Tuesday, January 24, 2023

विज्ञान रंजन स्पर्धा 2023

विज्ञान रंजन स्पर्धा 2023

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली. 1246 स्पर्धक सहभागी झाले. पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यातील स्पर्धक होते. त्यातील पहिल्या  56 स्पर्धकांची प्रयोग फेरी 4 मार्च 2023 रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे घेण्यात आली. प्रयोग फेरीत दोन तासात 11 प्रयोग करायला देण्यात आले. पेरुतील बियांची मांडणी, आवाजावरून बंद डबीतील पदार्थ ओळखणे, टॅनग्रॅमच्या रचना, दृष्यअंदाज, 25 चौकोन 50 काड्या, शारिरीक कौशल्य तपासणी, लिंबाची पृथ्वी, बदलते रंग, षटमान संख्या, धान्याची पकड, जळता कापूर हाताळणे इ.
या स्पर्धेत अक्षय कुलकर्णी, नाशिक पहिला आला. दुसरा क्रमांक राहूल शिंदे, रत्नागिरी तर तिसरा क्रमांक ज्योती किरटकर चिखली या शिक्षकांचा आला. वेदराज सोनार, सांगली आणि वसुंधरा मोरे, मिरज यांना चौथे बक्षीस विभागून देण्यात आले. पाचव्या क्रमांकावर प्रज्ञा सारणीकर - पुणे, रिमा रॉड्रीक्स - पुणे, मही काळढोणे - म्हसवड, श्रेया ढोणे - औरंगाबाद, अनुराधा काकडे - कराड आणि आयुष शि़त्रे - सांगली यांनी यश पटकावले. 
प्रा. डॉ. प्रशांत हंबर यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पंधरा हजार रुपये रोख, तसेच वैज्ञानिक खेळणी, पुस्तके अशी वस्तुरूप बक्षिसे देण्यात आली. या वेळी मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष - राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष आणि स्पर्धा संयोजक विनय र. र., शशीताईं भाटे, सुनील पोटे, अंजली साठे, दिगंबर कट्यारे, श्री तुपे, आदी मान्यवर तसेच पालक आणि शिक्षक उपस्थित होते. विज्ञान रंजन स्पर्धेच्या माध्यमातून विज्ञानाची आवड निर्माण झाली अशी प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केली.









अंतिम फेरी शनिवार दिनांक 4 मार्च 2023 ला होईल.
स्पर्धकांची नावे 
अ.क्र.     नाव                                         गाव
1             अक्षय सुहास कुलकर्णी   नाशिक
2             अदिबा जहांगीर तांबोळी  फलटण
3             अनया रत्नाकर कांबळे   कराड
4             अनुज सुशील देव       औरंगाबाद
5             अनुजा उत्तम बोराडे      चिखली
6             अनुराधा दीपक काकडे    कराड
7             अर्णव देवीदत्त खापर्डे      पुणे
8             अर्शान अजीम शेख      सांगली
9             आकाश विश्वनाथ कांबळे सांगली
10           आयुष राहुल शिंत्रे       सांगली
11           आशिष अनिल राऊत     फलटण
12           गायत्री संतोष माने      मिरज
13           गिरीजा विनायक सुतार  कराड
14           जाधव ऋतुजा संजय    कराड
15           ज्योती हेमंतकुमार किरटकर चिखली
16           तनवी नागेश कुलकर्णी   पुणे
17           तन्मय प्रशांत अगलगावे  सांगली
18           तेजस नागेश कुलकर्णी   पुणे
19           दर्शना प्रशांत पाटील     कराड
20           दिव्या प्रवीण ठोंबरे     चिखली
21           धनश्री वसंत वैरागडे    चंद्रपूर
22           पराग तुकाराम शिंदे    फलटण
23           पार्थ कुंतीनाथ नंदनीकर सांगली
24           पूर्वा विकास मोहिते    सातारा
25           प्रज्ञा प्रतापसिंह सरणीकर पुणे
26           प्राची शीतल सुरवशी   कोल्हापूर
27           मयुरेश महेश कुंभार     फलटण
28           मही महेश काळढोणे    म्हसवड
29           मृणाली जयपाल औरासे  चंद्रपूर
30           मैथिली मिलिंद चव्हाण  कराड
31           मोहम्मद रियम आशिक  सांगली
32           यश चंद्रकांत डोंगरे      सांगली
33           रामेश्वरी मंगेश गाडेकर   फलटण
34           राहुल संभाजी शिंदे      रत्नागिरी
35           रिचा सुनील जाधव      भुईज, वैत
36           रिमा रियो रॉड्रिक्स      पुणे
37           रोहन संजय पाटील      सांगली
38           वरद शंकर कोळी        सांगली
39           वसुंधरा रणजित मोरे     मिरज
40           वेदराज संतोष सोनकर    सांगली
41           वेदांत शहाजी जाधव      सांगली
42           शौनक मंगेश विदर       कराड
43           श्रीया राजेश्वर वराह माने  औरंगाबाद
44           श्रेया भगवान गोरडे       औरंगाबाद
45           श्रेया सुरेश यादव        फलटण
46           संस्कृती प्रशांत देशमुख   औरंगाबाद
47           सरगम राजप्रीत सिंग     बारामती
48           सर्वज्ञ किरण असोलीकर   औरंगाबाद
49           साई गोपीचंद यादव       फलटण
50           साधना दत्तात्रेय खुळे      चिखली
51           सिद्धी हरिशंकर खेडकर   औरंगाबाद
      राखीव - वरीलपैकी कोणी येऊ न शकल्यास पुढील स्पर्धकांना संधी देण्यात येईल - 
            52 वरद विशाल तुपे – सांगली.
            53 आर्यन मनोज पाटणकर – सांगली.
            54 वैष्णवी सुभाष पाटील – सांगली. 
            55 अवंती धनंजय निंबाळकर - फलटण
            56 प्रिया विवेक काकडे - फलटण

