Tuesday, September 7, 2021

पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2021

 मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग 

आयोजित करत आहे – 
शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीं साठी

*पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2021*

विषय– 

“चाखा फळे, भाज्या चाखा : - 
राखा आरोग्य, निसर्ग राखा”  


फळे आणि भाज्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष: 
2021 हे संयुक्त राष्ट्र महासभेने
 “आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला वर्ष” (international Year of Fruits and Vegetables) म्हणून जाहीर केले आहे. 
सर्व मानवांना उत्तम पोषण हवे, सर्वांसाठी ताज्या अन्नाची खात्री हवी, 
सर्वांचे आरोग्य राखले जायला हवे आणि शाश्वत विकासही साधायला हवा. 
ही ध्येये साध्य करण्यात फळे आणि भाज्या यांची महत्त्वाची भूमिका आहे, ती कोणती? 
या विषयी जागरूकता वाढवण्याची ही एक अपूर्व संधी आहे. 

*फळे आणि भाज्यांच्या आंतरराष्ट्रीय वर्षाची चार उद्दिष्टे आहेत:* 
1. फळे आणि भाज्यांच्या वापरामुळे - पोषण आणि आरोग्य याबाबत जे फायदे होतात त्यांच्याविषयीची जागरूकता वाढवणे. 
2. फळ आणि भाजीपाल्याच्या वापराद्वारे जीवन विविधतापूर्ण करणे, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे. 
3. फळे आणि भाज्यांच्या उत्पादन, साठवण, वितरण व्यवस्थेत होणारी नासाडी रोखणे आणि कचरा कमी करणे. 
4. फळे आणि भाजीपाला पिकवण्यास प्रोत्साहन देणे, त्यांचे उत्पादन सुधारणे, राखवण आणि साठवण करणे, पुरवठा साखळीचा विस्तार करणे आणि तिची क्षमता बळकट करणे तसेच याच्या सर्वोत्तम पद्धती समाजापर्यंत पसरविणे. 

*“चाखा फळे, भाज्या चाखा : राखा आरोग्य, निसर्ग राखा”* – या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत भाग घ्या. 
वर दिलेल्या उद्दिष्टांना अनुसरून आपण 9-10 पोस्टर तयार करू शकता. त्या पोस्टरचे फोटो काढून आम्हाला आधी पाठवा. 
त्यानंतर त्यांचे *प्रदर्शन गणेशोत्सवाच्या निमित्ताने* आपल्या वस्तीत, सोसायटीत, चौकात, शाळेत लावू शकाल तेथे लावा. 
यासाठी -
# 5 जणांच्या गटाने एकत्र येऊन हा उपक्रम करावा. 
# गटातील सर्वजण 7 वी ते 10 वी या इयत्तांमधील असावेत. 
# एका शाळेतील, एका वर्गातील असतील तर चांगलेच. तसे नसतील आणि मित्रमैत्रिणींचा गट असला तरी चालेल. 
# तुम्ही केलेले प्रदर्शन किमान 5 ठिकाणी सर्वांसाठी खुले करून मांडावे. 
#त्या त्या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांच्या, लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवून घ्या. 
# प्रेक्षकांशी बोलताना तुम्हाला आलेले अनुभव, 
त्यांना पडलेले प्रश्न, त्यांची उत्तरे, शंका – त्यांचे समाधान, पोस्टर तयार करताना तुम्ही स्वत:शी - गटाशी केलेला विचार, चर्चा, संवाद इत्यादी 
लिहून त्याचा अहवाल आम्हाला – पाठवायचा. म्हणजे स्पर्धा पूर्ण होईल. 

# या स्पर्धेसाठी
पहिले बक्षिस रु. 3000, 
दुसरे रु. 2000, 
तिसरे रु. 1000 आहे. 
त्याशिवाय प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे मिळतील.
# प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र मिळेल. 
*आधी आपल्या गटाची नोंदणी करा* 
त्यासाठी गटातील प्रत्येकाचे नाव, पत्ता, ई-मेल, फोन संपर्क, जन्मदिनांक आणि फोटो ईमेल करून आम्हाला पाठवा –
तशी माहिती 
mavipa.pune@gmail.com – या ईमेलवर पाठवा. 
# एका गटाला नोंदणी शुल्क रु. 250 फक्त भरावे लागतील. 
नोंदणी शुल्क - NEFTने जमा करा. खात्याचे नाव -  Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag 
(खाते क्र. 49010010077236)
IDBI Bank, Sadashiv Peth शाखा - 
IFSC CODE - IBKL0000490. 

