऊस एवढा पडतो आणि समुद्राला जाऊन मिळतो कि त्यामुळे राज्यामधील
गोड्या पाण्याच्या पुरवठ्यावर ताण पडणार नाही. पण विदर्भात जर खरोखर 41000 मेवॉ क्षमता प्रस्थापित झाली तर विदर्भातले पाणी किती खर्च होईल?
1600दल घनमीटर अथवा 55 टिएमसी म्हणजे कोकणाव्यतिरिक्त राज्यामधील 210 टिएमसी पाणी
वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल. या ठिकाणी हे नमूद केले पाहिजे कि राज्यामधील
नद्यांमधून जे पाणी वहाते त्यामधील निम्म्याहून अधिक पाणी कोकणामधील नद्यांमधून
वहाते.
2012 पर्यंत विदर्भात 10 लाख हेक्टर एवढी
सिंचनक्षमता निर्माण झाली होती आणि प्रत्यक्षात केवळ 3 लाख हेक्टर
जमिनीला पाणी मिळत होते. कारण? पाणी वीज आणि उद्योगांकडे
वळविले गेले. आता अजून 1600 दल घनमीटर पाणी वीज उत्पादनासाठी
वापरले गेले तर शेतीसाठी पाणी शिल्लक राहील का? नद्यांमधून
वहाणारे, धरणांत जमा होणारे खात्रीचे पाणी वीज, उद्योगधंदे आणि शहरांसाठी आणि पाणी अडवा
पाणी जिरवा, जलयुक्त शिवार हे ग्रामीण भागासाठी अशी विभागणी
मला स्पष्ट दिसते आहे.
2012 मध्ये महाराष्ट्रात स्थापित क्षमता होती 18000 मेवॉ (औष्णिक) आणि किती भर टाकायचे प्रस्ताव होते? तर
89269 मेवॉ चे.! पाचपट वाढ? आणि लक्षात
घ्या कि हे प्रस्ताव यूपीए ने मंजूर केलेले आहेत. मी आताच्या सरकारला दोष देतो आहे
असा समज कृपया करून घेऊ नये. खरे तर मला दोष कोणाचेच दाखवायचे नाहीत.' सर्व काही “वीजमार्गे” असा
आपला दृष्टिकोन बनत चालला आहे. त्याची किंमत किती पडते आहे याकडे लक्ष वेधणे हा
माझा हेतू आहे.
जे राज्याबाबत खरे आहे तेच देशाबद्दल ! Thermal Power Plants on the Anvil या
प्रयास च्या पुस्तिकेत याबाबत माहिती मिळते. ही पुस्तिका 2011 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. त्यावेळी (यूपीए) पर्यावरण मंत्रालयाकडे कोळसा
आणि वायू वापरणा-या औष्णिक प्रकल्पांचे 7,01,820 मेवॉच्या प्रकल्पांचे प्रस्ताव आलेले हौते.
यापैकी 1,92,913 मेवॉच्या
प्रस्तावांना पर्यावरणीय मंजूरी मिळालेली होती आणि औष्णिक प्रकल्पांना मंजूरी न
मिळणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. म्हणजे या प्रस्तावांना मंजूरी मिळणे हा फक्त
काळाचा प्रश्न होता. त्यावेळची औष्णिक स्थापित क्षमता होती 113000 मेवॉ. 6 पटीपेक्षा जास्त वाढ! यापैकी 5,89,000 मेवॉ चे प्रकल्प
कोळशावर आधारलेले औष्णिक प्रकल्प होते. म्हणजे पाणी लागणारे होते. यांसाठी 700
टिएमसी पाणी लागते आणि नद्यांमध्ये आताच्या शेती आणि माणसांच्या
गरजा भागून एवढे पाणी शिल्लक नसेल (आणि ते नसणार आहे) तर ते शेतीकडून अगर माणसांचे
कमी करूनच मिळवावे लागेल हे उघड आहे.
हा लेख लिहीत असता पाण्याचे दृष्टीने
महत्वाच्या दोन नवीन बातम्या आल्या. एक बातमी आहे वॉटर ग्रिड बद्दलची. गुजरात
राज्यात असे जाळे निर्माण करण्यात आले आहे असे या बातमीवरून समजले. असे
जलवाहिन्यांचे जाळे खूपच उपयुक्त ठरेल यात शंका नाही. पण त्यामधून वाहाण्यासाठी
पाणी शिल्लक राहिले पाहिजे ना? सरकारचे जाहीर धोरण काहीही असो. या वर्षीच्या
दुष्काळात देखिल भीमा खो-यामधील पाणी वीजनिर्मितीसाठी वळविले गेले ही वस्तुस्थिती आहे.