वरील सर्व स्पर्धकांनी 4 मार्च 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे हजर रहावे. त्या आधी आपण येत असल्याचे 9552526909 या क्रमांकवर संजय मा. क. यांना कळवावे. अधिक सूचना  व्हॉटसप समूहावर कळवण्यात येतील. 

 English Translation is available below the Marathi questionnaire. 

विज्ञान रंजन प्रतियोगिता की हिंदी प्रश्नावली नीचे दी हुई है.

सूचना * प्रवेशमूल्य नाही * वयाची अट नाही * शिक्षणाची अट नाही * खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनानेकोणालाही विचारूनइतरत्र शोधूनप्रत्यक्ष प्रयोग करून मिळवावी * उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 17 फेब्रुवारी 2023 पूर्वी - मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030 येथे पोचवावी * प्राथमिक विजेत्यांची नावे 26 फेब्रुवारी 2023 ला जाहीर केली जातील.

* प्राथमिक विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरी 5 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे होईल 

* उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे * परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील * आपल्या उत्तरपत्रिकेसोबत पुढील माहिती लिहून पाठवावी

   1. संपूर्ण नाव2. पत्ता, 3. संपर्कासाठी दूरध्वनी/भ्रमणभाष, 4. ई-मेल. 5. जन्मतारीख, 6. शिक्षण, 7. व्यवसाय, 8. पुढावा गुण *

* शैक्षणिक पात्रता आणि वय   लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत (10), सातवीपर्यंत (9), दहावीपर्यंत (7). बारावीपर्यंत (5), पदवीपर्यंत (3), शास्त्र-शाखा (0)
वय वर्षे: 13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2), 61 ते 80 (4), 81च्यावर (6)

संपर्क– शशी भाटे 9420732852/ संजय मा.क.9552526909/ राजेंद्रकुमार सराफ 9822186763/ विनय र. र. 9422048967

