Thursday, January 25, 2024

विज्ञान रंजन स्पर्धा 2024

विज्ञान रंजन स्पर्धा 2024.  (उत्तरे प्रश्नावलीच्या शेवटी दिली आहेत)
विज्ञान रंजन स्पर्धेत 
ग्रामीण भागातील स्पर्धकांची सरशी

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांना खुली विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली. यात ग्रामीण भागातील स्पर्धकांची सरशी झाली. पुणे जिल्ह्यातील, खेड येथील पूर्वा करंडे प्रथम आली, तर सातारा जिल्ह्यातील माण मधील माही कलढोणे दुसरी आली. तिसऱ्या क्रमांकावर कराड येथील सई उमेश गुरव, सानिका उढाणे व वेदांत बच्चे यांचे क्रमांक लागले. याशिवाय दहा स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. या स्पर्धेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, संभाजीनगर या जिल्ह्यांतून पाचशे विद्यार्थी तसेच विद्यार्थेतर व्यक्तींनी भाग घेतला. आपल्या आसपास असणाऱ्या अनेक गोष्टीत विज्ञान भरलेले असते हे या स्पर्धेच्या निमित्ताने समजले असे उद्गार स्पर्धकांनी काढले. अंतिम फेरीमध्ये दोन तासात दहा प्रयोग करायचे होते. हे प्रयोगही आपल्या रोजच्या जगण्यात सहज करता येतील असे होते. बासरीतील विज्ञान, हवेचा दाब किती रुपये?, मूठभर डाळीचा हातभर पसारा, भेंडीतील बियांची रचना, बीज निरीक्षणे, उंची आणि अंतर, भूमिती संकल्पना, शरीरातील गोल्डन रेशो मोजणे, इत्यादी दहा प्रयोग दिले होते. 
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांच्या हस्ते रोख पारितोषिक वितरण करण्यात आले. बॉक्स ऑफ सायन्स तर्फे पहिल्या पंधरा स्पर्धकांना विज्ञान प्रयोगांचे किट देण्यात आले. विज्ञान परिषदेतर्फे अंतिम फेरीतील सर्व सहभागींना विज्ञान विषयक पुस्तके भेट देण्यात आली. 


*विज्ञान रंजन स्पर्धा 2024* 
 पारितोषिक विजेत्यांची यादी 
रोख रक्कम, सायन्स किट आणि विज्ञान पुस्तके पारितोषिक म्हणून देण्यात आली 

प्रथम - रू. 3000
* पूर्वा ज्ञानेश्वर करंडे, खेड

द्वितीय - रु. 2000 प्रत्येकी
* माही रमेश कलढोणे, माण सातारा

तृतीय - रु. 1000 प्रत्येकी
* सई उमेश गुरव, कराड
* सानिका अरुण उढाणे, खेड
* वेदांत रघुनाथ बच्चे, खेड

उत्तेजनार्थ - रु 500 प्रत्येकी 
* श्रेया उमेश पाटोळे, खेड
* रिचा सुनील जाधव, वाई
* मानसी गणपत भुजबळ, खेड
* मैथिली मिलिंद चव्हाण, कराड
* वैष्णव अमित जाधव, खेड
* अर्णव राहुल शिंदे, संगमेश्वर
* सानिका सोमनाथ घोरपडे, तासगाव
* श्रावणी मनोज पाटोळे, खेड
* आयुष गणेश भुजबळ, रानमळा
* अनया रत्नाकर कांबळे, कराड

अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना विज्ञान पुस्तके पारितोषिक रूपात देण्यात आली