“चाखा फळे, भाज्या चाखा : राखा आरोग्य, निसर्ग राखा” – या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेच्या विषयाबाबत *मार्गदर्शन कार्यशाळा*
बुधवार दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळात ऑनलाईन होईल. 
Meeting ID: 847 1195 8115
Passcode: 935050)
त्यामध्ये पुढील विषयांवर मार्गदर्शन मिळेल – 
1) आरोग्य आणि आहारात फळे, भाज्या यांचा वापर, 
2) फळे आणि भाज्यांमधील विविधता, 
3) घरी पिकवा भाज्या फळे, 
4) फळे आणि भाज्या टिकवण्याच्या पद्धती 
5) प्रभावी पोस्टर कसे बनवावे? 

# मार्गदर्शन करण्यासाठी 
आहार तज्ज्ञ अर्चिस सु. वि., 
घरगुती बाग फुलवणार्‍या रुपाली भोळे, 
भाज्या फळे टिकवण्यासाठी काय करावे हे सांगणार्‍या शशी भाटे,
 चित्रकार रमाकांत धनोकर, 
अध्यक्ष राजेंद्र कुमार सराफ 
आपल्याला लाभले  आहेत. याचा जरूर लाभ घ्या.
# या कार्यशाळेची झूम लिंक सर्व नोंदणी केलेल्या स्पर्धकांना पाठवण्यात येईल. 
# सर्व स्पर्धक गटांनी तयार केलेली *पोस्टरचे फोटो काढून दि. 16 सप्टेंबर 2021 पर्यंत आमच्याकडे पाठवा*
# आणि स्पर्धेबाबत आपल्या गटाला आलेल्या *अनुभवांचा अहवाल 
दि. 24 सप्टेंबर 2021 पर्यंत* मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग यांचेकडे पाठवा. 
# *दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी निकाल जाहीर होतील.* परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा - स्पर्धा संयोजक - 
शशी भाटे 9420732852, 
विनय र. र. 9422048967 
राजेंद्रकुमार सराफ 9822186763
अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग 

या साठी काही घोष वाक्ये - 
*रोजचा एक पेरु – आजाराला दूर सारू*
An apple a day keeps the doctor away
*ताज्या भाज्या पानात - जगणे रसरशीत करतात*
Vegetables keep you healthy
*शरीर नको दुबळे तर भरपूर खा फळे* 
Eat fruits plenty, keep body wealthy
*भाज्या फळे न खाल – तरूणपणीच मराल*
You’ll die young if you don’t eat fruits and vegetable
*फळे लवकर खराब होतात म्हणूनच - पचायला हलकी असतात*

--
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030*

Monday, March 15, 2021

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग 2019-20 कामांचा अहवाल

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग 2019-20 मध्ये झालेल्या संस्थेच्या कामांचा अहवाल पाहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा  https://drive.google.com/file/d/1ku8S4nM7XUp5iSA52PSDhMga2xF00ADE/view?usp=sharing

  




 वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना 

 दि15/03/2021  

माननीय सभासद

 

 सप्रेम नमस्कार ,                                                                            

       मराठी विज्ञान परिषदपुणे विभागाच्या सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि30मार्च 2021 रोजी सायं. 5.00 वा.एस एम जोशी सभागृहपत्रकार भवन जवळ नवी पेठ पुणे-30 येथे होईल. तरी आपण या सभेस आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती

गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास अर्ध्या तासानंतर तेथेच सभा होईल व त्या सभेस गणसंख्यापूर्तीचे बंधन राहणार नाही.

सभेची विषयपत्रिका

1.    मागील रविवार दि. 22 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.

2.    कार्यकारिणीने संमत केलेल्या 2019-20 च्या कार्यअहवालास मंजूरी देणे.

3.    मालेखापरिक्षकांनी तपासून दिलेल्या व कार्यकारिणीने संमत केलेल्या 2019-20 ताळेबंद/जमाखर्च अहवालास मंजुरी देणे.

4.    2020-21 या आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षकांची नेमणूक करणे.

5.    2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करणे .

6.    पुढील 3 वर्षाच्या कालावधीकरीता 3 कार्यकारिणी सभासदांची निवडणूक घेणे. 

7.    माअध्यक्षांच्या संमतीने मेल व वेळेवर लिखित स्वरूपता आलेल्या विषयावर चर्चा करणे.

 

सभेच्या आधी दुपारी 4:30 वासभास्थानी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे तरी त्याचा आस्वाद घ्यावयाला यावे ही नम्र विनंती.

 

महत्वाच्या सूचना

 

१.      सरकारी नियमानुसार सभा होणार आहे.

२.      मास्क घालणे अत्यावशक, मास्क शिवाय प्रवेश नाही.

३.      सोशल डिस्टन्स पाळणे व सॅनिटायझरचा वापर अनिवार्य.

४.       कोविडचा वाढता प्रभाव बघता सभा ऐनवेळी रद्द होऊ शकते.