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 प्रश्नावली

प्रश्न 1 - निरीक्षण करून उत्तर लिहा (गुण 10)
1.      एक टक एक मिनिट टिव्हीकडे बघून डोळे मिटले की डोळ्यांसमोर काय दिसते?
2.      खेळाच्या पत्त्यातील कोणते पत्ते 180 अंशात फिरवले तर वेगळे दिसतात?
3.      घड्याळात तास आणि मिनिट काट्यात शून्य कोन झाल्यानंतर पुन्हा किती काळाने शून्य कोन होतो?
4.      ‘झिंगलेल्या झुंजाररावाने झाडावरून झेब्र्यावर झेप घेतली’ - यात कोणत्या झ चे उच्चार वेगवेगळे होतात?
5.      खांद्यांवरून घेतलेले दप्तर पाठीवर अडकवण्यासाठी दोन्ही बंदांची लांबी कमीत कमी किती असायला हवी?
6.      पवनचक्कीचा पंखा कोणत्या दिशेत फिरतो?
7.      पांढरा कागद व निळ्या शाईने रंगवलेला कागद जाळल्यास ज्योतीच्या रंगात कोणता फरक आढळतो?
8.      मोबाईलमध्ये लोहचुंबक कोठे आहे? चित्र काढा.
9.      सरळ रस्त्यावर नेहमीच्या वेगाने चालताना एका श्वासोच्छ्वासात किती पावले पडतात?
10.   स्पर्शाने 200 रुपयाची नोट कशी ओळखणार?
प्रश्न 2 - मी/आम्ही कोण? (गुण 10)
1.      सूर्याचा ताप लागू नये म्हणून मी कार्य करतो. माझी आठवण तुम्ही 16 सप्टेंबरला काढता.
2.      सफेद रंगाचा, चवीला तिखट, हळदीला करतो, विटकरी लालट. मी कोण?
3.      नाक चिमटीत पकडून - आमचा उच्चार तुम्ही करूच शकत नाही.
4.      सी. व्ही. रमणचे नाव लावतो एक दोन तीन दोनदा घेतो.
5.      शंभर प्रकारचे दहा लाख पक्षी सांभाळतो, इरावती डॉल्फीनना घर देतो. मी कोण?
6.      मी ग्रह नाही पण मला चंद्र आहे. मला सूर्याभोवती फेरी मारायला 557 वर्षे लागतात.
7.      मला 1990 मध्ये आकाशात सोडले. मी 2030 पर्यंत तरी तुम्हाला विराट विश्वाचे दर्शन घडवणार.
8.      दोन पायावर धावणार, ताशी 60 किलोमीटर, मेंदू पेक्षा मोठे डोळे, मला ओळखा बरोबर!
9.      गोगलगायीचे रक्त माझ्यामुळे निळे असते, मी कोण?
10.   200 चा समूह आमचा, वसतो समुद्रकिनारी, मुन्नार आखातामध्ये, तमिळनाडू शेजारी.
प्रश्न 3 - थोडक्यात उत्तर स्पष्ट करा – (गुण 20)
1.      तुमचे वजन करा. त्यावरून तुमच्या शरीरात असणाऱ्या ऑक्सिजन आणि हैड्रोजनचे प्रमाण लिहा.
2.      एक पिंट पाणी किती कप असते? किती मिलीलिटर?
3.      कोणाच्या अंगी प्रकाशापासून अन्न तयार करण्याचा गुण आहे? कोणत्या रसायनामुळे?
4.      गुन्हा न करूनही कोणाकोणाला तुरुंगात राहावे लागते?
5.      चाकाच्या शोधाबरोबर कोणता शोध लागल्यामुळे वाहन बनू शकले?
6.      तुमच्या दोन डोळ्यांमध्ये सर्वात कमी अंतर कोणत्या स्थितीत असते?
7.      बँकेचे व्यवहार मोबाईल द्वारे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रचनेचे लघू आणि पूर्ण नाव लिहा?
8.      भारतात कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे? किती?
9.      दूर जाणाऱ्या वा जवळ येत असणाऱ्या वेगवान गाडीच्या शिट्टीच्या आवाजात कोणता फरक पडतो?
10.   2023 च्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे घोषवाक्य कोणते आहे? त्याचा अर्थ काय?
प्रश्न 4 – चूक/बरोबर? स्पष्ट करा. चूक असेल तर दुरुस्त करा.  (गुण 20)
1.      तिखट वेफर्स खाल्ले तरी शेवटी गोडच लागतात.
2.      चौरस आकाराच्या कागदापासून बनवलेल्या होडीची उंची कागदाच्या लांबीएवढी असते.
3.      मध शुद्ध असेल तर त्यात साखरेचे स्फटिक होत नाहीत.
4.      दहा वर्षाखालील मुलामुलींनी दुपारची झोप घेतली की त्यांची उंची वाढते.
5.      गायी कुरणात चरल्या तर गवत चांगले वाढते.
6.      प्रत्येक घन पदार्थ उष्णतेचा वाहक असतो.
7.      नेत्रदान करताना AB रक्तगटाच्या व्यक्तीला AB रक्तगटाच्या व्यक्तीचाच डोळा लागतो.
8.      हरबऱ्याच्या काढ्यामुळे दात बळकट होतात - असा शोध डॉ. कमल सोहोनी यांनी लावला.
9.      भारतात पडणारा पाऊस दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्र गरम झाला की वाढतो.
10.   संगणक कंपन्या आपल्या सिस्टीमवर सायबर हल्ले करण्यासाठी मुद्दाम पगारी नोकर ठेवतात.
प्रश्न 5 - वैज्ञानिक कारण द्या– (गुण 20)
1.      कोरडे बिस्कीट अखंड असते मग भिजलेले बिस्कीट गळून का पडते?
2.      उतारावरून जाताना वाहन न्यूट्रलमध्ये असावे की नसावे? का?
3.      कमाल तापमान दुपारी बारा वाजता का नसते?
4.      कृष्णा आणि कोयना यात नदी कोणती आणि उपनदी कोणती? कारण काय?
5.      बर्फाला बोट लावले तर ते ओढून काढावे लागते.
6.      कोरड्या हवेत बाष्प मिसळले तर ती हलकी होते.
7.      पावसाचे मोजमाप सेंटीमीटर मध्ये का करतात, लिटर मध्ये का नाही?
8.      वाहनाच्या चाकांमध्ये हवा भरताना कोणत्या चाकात किती हवा भरतात? का?
9.      सूर्योदयाच्या नंतर सुद्धा तापमान काही काळ उतरत राहते. ते का?
10.   वातकुक्कुटाची चोच आणि वाऱ्याची दिशा यांचा संबंध काय? कारण काय?
प्रश्न 6 - अनेक उत्तरे लिहा– (गुण 20)
1.      दोन संख्यांचा गुणाकार 60 आहे तर त्यांच्या वर्गांचा गुणाकार किती?
2.      एका सतरंजीवर दोन माणसे झोपतात. कोणी डोके भिंतीकडे करते तर कोणी भिंतीच्या विरूद्ध बाजूला. कोणी कुशीवर, किवा पालथे किंवा उताणे झोपतात. तर दोन माणसे किती प्रकारे झोपू शकतील? माणसांची संख्या वाढवत नेली तर ती किती प्रकारे झोपू शकतील? झोपण्याचे प्रकार आणि माणसांची संख्या यात गणिती संबंध काय आहे?
3.      कोणकोणत्या झाडांच्या नावावरून गावांची नावे पडली आहेत? किमान 12 नावे लिहा.
4.      फुले मधमाशांना मकरंद देतात तर मधमाशा परागण करतात. अशा प्रकारे एकमेकांना जगण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सजीवांच्या चार जोड्यांची नावे लिहा आणि त्यांच्यातील देवघेवीचे वर्णन थोडक्यात करा.
5.      चार वेगळ्या प्रकारच्या कृती करताना एका मिनिटात होणारे श्वास आणि हृदयाचे ठोके यांचे मापन आणि गुणोत्तर कसे बदलते?
प्रश्न 7 चित्र काढून उत्तरे द्या – (गुण 15)
1.      गोलात दोन डोळे आणि तोंड यांचा वापर करून कोणकोणत्या किमान पाच भावना दाखवता येतात?
2.      तुमच्या फोटोवरून नाकाचे क्षेत्रफळ आणि चेहऱ्याचे क्षेत्रफळ मोजा. त्यांचे गुणोत्तर किती आहे?
3.      आगपेटीतील काड्यांच्या रचना करून कोणते अंक लिहीता येतात? त्यातील कोणते अंक एक काडी काढून बदलतात? कोणते एक काडी हलवून बदलतात?
प्रश्न 8 प्रयोग करा निष्कर्ष लिहा – (गुण 20)
1.      गोमुखासन करताना दोन्ही हात पाठीशी जुळवायचे असतात. किती जणांचे हात जुळतात? डावा वर असताना जुळतात? उजवा वर असताना जुळतात? किमान 20 जणांची पाहणी करा. त्यावरून वरील प्रश्नांच्या उत्तरांची कारणमीमांसा करा.
2.      गरम पाण्याचा बर्फ लवकर होतो - हे विधान तपासून बघण्यासाठी प्रयोग करून बघा. साहित्य, कृती, निरीक्षण, निष्कर्ष लिहा.
3.      चौरस कागदापासून वेगवेगळ्या तीन प्रकारच्या होड्या बनवा. प्रत्येक होडी पाण्यात सोडली तर तिच्या किती पृष्ठभागाला पाणी लागते? आकृत्या काढून उत्तरे द्या.
4.      दहा रुपयाच्या नाण्यात दोन वेगवेगळ्या धातूंच्या चकत्या असतात. त्या धातूंची घनता मोजायची आहे कशी मोजणार? प्रयोग करून लिहा.
प्रश्न 9 माहितीपूर्ण लेख लिहा – (गुण 15)
2023 हेआंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ आहे. भरड धान्य म्हणजे काय? ते खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात? शेतीवर, पर्यावरणावर, उत्पन्नावर कोणते परिणाम होतात? भरड धान्याचे उत्पादन वाढवायचे असेल तर कोणते उपाय करावे लागतील?