प्राथमिक फेरीतील अन्य विजेत्यांची नावे 
1 आदिबा जहांगीर तांबोळी - फलटण, सातारा
2 आसावरी नेताजी माशालकर - कोल्हापूर
3 आदिती चंद्रशेखर शेटे - कराड
4 अमृता अवधूत साळवी जयसिंगपुर
5 अनघा संजयकुमार सखळे जयसिंगपुर
6 अनुजा अत्ताम बोरडे चिखली, पुणे
7 अनुष्का उमेश हिवरे कराड
8 अर्णव दिलीप साळुंके गोवे, सातारा
9 आशीष अनिल राऊत फळटण, सातारा
10 आयुष किशोर कांबळे शिरोळ, कोल्हापूर
11 चंचल संतोष पैठण, संभाजीनगर
12 दंड सुदर्शन विकास केज, बीड, महाराष्ट्र
13 दर्शना प्रशांत पाटील कराड
14 दोंधवद प्रिती उत्तम तासगाव, सातारा
15 दुर्गा दीपक पवार कराड, सातारा
16 घोगरे सार्थक सोपण
17 जाह्नवी संदीप अटकरे सारारा
18 जाह्नवी प्रल्हाद रांडिवे पुणे
19 जयकीर्ती शशिकुमार रांडिवे फळटण, सातारा
20 ज्योती हेमंतकुमार कोराटकर चिखली, पुणे
21 किशन कुमार यादव पुणे
22 गायत्री विद्याधर देशपांडे सांगली
23 ओम राहुल नाळे फळ्टण, पुणे
24 पराग तुकाराम शिंदे फळटण, सातारा
25 परमजीत सिंह भाटिया पुणे
26 प्रीती तुषार पैठणकर चिखली, पुणे
27 प्रिया विवेक काकडे फळटण, सातारा
28 राजलक्ष्मी सयाजीराव शिंदे शिरोळ, कोल्हापूर
29 राजनंदिनी राहुल गर्गे पुणे
30 रोहन संजय पाटील सांगली
31 रुद्र संजय बारकडे लिंब, सातारा
32 साई गोपीचंद यादव फळटण, सातारा
33 समा ममशादली काजी कराड
34 शक्ति अजय पाठक दुर्जनसिंग पगा
35 शिवम रामखिलावण प्रजापती पुणे-३०
36 श्रद्धा अमित पाटील सातारा
37 श्रावणी प्रकाश पाटील कराड
38 श्रावणी पुजारी गोवे, सातारा
39 श्रावणी सतीश संधभोर खेड, पुणे
40 श्रावनी प्रल्हाद रांडिवे पुणे
41 श्रेया सुरेश यादव फळटण, सातारा
42 श्रिया राजेंद्र मोहिते तासगाव, सातारा
43 सिद्धेश संतोष आगवणे फळटण, सातारा
44 विकास सिद्धप्पा मोटे शिरोळ, कोल्हापूर
45 वाघ योगेश पुरुषोत्तम छत्रपती संभाजीनगर