राजेन्द्रकुमार सराफ            डॉ निलीमा राजूरकर         संजय मा क                     शशी भाटे

अध्यक्ष                            उपाध्यक्ष                              कार्यवाह                           कोशाध्यक्ष


--
अध्यक्ष  - राजेंद्रकुमार सराफ 9822186763, उपाध्यक्ष -  डॉ. निलीमा राजुरकर 9822599531 
कार्यवाह - संजय मा. क. 9552526909, कोषाध्यक्ष - शशी भाटे - 9420732852 
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030*

विज्ञान प्रसाराच्या कार्याला आपला हातभार लावा. सढळ हस्ते निधी दया.

धनादेश- मराठी विज्ञान परिषदपुणे विभाग” या नावे काढावा.

या बँकेत NEFT ने पैसे जमा करू शकता. आय डी बी आय बँक सदाशिव पेठ पुणे-30

खाते क्र.49010010077236 IFSC CODE-IBKL0000490

संकेतस्थळhttp://mavipapune.com/mpp/ 

Wednesday, January 27, 2021

विज्ञान रंजन स्पर्धा 2021 Vidnyan Ranjan Spardha 2021

2.  

*विज्ञान रंजन स्पर्धा 2021*

विज्ञान रंजन स्पर्धा  2021 अभिनंदन

विज्ञान रंजन स्पर्धेत ग्रामीण महिलांची बाजी


ज्योती कोरटकर प्रथम, रीमा लिओ रॉड्रिग्ज द्वितीय; अरुण फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण


पुणे : "ग्रामीण भागात ज्ञानाचे भांडार आहे. प्रत्यक्ष जीवनातून विज्ञान जगणारी माणसे पू़र्वी होती. शेतकरी विविध प्रकारची पिके एकावेळी लावून कीड नियंत्रण करू शकत होता. त्याला रासायनिक कीटकनाशक वापरण्याची गरज भासत नव्हती. त्याचे ज्ञान मराठीत होते. मराठीत परंपरेने आलेले मोठे ज्ञान आहे. पण इंग्रजी माध्यमाच्या हट्टापायी आपण ते ज्ञान गमावून बसत आहोत,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले.


मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्ताने आयोजित केलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा 2021 च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्रकुमार सराफ होते. विनय र. र., मोहन सावळे, संजय मा. क., शशी भाटे, नंदकुमार कासार, सुजाता बरगाले व अनेक मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेत चिखली येथील ज्योती हेमंतकुमार कोरटकर यांना प्रथम, पुण्यातील शालेय विद्यार्थिनी रीमा लिओ रॉड्रिग्ज हिचा द्वितीय, तर तृतीय क्रमांक चिखली येथील साधना दत्तात्रय खुळे यांना मिळाला. अंतिम फेरीत अठरा बक्षीस विजेत्यांना इरा लिमये स्मृती निधीतून रोख रक्कम,  प्रशस्तीपत्र आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले. 


अरूण फिरोदिया म्हणाले, "आपण एकच गोष्ट शिकून त्यात समाधान न मानता नव्याने काही तरी शिकले पाहिजे तर आपली आणि देशाची प्रगती होईल. आपण मराठीत विज्ञानाचे शब्द आणले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः शिकून त्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधणे आवश्यक आहे. फक्त एकच काम न करता, सर्व कामे पद्धतशिरपणे करायला शिका."


लुनाची रचना करत असताना रस्त्यावरच्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या साध्या मेकॅनिक गॅरेजवाल्यांकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळवून लुना कशी घडवली याची प्रेरक माहिती ही त्यांनी सांगितली.


स्पर्धकांपैकी राजस कवठणकर, प्रतिक्षा मेहतर, रोशनी इंगळे यांनी विज्ञान रंजन स्पर्धेचा पेपर सोडवताना त्यांना कसे नवे ज्ञान मिळत गेले याचे अनुभव सांगितले, विज्ञानाची मजेशीर आवड निर्माण करणारी आणि वैज्ञानिक दृष्टी देणारी अशी ही स्पर्धा असल्याचे ही सांगितले.


"महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून उत्तुंग प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. या स्पर्धेत ८५८ जणांनी सहभाग नोंदवला. नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गाचा प्रतिसाद मोठा असला, तरी यावर्षी प्रौढांचा प्रतिसाद विशेष उल्लेखनीय होता. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील स्पर्धक सर्वाधिक होते. काही महिला स्पर्धकांनी आपण गृहिणी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. प्राथमिक फेरीतील 54 विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यांना विविध प्रकारचे दहा प्रयोगांची वैज्ञानिक पडताळणी दोन तासात करण्याचे आव्हान देण्यात आले. त्याशिवाय त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या," असे राजेंद्रकुमार सराफ म्हणाले. 