ENGLISH TRANSLATION
Vidnyan Ranjan Competition 2023
* No entrance fee.* Attractive prizes. * You can find the answers to the questions given below, on your own, by asking anyone, by searching anywhere, or by performing the experiments yourself. * Answer as many questions as you can on a foolscap paper.
* Send your answers to - *Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag, Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune 411030 before 17th February 2023.* * Winners of the preliminary round will be announced on 27th February 2023.* Decisions of the judges are considered final.
*The final round will be held on 5th March 2023 at Pimpri Chinchwad Science Park. * The final round consists of practical experiments * Scores will be normalized across age groups and educational qualifications by giving bonus points according to the following tables -             
*Bonus Points: (in parentheses)*
*By Age:* Up to 13 years (6), 14 to 16
(4), 17 to 20 (2), 41 to 60 (2), 61 to 80 (4), and Beyond 81 years(6).
*By Educational Qualification:* Up to 5th Standard (10), Up to 7th (9), Up to 10th (7), Up to 12th (Non-science Branch) (5), Graduate (Non-Science Branch)(3), 11th or higher (Science Branch)(0).
Send your answer papers along with the following information -
1. Full Name, 2 Address With PIN Code, 3. Telephone / Mobile Phone Number, 4 E-Mail ID, 5.Date of Birth, 6.Educational Qualification, 7.Occupation, 8. Bonus Points: By Age + By Educational Qualification.