स्पर्धकाचे नाव * गाव * वर्ग या क्रमाने 
या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे पाठविण्यात येत आहेत.
अंजली धनाजी कुबेर * पुणे * सहभागी
अक्षता अमोल अत्रे * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
अक्षदा शिवाजी पाठे * * उत्तीर्ण
अक्षरा कैलास लिखे * छत्रपती संभाजीनगर * प्रथम वर्ग
अक्षरा रामा मलेडिया * * उत्तीर्ण
अक्षरा संजय गायकवाड * पुणे * सहभागी
अजय गोपाल नरवाडे * रांजणी * सहभागी
अजय रामेश्वर कोलते * वडवळ * सहभागी
अथर्व दीपक माने * जयसिंगपूर * उत्तीर्ण
अथर्व बाबुराव पाटील * घाटकोपर मुंबई * उत्तीर्ण
अथर्व लहू कांबळे * शिरोळ कोल्हापूर * उत्तीर्ण
अदिती रामचंद्र नऱ्हे * पुणे * उत्तीर्ण
अदिती शरद फांदाडे * चितेगाव * प्रथम वर्ग
अनम कासिम मुल्ला * पुणे * सहभागी
अनिकेत गजानन खाकरे * वडवळ * उत्तीर्ण
अनिरुद्ध देविदास जगताप * निगोडे गाव * उत्तीर्ण
अनुप अजित नरदे * धरणगुत्ती * प्रथम वर्ग
अनुराधा राजेंद्र साठे * मोहोळ सोलापूर * सहभागी
अनुषका उमेश घरत * पुणे * सहभागी
अनुष्का आप्पा आगवणे * पुणे * सहभागी
अनुष्का रुपाली नितिन निळखंड * पुणे * द्वितीय वर्ग
अपूर्व शरद कांबळे * जयसिंगपूर * प्रथम वर्ग
अपेक्षा शाम निकम * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
अभिनव सतीश जंगम * फलटण सातारा * प्रथम वर्ग
अरबाज मुक्तार तांबोळी * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
अर्जुन साठे * मोहोळ सोलापूर * सहभागी
अर्णव देवदत्त खापर्डे * पुणे * विशेष
अर्थव अमित खाडे * फलटण सातारा * प्रथम वर्ग
अर्पिता प्रकाश पालांडे * पुणे * सहभागी
अर्पिता शरद आतकरे * मोहोळ सोलापूर * उत्तीर्ण
अलोक जितेंद्र बेलेकर * चांदवड नाशिक * सहभागी
अलोक ज्ञानेश्वर गोरडे * * सहभागी
अल्फिया इब्राहिम शेख * पुणे * सहभागी
अविनाश भगवान नेहरकर * जयसिंगपूर * उत्तीर्ण
आकांक्षा अशोक बोडके * वडवळ * उत्तीर्ण
आकांक्षा दिलीप भेगडे * पुणे * सहभागी
आगान साक्षी रवींद्र * येणेरे * प्रथम वर्ग
आचल जगन्नाथ कुसाळकर * पुणे * उत्तीर्ण
आजाद विनोद पाटील * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
आदर्श कुमार पवार * जयसिंगपूर * प्रथम वर्ग
आदिती अशोक जागडाळे * सातारा * विशेष
आदिती किशोर देसाई * जयसिंगपूर * प्रथम वर्ग
आदित्य विजय पंडित * जालना * उत्तीर्ण
आदिराज आनंद देशमुख * पुणे * सहभागी
आनंद सुनील सुरडकर * वांजोळा संभाजीनगर * द्वितीय वर्ग
आनंदी युवराज पवार * पुणे * सहभागी
आयशा आरिफ पठाण * गोंदेगाव * उत्तीर्ण
आयान रहीम खान * पुणे * सहभागी
आरती बबन शिंदे * पुणे * सहभागी
आराध्या महेंद्र पोखरकर * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
आराध्या संदीप टेमकर * खोडद जुन्नर पुणे * उत्तीर्ण
आरोही सुजित काटे * पुणे * सहभागी
आर्यन संजय खडके * शिरोळ, कोल्हापूर * विशेष
आर्या अमित किनीकर * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
आर्या प्रवीण दुर्गवली * घाटकोपर * द्वितीय वर्ग
आर्या संजय मोरे * पुणे * सहभागी
इंगळे नंदिनी निशांत * पुणे * सहभागी
इकरा आनिस शेख * छत्रपती संभाजीनगर * द्वितीय वर्ग
इशरत अमीर सुतार * कराड * प्रथम वर्ग
ईश्वरी दत्तात्रय साळुंखे * पुणे * सहभागी
ईश्वरी सचिन कदम * पुणे * सहभागी
उज्वला दामोदर जागीड़ * सिल्लोड संभाजीनगर * प्रथम वर्ग
उदय प्रकाश माहोर * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
ऋतिका मारुती घटकरी * पुणे * उत्तीर्ण
ऋतुजा गोरखनाथ भोजने * बालानगर * उत्तीर्ण
ऋतुजा परमेश्वर जाधव * पुणे * सहभागी
ऋतुजा संतोष भंडलकर * पुणे * सहभागी
ऋतुजा सतीश दानवे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
ऋषिकेश हनुमान * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
एकता दिलीप गांकर * * सहभागी
एजन असलम पठाण * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
ओंकार हनुमंत कावरे * शिरोळ कोल्हापूर * प्रथम वर्ग
ओम रमेश कांबळे * पुणे * सहभागी
ओम वैभव जाधव * चिखली, पुणे * उत्तीर्ण
ओम शशिकांत बांभेरे * पुणे * सहभागी
ओम शिवाजी रोकडे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
ओमकार किरण बेलेकर * चांदवड नाशिक * प्रथम वर्ग
ओमकार बाबा लोणकर * फलटण सातारा * प्रथम वर्ग
ओमकार हरिचंद्र गायके * चिखली, पुणे * द्वितीय वर्ग
करण अन्नासाहेब भेरे * चिखली, पुणे * प्रथम वर्ग
कल्पेश तुळशीराम सूर्यवंशी * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
कविता तोळाराम देवासी * पुणे * सहभागी
कशिश जितेंद्र मांडे * पुणे * उत्तीर्ण
कशिश नवनाथ मंडलिक * येणेरे * प्रथम वर्ग