विज्ञान रंजन स्पर्धेचे आयोजक विनय र. र. यांनी स्पर्धेबद्दल माहिती सांगितली. मुंबई, पुणे,  सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना, नाशिक, ठाणे, अहमदनगर या तसेच अन्य जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळाला. नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गाचा प्रतिसाद मोठा असला तरी यावर्षी प्रौढांचा प्रतिसाद विशेष उल्लेखनीय होता. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील स्पर्धक सर्वाधिक होते. त्या शिवाय शिक्षक, डॉक्टर,  इंजिनिअर, तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन, रंगारी, शिंपी, गवंडी, कामगार, दुकानदार यांमधूनही अनेकांनी सहभाग घेतला. 

सुनील पोटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रविन्द्र सोमण, विवेक एरंडे, उदयन साठे, विवेक शिळीमकर, दीपक आडगावकर, प्राची चिंचोलकर, मीना मेहेंदळे, ज्योत्स्ना सराफ, गीताश्री मगर, अमेय परदेशी, भारत सावळवाडे, डॉ. धुळे इत्यादींनी स्पर्धा परिक्षणाचे काम पाहिले. शशी भाटे, संजय मा. क. यांनी स्पर्धा व्यवस्थापनाचे काम पाहिले.


सविस्तर निकाल


प्रथम क्रमांक - रु. 5000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके
ज्योती हेमंतकुमार कोरटकर -चिखली
द्वितीय क्रमांक - रु. 3000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके
रीमा लिओ रॉड्रीग्ज - पुणे
तृतीय क्रमांक - रु. 2000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके
साधना दत्तात्रय खुळे - चिखली
उत्तेजनार्थ रु. 1000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके
तन्वी शशिकांत मगदूम - कोल्हापूर
वैशाली विवेक नरवडे - डुडुळगाव
विशाखा परशराम आरेकर - कराड
सुमन बापूसाहेब मुखेकर - चिखली
रुपाली नितीन नीळकंठ - चिखली
स्फुर्तिवर्धक - रु. 500/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके
वैभव अंगद कांबळे - चिखली
जैनील धर्मेश जैन - पुणे
सानिका रविंद्र शिंदे - चिंचवड
श्रुतिका कलगोंडा पाटील - कोल्हापूर
तनिष हेमंत चंगेडिया - पुणे
ओंकार सूचित मुदंडा - पुणे
अक्षदा अधिक कदम - सातारा
अक्षय सुहास कुलकर्णी - नाशिक
हितांशी मनीषकुमार शहा - पुणे
प्रसाद बाळू नेवाळे - चिखली
या शिवाय अंतिम फेरीत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र आणि पुस्तक संच देण्यात आला.



प्राथमिक फेरीत उत्तम कामगिरी केलेल्या पुढील स्पर्धकांची 

प्रयोग फेरी साठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या स्पर्धकांनी मंगळवार दिनांक 2 मार्च 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क चिंचवड, पुणे येथे उपस्थित रहावे.  https://goo.gl/maps/ecfyNCz9y7ZbCzCD7

अंतिम फेरीचे स्वरूप व नियम या स्पर्धकांना वैयक्तिक रित्या कळवण्यात येतील. कोविड-19 प्रतिबंध पाळून या कार्यक्रमात सहभागी व्हावे.

निवड झालेल्या स्पर्धकांची नावे (अकारविल्हे)