Questionnaire
*Q. 1 - Observe and Answer (Marks 10)*
1. Watch TV for a minute without blinking your eyes, and close your eyes, what do you see?
2. Which of the playing cards looks different if rotated by 180 degrees?
3. Find when the angle between the ‘minute hand and hour hand’ of a clock is zero. How much time it takes to become zero again?
4. "झिंगलेल्या झुंजाररावाने झाडावरून झेब्र्यावर झेप घेतली." or "Are all Americans atheists?",  Check for various  prononciations of the letter झ or A in given sentence.
5. What should be the minimum length of both the shoulder straps to hang the bag on one back?
6. In which direction does the fan of a windmill rotate?
7. What is the difference between the colour of the flames of burning white paper and paper painted with blue ink?
8. Find the place of a magnet in a mobile phone? Draw a picture.
9. How many steps are taken in one breath while walking at normal speed on a straight road?
10. How to recognize a 200 rupee note by touch?

*Que. 2 - Who am I/we? (10 marks)*
1. I protect you from the burns of the Sun. You remember me on September 16.
2. White in colour, and hot in taste, I turn turmeric to brick red.
3. Pinch your nose and you can't pronounce us.
4. Named after C V Raman, I use one, two, and three twice.
5. I am a home to million birds of hundred types and to Irawati Dolfins too.
6. I am not a planet but I have a moon. It takes me 557 years to go around the Sun.
7. I was released in the sky in 1990. I'll show you the vast universe till 2030.
8. I run on two legs, 60 kilometers per hour, recognize me right with a brain smaller and eyes bigger!
9. A snail's blood is blue because of me, who am I?
10. We are a group of 200, who live on the coast, in the Gulf of Munnar, neighboring Tamil Nadu.


*Q. 3 - Answer in brief – (20 marks)*
1. Weigh yourself. Write down the amount of oxygen and hydrogen you have in your body.
2. How many cups make a “Pint” of water? How many milliliters?
3. Who can produce food from light? Because of which chemical?
4. Who stays in prison, without committing a crime?
5. Along with the invention of the wheel, which invention helped make a cart?
6. which position has the shortest distance between your two eyes?
7. Write the acronym and full form of the framework used for doing banking transactions through mobile?
8.  Which state in India has the longest coastline? how much?
9. What difference is heard in the sound of the horn of a speeding vehicle going away from you and coming towards you?
10. What is the slogan for National Science Day 2023? What is its meaning?

*Q. 4 – State true/false. Justify your answer and correct it if false. (marks 20)*
1. Though the wafers are spicy, it tastes sweet at the end.
2. A boat made of square-shaped paper has a height equal to the length of the paper.
3. Pure honey does not develop sugar crystals.
4. Children below ten years of age increase their height when they take an afternoon nap.
5. If the cows graze in the pasture, the grass grows better.
6. Every solid is a conductor of heat.
7. A blind person of the AB blood group should get an eye from a donor of the AB blood group only.
8. Dr. Kamal Sohoni discovered that the extract of gram helps strengthen your teeth.
9. The rainfall in India increases when the sea on the west coast of South America warms.
10.   Computer companies deliberately hire employees to carry out cyber attacks on their systems.

