Wednesday, December 21, 2022

गणित प्रयोग आणि प्रश्नमंंजुषा

 गणित प्रयोग व प्रश्नमंजुषा - उच्च प्राथमिक साठी

1) गणितज्ञ - फोटोवरून नावे ओळखा
वेळ 3 मिनिटे.
गुण प्रति फोटो 1
साहित्य- फोटो, उत्तरपत्रिका, पेन
 
एका वेळी एक फोटो 35 सेकंद दाखविणे









2) चित्रातील वस्तूंची संख्या ओळखा.
वेळ 5 मिनिटे.
गुण प्रति फोटो 1
साहित्य- चित्रे, उत्तरपत्रिका, पेन
एका वेळी एक चित्र 35 ते 60 सेकंद दाखविणे
1) किती आकार? 
2) कोणत्या सोंगट्या किती?

3) किती झाडे?
4) किती चौरस?
5) सात पिढ्यात पूर्वज किती?

3) काड्यांची गणिते.
वेळ 5 मिनिटे
(एक काडी हालवून समीकरण बरोबर करा गुण - 2 / दोन काड्या हालवून समीकरण बरोबर करा – गुण 4 ).
साहित्य- चित्रे, उत्तरपत्रिका, पेन किंवा काड्या, पुठ्ठा

एक काडी हालवून समीकरण बरोबर करा
एक काडी हालवून समीकरण बरोबर करा

 
4) 3 ठोकळे 6 अक्षरे. शब्द बनवा.
वेळ 5 मिनिटे.
गुण प्रती शब्द ½.
साहित्य - कागद, पेन शक्य तर ठोकळे घेऊन खेळ करावा.
 
तुमच्याकडे 3 फासे आहेत. 
एका फाशावर – A E I O U Y (1 2 3 4 5 6 ऐवजी). 
दुसऱ्या फाशावर – B C D F G H (1 2 3 4 5 6 ऐवजी). 
तिसऱ्या फाशावर – N P R S T V (1 2 3 4 5 6 ऐवजी) 
- अशी अक्षरे लिहीली आहेत. 


प्रत्येक फाशावरील एकेक अक्षर वापरून होणारे तीन अक्षरी इंग्रजी शब्द लिहा.

 
5) बोटांमधील कोन.
वेळ 5 मिनिटे.
गुण – अ - कोनांच्या संख्येप्रमाणे गुण देणे. (कोनसंख्या 4 - गुण 1, कोनसंख्या 5 ते 7 – गुण 2. कोनसंख्या 8 ते 9 – गुण 3. कोनसंख्या 10 – गुण 4)
गुण – ब – कोनांच्या नावाप्रमाणे प्रत्येक कोनाला ½ गुण
गुण – क – कोनांच्या मापाप्रमाणे – +- 5 अंश 1 गुण, +- 10 अंश ½ गुण.
साहित्य - कागद, पेन्सिल पट्टी
 
एक A4 आकाराचा कागद घ्या.
कागदाच्या अरुंद बाजूच्या मध्यावर एक ठिपका काढा त्याला नाव द्या - O.
तळहाताच्या मनगटाच्या भागाशी मध्यावर एक ठिपका काढा.
हातावरचा ठिपका कागदावरच्या O ठिपक्यावर ठेवा.
बोटे जास्तीत जास्त फाकवा.
प्रत्येक बोटाच्या टोकाशी कागदावर एक एक ठिपका काढा.
त्यांना A B C D E अशी नावे द्या.
A B C D E - प्रत्येक ठिपका O शी जोडा.
आता आकृतीत दिसणाऱ्या प्रत्येक कोनाचे नाव आणि त्याची अंशात्मक किंमत अंदाजे लिहा.
 

6) तळहाताचे क्षेत्रफळ.
वेळ 5 मिनिटे.
गुण 5. – अचूक आकृती 2 गुण. अचूक मापन 3 गुण (+- 5 % 2 गुण, +- 10 % 1 गुण)
साहित्य - आलेखाचा कागद, पेन्सिल पट्टी
 

एक आलेखाचा कागद घ्या.
X अक्षाच्या मध्यावर एक ठिपका काढा.
तळहाताच्या मनगटाच्या भागाशी मध्यावर –
एक ठिपका काढा.
 