अक्षदा अधिक कदम

सातारा

अक्षय सुहास कुलकर्णी

नाशिक

अनुष्का रविंद्र निकम

कराड, सातारा

आकांक्षा विकास वाघमले

सातारा

ऋतुजा अंगद कांबळे

चिखली, पुणे

ओंकार सूचित मुदंडा

पुणे

कोमल रामहरी आदिक

औरंगाबाद

कोमल शांताप्पा बैचबाळ

सातारा

क्षितिजा सुनिल धुळे

औरंगाबाद

गंधार नितीन डेरेकर

बदलापूर

गौरव सुभाष गायकवाड

औरंगाबाद

जैनील धर्मेश जैन

पुणे

ज्योती हेमंतकुमार कोरटकर

चिखली, पुणे

तनिष हेमंत चंगेडिया

पुणे

तन्वी शशिकांत मगदूम

दत्तवाड, कोल्हापूर

दिशा संतोष वाघमारे

सातारा

धर्मेश भूपेंद्र पाटील

चाळीसगाव

निर्मला विठ्ठल सावळे

चिखली, पुणे

नेहा प्रभाकर पाटील

दत्तवाड, कोल्हापूर

प्रतिक्षा बाळू मेहतर

औरंगाबाद

प्रविण विभांडीक

औरंगाबाद

प्रसाद बाळू नेवाळे

चिखली, पुणे

प्रियंका मधुकर गायकवाड

औरंगाबाद

मंदार मधुकर उदास

कोथरूड, पुणे

मनीषा आत्तम बोराडे

चिखली, पुणे

मयुरी पुरुषोत्तम वाघ मंदा

औरंगाबाद

मोनिका सुभाष गायकवाड

औरंगाबाद

मोहिनी विनायक पाटील

कराड

राजस कपिल कवठणकर

बदलापूर

रीमा लिओ रॉड्रीग्ज

पुणे

रुचिका अतुल पिंगळे

नाशिक

रुपाली नितीन नीळकंठ

चिखली, पुणे

रोशनी गौतम इंगळे

चिखली, पुणे

वनिता सुधीर सोनवणे

चिखली, पुणे

वाघ प्रबोधिनी पुरुषोत्तम मंदा

औरंगाबाद

विठ्ठल पांडुरंग गवळी

चिखली, पुणे

विशाखा परशराम आरेकर

कराड, सातारा

वेदांत सुनिल शेवाळे

कराड, सातारा

वैभव अंगद कांबळे

चिखली, पुणे

वैशाली विवेक नरवडे

डुडूळगाव, पुणे

वैष्णवी वैभव फुटाणे

कराड, सातारा

शिल्पा प्रवीण मानमोडे

चिखली, पुणे

श्रावणी सचिन टकले

कराड, सातारा

श्रुतिका कलगोंडा पाटील

दत्तवाड, कोल्हापूर

संगीता विष्णू गावडे

चिखली, पुणे

साधना दत्तात्रय खुळे

चिखली, पुणे

सानिका रविंद्र शिंदे

चिंचवड

सानिका विठ्ठल साबळे

सातारा

सुमन बापूसाहेब मुखेकर

चिखली, पुणे

सुरेखा संतोष गाडगे

मुंबई

सोनाली ललित सकुंडे

चिखली, पुणे

स्नेहल रमेश लोहार

सातारा

स्वाती संदेश दळवी

चिखली, पुणे

हितांशी मनीषकुमार शहा

पुणे

See English translation at the bottom

सूचना g प्रवेशमूल्य नाही g वयाची अट नाही g शिक्षणाची अट नाही g खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनानेकोणालाही विचारूनइतरत्र शोधूनप्रत्यक्ष प्रयोग करून मिळवावी g उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग,टिळक स्मारक मंदिर,टिळक रस्ता,पुणे 411030 येथे पोचवावी g प्राथमिक विजेत्यांची नावे 21 फेब्रुवारीला जाहीर केली जातीलg प्राथमिक विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरी 1 मार्च रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे होईल g आकर्षक बक्षिसे g परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

 g  आपल्या उत्तरपत्रिके सोबत पुढील माहिती लिहून पाठवावी 

1. संपूर्ण नाव2. पत्ता, 3. संपर्कासाठी दूरध्वनी / भ्रमणभाष, 4. ई-मेल. 5. जन्मतारीख, 6. शिक्षण, 7. व्यवसाय, 8. पुढावा गुण

g शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.

शिक्षण: पाचवीपर्यंत(10) सातवीपर्यंत (9) दहावीपर्यंत (7) बारावीपर्यंत (5) पदवीपर्यंत (3) शास्त्र-शाखा (0)

वय वर्षे: 13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81च्यावर (6)

संपर्क– शशी भाटे 9420732852/संजय मा.क.9552526909/राजेंद्रकुमार सराफ 9822186763/विनय र. र. 9422048967

विज्ञान रंजन स्पर्धा 2021 प्रश्नावली

प्रश्न १ - निरीक्षण करून उत्तर लिहा (गुण १०)

1.   कढीलिंबाच्या एका काडीला किती पाने असतात ?

2.   100 मिलीलिटर पाण्यात किती मीठ विरघळते?

3.   उचललेला हात वाकवून त्याचे मधले बोट पाठीच्या कितव्या मणक्याला लागते?

4.   रबर त्याच्या लांबीच्या किती पट ताणले जाते?

5.   खोटे हसणारी व्यक्ती कशावरून ओळखू येते?

6.   भडक बातम्या सांगणाऱ्या वाहिन्यांच्या पाट्याकोणत्या रंगाच्या असतात?

7.   झाडाचे वय काय ते खोडाच्या चित्रावरून तपासून सांगा.


8.    संगणकाच्या कळफलकावर चार कोपऱ्यात असणाऱ्या चार खुणा कोणत्या?

9.   कोणत्या पारंपारिक सवयी रोगापासून संरक्षण करतात?

10.  तुमच्या गावाजवळ भौगोलिक रुपांवरून नावे असलेली पाच गावे कोणती ते लिहा.

 प्रश्न २ - मी/आम्ही कोण? (गुण १०)

1.    मी एक रोग.  लसीकरणाचा पहिला प्रयोग माझ्यावर केला गेला.