*Q. 5 – Give Scientific Reason – (20 Marks)*
1. Biscuits are intact and crunchy when dry but turn limp on wetting?
2. While going downhill should a vehicle be kept in neutral gear or not? why?
3. Why is the maximum temperature not observed at 12 noon?
4. Which is a tributary among Krishna and Koyna? Why?
5. If you put your finger on the ice, it sticks there.
6. Vapor mixed in dry air, makes the air lighter.
7. Why is the rainfall measured in centimeters and not in liters?
8. How much air is filled in the front and rear wheels of a vehicle? What’s the reason?
9. Why temperature continues to drop for some time after sunrise?
10. What is the relation between the direction of the beak of a weathercock and the wind? What is the reason?


*Q. 6 – Write Multiple Answers– (20 Marks)*
1. If the product of two numbers is 60, what is the product of their squares?
2. Two persons can sleep on a bed, with a head towards or away from the wall with a back up or stomach up or sideways. In how many ways can two persons sleep? How many positions can occur if the number of persons is increased? What is the mathematical relationship between the variety of positions and the number of persons on the bed?
3. Which Villages are named after any trees? Write at least 12 such names.
4. Flowers provide nectar to bees while bees pollinate them. Name four pairs of living organisms that cooperate with each other to survive in this way and briefly describe their interactions.
5. How do the measurements and ratios of breaths per minute and heartbeats change during four different types of activities?


*Q 7– Draw a picture (Marks 15)*
1. Draw at least five emotions that can be shown using two eyes and a mouth in a sphere?
2. Measure the nose area and face area from your photo. What is their ratio?
3. Make digits using match sticks. Which of these digits change by removing one stick? Which ones change by moving a stick?

*Q 8 – Do experiment and write a conclusion – (20 Marks)*
1. While doing “Gomukhasana”, both hands should join at the back. How many people can join hands? How many can do it when the left hand is up? How many when the right hand is up? Inspect at least 20 people. Based on that, reason out the answers to the above questions.
2.  Hot water freezes faster - try an experiment to verify this statement. Describe your experience in the usual format Aim, material, procedure, observation, conclusion, etc.
3. Make three different types of boats from square paper. Place each boat on the water. Observe, how much surface area of that boat touches water? Draw figures as well.
4. A ten rupee coin consists of two different metal discs. How to measure the density of those metals? Do experiment and write

*Q. 9 – Write an Informative Article – (15 Marks)*
2023 is the 'International Year of Millets’. What are millet/coarse grains? How do they affect our health? What are the impacts of millets on agriculture, the environment, and economics? What measures would increase the production of Millet/coarse grains?


प्रश्नावली

*प्रश्न 1 - निरीक्षण करें और उत्तर दें (अंक 10)*
1. एक मिनट के लिए बिना पलकें झपकाए टीवी देखें, और अपनी आंखें बंद करें, आप क्या देखते हैं?
2. 180 डिग्री घुमाने पर कौन सा ताश का पत्ता अलग दिखता है?
3. किसी घड़ी की 'मिनट की सुई और घंटे की सुई' के बीच का कोण शून्य होने पर ज्ञात कीजिए। फिर से शून्य होने में कितना समय लगता है?
4. "झिंगलेल्या झुंझाररावाने झाडावरून झेब्र्यावर झेप घेतली।" या "Are all Americans atheist?”, दिए गए वाक्य में या A अक्षर के विभिन्न उच्चारणों की जांच करें।
5. बैग को पीठ पर टांगने के लिए दोनों शोल्डर स्ट्रैप की न्यूनतम लंबाई कितनी होनी चाहिए?
6. पवनचक्की का पंखा किस दिशा में घूमता है?
7. जलती हुई सफेद कागज की लपटों और नीली स्याही से रंगे कागज की लपटों के रंग में क्या अंतर है?
8. मोबाइल फोन में चुंबक का स्थान ज्ञात करें? चित्र निकालकर दिखाए।
9. सीधी सड़क पर सामान्य गति से चलते हुए एक सांस में कितने कदम चलते हैं?
10. छूकर 200 रुपए के नोट को कैसे पहचानें?
 