विजेसाठीच्या पाण्याला हात लावायचा नाही हा व्यवहार असेल तर या जलजाळ्यासाठी पाणी
उपलब्ध असणार नाही.
दुसरी बातमी आहे कोयनेचे अवजल मुंबईकडे
वळविण्याची! यासाठी 40000 कोटी रु खर्च होतील असा अंदाज आहे. ही बातमी पुणे येथून
प्रकाशित होणा-या दै. सकाळ मध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. ही अत्यंत निषेधार्ह
योजना आहे असे मला वाटते. कारण गोदावरी खोऱ्यात निम्मा महाराष्ट्र सामावलेला आहे. या
खोऱ्यात पाण्याचा तुटवडा आहे असे गेली काही दशके तरी दिसते आहे. पण या खोऱ्यामधील
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ यांना पाणी पोहोचविण्यासाठी काहीच योजना नाही. मुंबईसाठी
वीजरूपाने आधीच किती पाणी खर्च होते आहे. 2014 एप्रिल मधील
एका वृत्तानुसार मुंबईची सरासरी गरज 2900 मेवॉ ची आहे. उन्हाळ्यात
एसी मुळे जी मागणी वाढते ती 500 मेवॉहून जास्त आहे. मुंबईमधील
केवळ प. रेल्वेची गरज 425 मेवॉची आहे असे वृत्तपत्रावरून
समजले. ज्या प्रदेशांत 15-17 इंच पाऊस पडतो त्या प्रदेशाला
स्थिरता देऊ शकणारे पाणी 80 ते 90 इंच पाऊस पडणाऱ्या प्रदेशाकडे
वळविणे हे नुसते मूर्खपणाचे नाही तर दुष्टपणाचे देखील कृत्य आहे. असे नमूद करणे
मला भाग पडते आहे.
आज जगाच्या लोकसंख्येच्या 16% लोक भारतीय आहेत. पुढील 35 ते 40
वर्षांत यामध्ये अजून 40 कोटी लोकांची भर पडेल
असा अंदाज आहे. आपल्याकडे जगामधील गोड्या पाण्याच्या केवळ 4% गोडे पाणी आहे. वीज हे जर कळकीचे बाळ ठरायचे नसेल तर विजेचा अनिर्बंध वापर
करणे परवडणार नाही. बंगळुरू येथील शास्त्रज्ञ श्री ए के एन रेड्डी यांनी तीस
वर्षांपूर्वीच हे सांगितले होते. काही वीजवापर टाळून, वीजवापर
कार्यक्षम करून आणि काही अपारंपारिक स्त्रोतांचा उपयोग करून नवीन औष्णिक निर्मिती
न करता कर्नाटक राज्यामधील प्रत्येक घरास ,शेती पंपास आणि
कारखान्यास वीज पुरविणे शक्य आहे असे त्यांनी त्या वेळीच दाखवून दिले होते. Development,Energy&
Environment ही त्यांची पुस्तिका पुणे येथील परिसर या
पर्यावरणक्षेत्रात काम करणा-या संस्थेने प्रकाशित केली आहे.तो अतिशय महत्वाचा
विचार आहे. प्रयास संस्थेच्या अभ्यासामधून आपल्याला आताच्या वास्तवाची जाणीव होते
आणि रेड्डी यांनी तीसहून अधिक वर्षांपूर्वी मांडलेल्या विचारांचे महत्व प्रयासच्या
अभ्यासामधून मनावर ठसते.
प्रयास या संस्थेच्या संकेतस्थळावर
त्यांची प्रकाशने उपलब्ध आहेत. Dev., Energy& Environment ही पुस्तिका “परिसर” च्या
संकेतस्थळावर वाचायला मिळेल. Tata Power Tail race Water असा शोध इंटरनेटवर घेतल्यास त्याबद्दल माहिती मिळते. मुंबईच्या विजेच्या
गरजेबाबत इंटरनेटवर माहिती मिळते. मी प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधील त्याबद्दलची
वृत्ते या लेखासाठी ग्राह्य धरली आहेत.