2.    जगात माझ्या इतका कडकडून चावा कोणी घेऊ शकत नाही.

3.    हिवाळ्यात जवळपास मृत अवस्थेत जातो बर्फ वितळल्यावर परत जीवित होतो.

4.    मी चिपको आंदोलनाची सुरुवात केली 2013 साली मला गांधी शांती पुरस्कार मिळाला.

5.    जगाला विस्फोटके विकून मिळालेल्या संपत्तीतून हे पुरस्कार वैज्ञानिकांना मिळतात.

6.    मी मन आणि मनातील कार्यांच्या जटिलतेचे विज्ञान आहे.

7.    23 नोव्हेंबर 2020ला निघून चंद्रावरची दोन किलो माती घेऊन 17 डिसेंबरला  परतलो.

8.    मी एक फुल माझा पसारा 111 सेंटीमीटर एवढा भरला.

9.    शरीरात आलेले रोगजंतू आम्ही मारतो किंवा पकडून ठेवतो.

10.  मी सांगतो म्हणून काही सत्य मानू नका, स्वत: शोध घ्या आणि खरे आढळले तर माझे म्हणणे स्वीकारा

प्रश्न ३ - थोडक्यात उत्तर स्पष्ट करा – (गुण १०)

1.    आपल्या बनियनवर किंवा पायताणावर एक आकडा लिहिला असतो, त्याचा अर्थ काय?

2.    झाडापासून डिंक कसा बनतो?

3.    कापडी/कागदी/प्लास्टिक पैकी कोणत्या पिशव्या बनवण्यासाठी उर्जा, पाणी व अन्य संसाधने सर्वाधिक लागतात?

4.    खाद्यपदार्थ बांधून पाठवण्यासाठी  प्लास्टिक ऐवजी कोणकोणते  पर्याय वापरता येतील?

5.    दोन गावांमधले अंतर कसे व कुठून मोजतात?

6.    घरात वायूप्रदूषण करणाऱ्या क्रिया, प्रक्रिया व वस्तू यांची यादी तयार करा.

7.   दूरचित्रवाणीवर दिसणारी कोणती जाहिरात अवैज्ञानिक दावे करते?

8.    बोर्नव्हिटा व तत्सम खाद्य वस्तूंना आपल्या घरी स्वस्त व सहज उपलब्ध असलेले पर्याय कोणते.

9.    
साधी सायकल व  शर्यतीत वापरायची सायकल यात कोणते फरक आहेत?


10.  चित्रातल्या लाल गोलात डिसेंबर 2020  मध्ये पर्यावरणीयदृष्ट्या झालेली महत्त्वाची कोणती घटना आहे?

प्रश्न ४ - चूक की बरोबरते स्पष्ट करून लिहा. (गुण २०)

1.   आई-वडिलांची मातृभाषा वेगवेगळी असेल तर त्यांची मुले उशीराने बोलायला सुरुवात करतात.

2.   सूक्ष्मजीव विषाणूंपेक्षा दुप्पट आकाराचे असतात.

3.   चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता, भरपूर आहार आणि पुरेशी झोप हवी.

4.   खारफुटी वनस्पती मुळे समुद्रकिनाऱ्याचे क्षारीकरण होते.

5.   दरदरून घाम येणे हे ताप वाढण्याचे लक्षण आहे

6.   टोळधाडीतले टोळ हा नाकतोड्यांचाच एक प्रकार आहे.

7.   संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी अंतराळ यानात अणूऊर्जा वापरतात.

8.   दुधाच्या प्लास्टिकच्या पिशवीचा कोपरा कापून फेकला तर सजीवसृष्टीला काही त्रास होत नाही.

9.   केसांचा कुरळेपणा हा एक अनुवांशिक गुणधर्म आहे.

10. 2050 सालात भारतात 50 टक्के लोक वृद्ध असतील.

प्रश्न ५ - वैज्ञानिक कारण द्या– (गुण २०)

1.   दुध उतू का जाते?

2.   खाऱ्या पाण्यासाबणाचा फेस होत नाही.

3.   पूर्वी फ्रीजच्या मागे एक जाळी असायची ती आता नव्या फ्रीजमध्ये असत नाही.

4.   आधार कार्ड करताना डोळ्याच्या एका भागाचा फोटो घेतात.

5.   फोडणी देण्यासाठी गरम तेलात प्रथम जिरे / मोहरी टाकतात.

6.   थंडीच्या दिवसात तोंडातून वाफा बाहेर पडताना दिसतात.

7.   कोविड-19 विरोधी लस घेतलेल्या व्यक्तिने सुद्धा मास्क वापरला पाहिजे.

8.   एव्हरेस्ट शिखराची उंची 86 सेंटीमीटरने वाढली.

9.   आईचे रक्त बाळाला चालतेच असे नाही.