प्रश्न 2 - मैं/हम कौन हूँ/हैं ? (10 अंक)
1. मैं तुम्हें सूर्य की जलन से बचाता हूं। आप मुझे 16 सितंबर को याद करते हैं।
2. रंग में सफेद, और स्वाद में गर्म, मैं हल्दी को ईंट लाल कर देता हूं।
3. अपनी नाक को बंद कर के आप हमें उच्चारण नहीं कर सकते।
4. सी वी रमन के नाम पर, मैं एक, दो और तीन का दो बार उपयोग करता हूं।
5. मैं सौ प्रकार के लाखों पक्षियों और इरावती डॉल्फ़िन का भी घर हूँ।
6. मैं कोई ग्रह नहीं हूं लेकिन मेरे पास एक चंद्रमा है। मुझे सूर्य की एक परिक्रमा करने में 557 वर्ष लगते हैं।
7. मैं 1990 में आकाश में छोड़ा गया था। मैं आपको 2030 तक विशाल ब्रह्मांड दिखाऊंगा।
8. मैं दो पैरों पर दौड़ता हूँ, 60 किलोमीटर प्रति घंटे की रफ़्तार से, मुझे सही पहचानो, जिसका दिमाग छोटा और आँखें बड़ी हैं!
9. घोंघे का खून मेरे कारण नीला होता है, मैं कौन हूँ?
10. हम 200 का समूह हैं, जो तमिलनाडु के पड़ोसी मुन्नार की खाड़ी में तट पर रहते हैं।
 
प्रश्न 3 - उत्तर संक्षेप में - (20 अंक)
1. अपना वजन करें। आपके शरीर में ऑक्सीजन और हाइड्रोजन की मात्रा लिखिए।
2. कितने कप पानी का "पिंट" बनाते हैं? कितने मिलीलीटर?
3. प्रकाश से भोजन कौन बना सकता है? किस केमिकल की वजह से?
4. बिना अपराध किए जेल में कौन रहता है?
5. पहिये के आविष्कार के साथ किस आविष्कार ने गाड़ी बनाने में मदद की?
6. आपकी दोनों आँखों के बीच सबसे कम दूरी किस स्थिति में होती है?
7. मोबाइल के माध्यम से बैंकिंग लेनदेन करने के लिए उपयोग किए जाने वाले ढांचे का संक्षिप्त नाम और पूर्ण रूप लिखें?
8.  भारत के किस राज्य की तटरेखा सबसे लंबी है? कितनी?
9. तेज रफ्तार से चलनेवाले वाहन के हॉर्न की आवाज में क्या अंतर सुनाई देता है जो आपसे दूर जा रहा है और आपकी ओर आ रहा है?
10. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 का नारा क्या है? इसका अर्थ क्या है?
 
प्रश्न 4 - सही/गलत बताएं। अपने उत्तर का औचित्य सिद्ध करे और यदि गलत है तो सही करे। (अंक 20)
1. हालांकि वेफर्स मसालेदार होते हैं, लेकिन अंत में इसका स्वाद मीठा लगता है।
2. वर्गाकार कागज से बनी एक नाव की ऊँचाई कागज की लंबाई के बराबर होती है।
3. शुद्ध शहद में चीनी के स्पटीक नहीं बनते।
4. दस साल से कम उम्र के बच्चे जब दोपहर की झपकी लेते हैं तो उनका कद बढ़ जाता है।
5. यदि गायें चरागाह में चरती हैं तो घास अच्छी तरह उगती है।
6. प्रत्येक ठोस ऊष्मा का सुचालक होता है।
7. AB रक्त समूह के दृष्टिहीन व्यक्ति को AB रक्त समूह वाले व्यक्ति से ही आँख लगवानी चाहिए।
8. डॉ. कमल सोहोनी ने पाया कि चने का अर्क आपके दांतों को मजबूत बनाने में मदद करता है।
9. दक्षिण अमेरिका के पश्चिमी तट पर स्थित समुद्र के गर्म होने पर भारत में वर्षा की मात्रा बढ़ जाती है।
10. कंप्यूटर कंपनियां अपने सिस्टम पर साइबर अटैक करने के लिए जानबूझकर कर्मचारियों को नौकरीपर रखती हैं।
 
प्रश्न 5 - वैज्ञानिक कारण दें - (20 अंक)
1. बिस्किट सूखने पर बरकरार और कुरकुरे होते हैं लेकिन गीले होने पर गिर जाते हैं?
2. ढलानपर से जाते समय वाहन को न्यूट्रल गियर में रखना चाहिए या नहीं? क्यों?
3. अधिकतम तापमान दोपहर के समय क्यों नहीं देखा जाता है?
4. कृष्णा और कोयना इनमें से सहायक नदी कौन सी है? क्यों?
5. अगर आप बर्फ पर उंगली रखेंगे तो वह वहीं चिपक जाती है.
6. शुष्क वायु में वाष्प मिश्रित होने से वायु हल्की हो जाती है।
7. वर्षा को लीटर में नहीं, सेंटीमीटर में क्यों मापा जाता है?
8. किसी गाड़ी के आगे और पीछे के पहियों में कितनी हवा भरी होती है? क्या कारण है?
9. सूर्योदय के बाद कुछ समय तक तापमान में गिरावट क्यों जारी रहती है?
10. वायुकुक्कुट की चोंच की दिशा और हवा के बीच क्या संबंध है? कारण क्या है?
 