हातावरचा ठिपका कागदावरच्या ठिपक्यावर ठेवा.
बोटे फाकवा. बोटे आलेखाच्या आतच असू देत.
हाताची बाह्य रेषा - आऊटलाईन काढा.
 
तळहाताच्या आकृतीने आलेखाच्या कागदाचा
किती भाग झाकला? ते मोजा.
 
– उत्तर चौरस सेंटीमीटरमध्ये लिहा.
 
7) 4 कागदाचे खोके.
वेळ 5 मिनिटे.
गुण 5 – सफाईदारपणा 3 गुण, मापन 1 गुण, आकडेमोड 2 गुण, अचूक उत्तर 1 गुण
साहित्य - ए4 कागद
https://www.youtube.com/watch?v=Zg081nhLKPg







एक ए4 आकाराचा कागद घ्या. त्याच्या घड्या घालून एक खोके तयार करा.
या खोक्यात किती ग्रॅम तेल मावेल? (1 लिटर तेलाचे वजन 910 ग्रॅम असते.)
 


8) चौरस कागदाची होडी
वेळ 5 मिनिटे.
गुण 5 – सफाईदारपणा 3 गुण, मापन 1 गुण, आकडेमोड 1 गुण, अचूक उत्तर 1 गुण
साहित्य - चौरस कागद 
 
- उंची अंदाजे? गुणोत्तर?
 
9) वरील होडीचे पाण्याला स्पर्श करणारे क्षेत्रफळ किती?
वेळ 5 मिनिटे 
गुण 5 – सफाईदारपणा 3 गुण, मापन 1 गुण, आकडेमोड 1 गुण, अचूक उत्तर 1 गुण
 
साहित्य- चौरस कागद, पट्टी
 
10) चौरस कागदाचा फुगा - आकारमान किती?
वेळ 5 मिनिटे.
गुण 5 – सफाईदारपणा 3 गुण, मापन 1 गुण, आकडेमोड 1 गुण, अचूक उत्तर 1 गुण
साहित्य- चौरस कागद, पट्टी
 
11) खेळाच्या पत्त्यातील सममिती
वेळ 3 मिनिटे 
गुण – प्रत्येकी 2 गुण
साहित्य- पत्ते, पट्टी पेन्सिल 
 
हाती आलेल्या पत्त्यामध्ये दिसणारा सममिती अक्ष शोधा. सममिती अक्ष म्हणजे अशी रेष की जिच्या दोन्ही बाजूला दिसणाऱ्या पत्त्याचे रुप समान असेल. (पत्त्याच्या कोपऱ्यातील किंमतीकडे दुर्लक्ष करा.)
 
 
12) 7 रेषाखंड लांबी प्रत्येकी 4 सेमी. वापरून अशी रचना करा की अधिकाधिक आणि विविध प्रकारच्या भौमितिक आकृत्या दिसतील (त्रिकोण, चौकोन इ.)
वेळ 5 मिनिटे
गुण – जास्तीत जास्त 10. आकृती प्रकार प्रत्येकी 1 गुण, आकृती संख्या प्रत्येकी ½ गुण
साहित्य- कागद, पेन्सिल, पट्टी

उत्तरे - 
1) श्रीनिवास रामानुजन, दत्तात्रय कारपेकर, शकुंतलादेवी, प्रसांत चंद्र महालनोबीस, नीना गुप्ता.
2) 16 आकार, सोंगट्या - पांढऱ्या 9 काळ्या 9 लाल 1, झाडे 20/19, 30 चौरस, पूर्वज 254
3) 9 + 3 - 4 = 8, 9 - 3 = 6 तसेच 3 + 3 = 6, 13 + 11 = 24
 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला लवकरच संपर्क केला जाईल.