10. कोरोनाचे विषाणू साबणपाण्याने नष्ट होतात.

प्रश्न ६ - सविस्तर उत्तर लिहा– (गुण ३०)

1.   रंगाचे नाव असलेल्या किमान पाच मराठी म्हणी लिहा.त्यातून कोणते विज्ञान समजते?

2.   घरातील मसाल्यात असणारे कोणते पदार्थ फुल, साल, पान, फळ व खनिज आहेत?

3.   तुमचे स्थान, संपर्क, कॅमेरा, स्पीकर वापरल्याशिवाय मोबाईलमधील कोणती ऍप्स चालू शकत नाहीत?

4.   दुष्काळ पडण्यापूर्वी कोणकोणती चिन्हे दिसतात?

5.   आमच्या वेबसाईटला भेट द्या, वेबपेजचा युआरएल वापरून फॉर्म डाउनलोड करा आणि त्यात माहिती भरून अपलोड करा. या वाक्यातील महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न ७ - चित्र काढून उत्तरे लिहा – (गुण १५)

1.   जलचक्राचे चित्र काढा. माणसामुळे जलचक्रावर कोठे व कोणता परिणाम झाले ते रंगाच्या शाईने दाखवा.

2.   गेल्या दशकात क्रूड ऑइलचे दर आणि भारतातील पेट्रोल डिझेलचे दर यांचा तुलनात्मक आलेख काढा.

3.   1 ते 10 फेब्रुवारी मधील सूर्योदय चंद्रोदय यांच्या वेळांचा आलेख काढा. कोणता निष्कर्ष निघतो?

4.   जेवणाच्या ताटात कोणा कडे, कोणते पदार्थ, कोणत्या जागी वाढतात?

5.   दोन्ही बाजूने वर उघडणाऱ्या नाटकाच्या पडद्याची यंत्रणा कशी काम करते ते आकृती काढून स्पष्ट करा.

प्रश्न ८ - करून पहा व निरीक्षणे लिहा – (गुण १५)

1.   भांड्यांची उंची व भांड्यातील दुधाची उंची चे गुणोत्तर काय असावे ज्यामुळे दुध उतू जाणार नाही.

2.   नवीन कोरे भडक रंगाचे कापड घेऊन त्याचे तीनसेंटीमीटर लांबीचे चौरसाकार 10 तुकडे करा. त्यातले दोन दोन तुकडे गार पाण्यात, गरम पाण्यात, मिठाच्या पाण्यात, लिंबाच्या पाण्यात, साबणाच्या पाण्यात एक तास भिजवून ठेवा. मग एक तुकडा सावलीत आणि एकतुकडा उन्हात वाळवा. कोणत्या कापडाचा रंग किती बदलला?

3.   जादूचा चौरस - दिलेल्या आकृतीच्या प्रत्येकचौकटीत  1 ते 64 अंक एकदाच वापरून असे भरायचे की - चार बाय चारच्याप्रत्येक चौरसात उभी-आडवी-तिरपी आकड्यांची बेरीज 130 येईल. तसेच प्रत्येक रंगीतचौकटीत व ठळक चौकटीत असलेल्या  चार संख्यांची बेरीज 130 येईल.तसेच तुटक रेषांनी दाखवलेल्या आकारातील संख्यांची बेरीज दिलेल्या इतकी येईल.



प्रश्न ९- निबंध लिहा (500 शब्द) (गुण १५)

एखाद्या रोगावर हमखास उपाय म्हणून एखादे औषध / लस बाजारात येण्यापूर्वी कोणकोणते अभ्यास करावे लागतात?

=================================

आपल्या उत्तर पत्रिका 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवा अथवा जमा करा.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030. 

संपर्क – विनय र र ९४२२०४८९६७, शशी भाटे 9420732852, संजय मा. क. 9552526909, राजेंद्रकुमार सराफ 9822186763.

English Translation

Vidnyan Ranjan Spardha 2021

An open book test to enhance knowledge of science and scientific attitude.  

(Participants of the competition are expected to answer as many questions as possible in Marathi and send the answer sheet to Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag, Tilak Smarak Mandir, Tilak road, Pune 411030 by 15.02.2021)

Questionnaire

Question 1 - Observe and write the answer (Marks 10)

1. How many leaves do a stick of curry-leaf have?

2. How much salt dissolves in 100 ml of water?

3. Which vertebrae can you touch with the middle finger of your hand raised at the shoulder?

4. How many times the length of rubber is stretched?

5. How can you spot a person with a fake smile?

6. TV News channels that give loud and exaggerated news have their boards painted in what color?

7. Predict the age of the plant from the picture of the trunk.

8. What are the functions of keys at four corners of a computer keyboard?

9. What traditional habits protect against disease?

10. Write names of the five villages near your residence which have been named after geographical forms.

 

Question 2 - Who am I? (Marks 10)

1. I am a disease. The first experiment of vaccination was done on me.

2. No one in the world can bite as hard as mine.

3. I go almost dead in winter and comes back to life when the snow melts.

4. I started the Chipko movement, I received the Gandhi Peace Prize in 2013.

5. Scientists get these awards from the wealth created by selling explosives to the world.

6. I am the science of the complexity of the mind and the workings of the mind.

7. We left on 23rd. November 2020 and returned on 17th December with 2 kg of soil on the moon.

8. I am a flower spread over 111 cm.

9. We kill or catch germs in the body.

10. Believe nothing, not even if I said it, find out for yourself and accept my statement only if it agrees with your own reason and common sense.