प्रश्न 6 - एकाधिक उत्तर लिखें- (20 अंक)
1. यदि दो संख्याओं का गुणनफल 60 है, तो उनके वर्गों का गुणनफल क्या है?
2. दो व्यक्ति बिस्तर पर सो सकते हैं, सिर को दीवार की ओर या दीवार से दूर, पीठपर या पेटपर या बग़ल में। दो व्यक्ति कितनी तरह से सो सकते हैं? यदि व्यक्तियों की संख्या बढ़ाई जाए तो कितने पद हो सकते हैं? पदों की विविधता और बिस्तर पर व्यक्तियों की संख्या के बीच गणितीय संबंध क्या है?
3. किन गांवों का नाम किसी पेड़ के नाम पर रखा गया है? ऐसे कम से कम 12 नाम लिखो।
4. फूल मधुमक्खियों को अमृत प्रदान करते हैं जबकि मधुमक्खियां उनका परागण करती हैं। चार जीवित जीवों के जोड़े का नाम बताइए जो इस तरह से जीवित रहने में सहयोग करते हैं, संक्षेप में उनके सहयोग का वर्णन करें।
5. चार अलग-अलग प्रकार की गतिविधियों के दौरान प्रति मिनट सांसों और दिल की धड़कनों का माप और अनुपात कैसे बदलता है?
 
प्रश्न 7– चित्र बनाएँ (अंक 15)
1. कम से कम पाँच ऐसे भाव बताएँ जिन्हें एक गोले में दो आँखों और एक मुँह से दिखाया जा सके?
2. अपने फोटो से नाक के क्षेत्र और चेहरे के क्षेत्र को मापें। उनका अनुपात क्या है?
3. माचिस की तीलियों से अंक बनाओ। इनमें से कौन सा अंक - एक तिली को हटाने से बदल जाता है? - कौन सी तिली हिलाने से बदल जाती है?
 
प्रश्न 8 – प्रयोग करें और एक निष्कर्ष लिखें – (20 अंक)
1. गोमुखासन करते समय दोनों हाथों को पीछे की ओर मिलाना चाहिए। कितने लोग हाथ जोड़ सकते हैं? बायां हाथ ऊपर होने पर कितने लोग इसे कर सकते हैं? दाहिना हाथ ऊपर होने पर कितने? कम से कम 20 लोगों का निरीक्षण करें। इसके आधार पर उपरोक्त प्रश्नों के उत्तर तर्क कीजिए।
2.  गर्म पानी तेजी से जमता है - इस कथन को सत्यापित करने के लिए एक प्रयोग करके देखें। लक्ष्य, सामग्री, प्रक्रिया, अवलोकन, निष्कर्ष आदि के सामान्य प्रारूप में अपने अनुभव का वर्णन करें।
3. वर्गाकार कागज से तीन अलग-अलग प्रकार की नावें बनाओ। प्रत्येक नाव को पानी पर रखो। देखें कि उस नाव का कितना पृष्ठीय क्षेत्रफल पानी को छूता है। आकृतियाँ भी बनाइए।
4. दस रुपये के सिक्के में दो अलग-अलग धातु की डिस्क होती हैं। उन धातुओं के घनत्व को कैसे मापें? प्रयोग करो और लिखो।
 
प्रश्न 9 - एक सूचनात्मक लेख लिखें - (15 अंक)
2023 'Millet/बाजरा का अंतर्राष्ट्रीय वर्ष' है। Millet/बाजरा/मोटा अनाज क्या है? वे हमारे स्वास्थ्य को कैसे प्रभावित करते हैं? Millet/बाजरा का कृषि, पर्यावरण और अर्थव्यवस्था पर क्या प्रभाव पड़ता है? Millet/बाजरा/मोटे अनाज के उत्पादन में किन उपायों से वृद्धि होगी?

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला लवकरच संपर्क केला जाईल.