 

Question 3 – Answer in short - (Marks 10)

1. What does it mean to have a number written on your T-shirt or shoes?

2. How is gum formed from a tree?

3. Which of the following cloth/paper / plastic bag requires the most energy, water, and other resources?

4. What alternatives can be used instead of plastic for food packaging?

5. How and from where is the distance between two towns measured?

6. Make a list of activities, processes, and items that cause air pollution in the house.

7. What advertising on television you think makes unscientific claims?

8. What are the cheap and easily available alternatives to Bourn vita or similar food items in your home?

9. What are the differences between a simple bicycle and a racer bicycle?

10. What was the most important environmental event that occurred in December 2020 in the red circled part in the picture?

 

Question 4 – State whether right or wrong? Explain in brief. (Marks 20)

1. Baby of parents with different mother tongues starts speaking late.

2. Microorganisms are twice the size of viruses.

3. Good health requires cleanliness, plenty of food, and adequate sleep.

4. The salinity of the beach is due to mangroves.

5. Sweating a lot is a sign of fever

6. Locust swarms is a type of praying mantis or grasshoppers.

7. Spaceships use Atomic energy to exchange messages.

8. If the corner of the plastic milk bag is cut and thrown away, there is no harm to the living beings.

9. Curly hair is a genetic trait.

10. By 2050, 50 percent of India's population will be elderly.

 

Question 5 - Give Scientific Reason - (Marks 20)

1. Why does milk overflow?

2. Soap does not foam in saltwater.

3. There used to be a black pipe at the back of the fridge that is no longer used in the modern fridge.

4. Why photograph of your eye is used in the Aadhaar card?

5. Cumin seeds/mustard seeds are added first in hot oil Tadka.

6. On a cold day, fog is seen coming out of the mouth.

7. A person who has been vaccinated against Covid-19 should also use a mask.

8. The height of the summit of Everest increased by 86 cm.

9. A mother’s blood may not be useful for blood transfusion for her baby.

10. Coronaviruses are destroyed by soapy water.

 

Question 6 - Write a detailed answer - (Marks 30)

1. Write at least five Marathi proverbs with color name in it. What scientific facts does each of these proverbs reveal?

2. What are the ingredients in home spices like flowers, bark, leaves, fruits and minerals?

3. Which mobile apps can't run without using your location, contacts, camera, speakers?

4. What are the signs before a drought occur?

5. Visit our website, download the form using the URL of the webpage and upload the information in it. Explain the meaning of important words in this sentence.

 

Question 7 - Draw a picture and write the answers - (Marks 15)

1. Draw a water cycle. Show where and what effect man has had on the water cycle with colored ink.

2. Draw a comparative graph of crude oil prices and petrol and diesel prices in India over the last decade.

3. Graph the time of sunrise and moonrise from 1 to 10 February. What is the conclusion?

4. What different types of food serving styles you see in different families and on different occasions?

5. What is the mechanism of operating a stage curtain that opens up on both sides?

 

Question 8 - Try it out and answer. (Marks 15)

1. What should be the ratio of the height of the pot to the height of the milk in it so that the milk does not overflow?

2. Take a new dry brightly coloured cloth and cut it into 10 square pieces of three centimeters length. Soak two pieces each of these in cold water, hot water, saltwater, lemon water, soapy water for one hour respectively. Then dry one piece in the shade and one piece in the sun. Observe how much did the color of the fabric change? Paste these pieces into your answer sheet.

3. Magic Square - Fill in each box of the given figure using 1 to 64 digits at a time so that - Each square of four by four will add 130 to the vertical-horizontal-oblique numbers. Also, the sum of the four numbers in each colored box and the black-bordered box is 130 and the sum of numbers in a dotted area is as stated at it's top.

 

Q9- Write an essay (500 words) – (Marks 15)

What are the studies that need to be done before a drug/vaccine can be marketed as a specific remedy for a disease?

 

 

Competitors should also fill out and submit their entry form via Google Form - using the following link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdL7thGsNvEBw9kqL8nxVP5wOKxMoVaILgZt3NlQ4Qsuk8Jpg/viewform?usp=sf_link