कादंबरी नरेंद्र दुसे * धरणगाव जळगांव * अतिविशेष
कादंबरी श्रीकृष्ण घनवट * रामजी नगर भटवाडी * द्वितीय वर्ग
कार्तिक प्रकाश शिंदे * बालानगर * सहभागी
कार्तिकी जयंत काटकर * पुणे * सहभागी
कार्तिकी शिवाजी मेटे * शिवाजीनगर * सहभागी
काळे कोमल राजू * सिल्लोड संभाजीनगर * उत्तीर्ण
काळे प्रणिती प्रताप * पुणे * उत्तीर्ण
कावेरी चरणसिंग शिंदे * गोंदेगाव * सहभागी
किशोरी नामदेव गोर्डे * बालानगर * उत्तीर्ण
कीर्ती रामेश ठाकुर * पुणे * द्वितीय वर्ग
कुणाल प्रवीण शिंदे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
कुणाल संतोष पवार * पुणे * अतिविशेष
कृषी राजेश जोशी * फलटण सातारा * प्रथम वर्ग
कोमल किशोर जाधव * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
कोमल गणेश तुपे * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
कोमल संजय वरवटकर * घाटकोपर मुंबई * द्वितीय वर्ग
कौस्तुभ राजे राधाकिसन जाधव * रांजणी * सहभागी
खुशबू समीर शेख * पुणे * सहभागी
खुशी आनंद परदेशी * पांडव नगर पुणे * सहभागी
गंगा अण्णा मुळे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
गणेश विठ्ठल फेड * बालानगर * उत्तीर्ण
गायत्री अमोद जोशी * निगडी पुणे * द्वितीय वर्ग
गायत्री निवृत्त मोरे * रांजणी * सहभागी
गायत्री वैभव दोईजाड * शिरोळ, कोल्हापूर * विशेष
गार्गी शिंगाडे * पुणे * सहभागी
गुंजन परेश पाटोळे * पुणे * सहभागी
गोरे रूपाली श्रीपत * सिल्लोड संभाजीनगर * द्वितीय वर्ग
गोरे शुभम शामराव * सिल्लोड संभाजीनगर * प्रथम वर्ग
गौरव आनंद लोणी * पुणे * उत्तीर्ण
गौरव नाना ढोले * येणेरे * प्रथम वर्ग
गौरव भगवान जंजाळ * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
गौरव राजपूत * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
गौरव लक्ष्मण पटेकर * बालानगर * सहभागी
गौरांग महेश घाडीगांवकर * घाटकोपर मुंबई * द्वितीय वर्ग
गौरी दत्तात्रय आनंदगावकर * पुणे * सहभागी
गौरी लहू राणे * मौजे आगर * उत्तीर्ण
गौरी वैभव दोईजाड * शिरोळ, कोल्हापूर * विशेष
गौरी हनुमंत खेडेकर * पुणे * उत्तीर्ण
चंचल अजय शिंदे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
चव्हाण साक्षी बाळकृष्ण * सिल्लोड संभाजीनगर * द्वितीय वर्ग
चैतन्य अविनाश टेमगिरे * खोडद जुन्नर पुणे * उत्तीर्ण
चैतन्य संदीप घोगरे * येणेरे * विशेष
चैताली गजानन जाधव * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
चैत्राली बाबू दुराके * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
जयदीप ज्ञानेश्वर कोलते * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
जयश्री किशोर चवळी * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
जयेश विष्णू पाटील * रांजणी * उत्तीर्ण
जानवी चिंतामण निकम * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
जान्हवी गणेश मेटे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
जान्हवी जगदीश पाटील * पुणे * सहभागी
जुवैरिया सादिक बरगीर * कराड * विशेष
ज्ञानेश्वरी दत्तात्रय अभंग * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
झेंडगे अमर ज्योती * मोहोळ सोलापूर * सहभागी
तनया रवींद्र कुळये * घाटकोपर मुंबई * उत्तीर्ण
तनवी राजेंद्र आरोलकर * पुणे * सहभागी
तनिषा रमेशराव मोरे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
तनुजा अर्जुन मोरे * रांजणी * सहभागी
तनुजा औदुंबर पवार * * सहभागी
तनुजा भीमाप्पा अर्जुन * पुणे * उत्तीर्ण
तनुश्री राजू रंग सुबे * पुणे * सहभागी
तन्मय प्रकाश अनभुले * फलटण सातारा * प्रथम वर्ग
तृप्ती पांडुरंग खवके * पुणे * सहभागी
तेजल अनिल बोरसे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
तेजल गणेश पवार * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
दर्शन दीपक बागुल * पुणे * सहभागी
दर्शन सुनील महाजन * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
दर्शना नम्रता करपे * चिखली, पुणे * उत्तीर्ण
दर्शना प्रशांत गाडेकर * फलटण सातारा * प्रथम वर्ग
दळवी ऋषिकेश गणेश * पुणे * विशेष
दानिश फिरोज घाटिक * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
दिनेश विठ्ठल जिरगाळे * जयसिंगपूर * प्रथम वर्ग
दिपाली दिलीप गिरी * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
दिपाली प्रमोद शिंदे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
दिपाली हिरामण जाधव * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
दिया पूजा हर्षद मेहता * चिखली, पुणे * द्वितीय वर्ग
दिव्या उषा प्रवीण ठोंबरे * चिखली, पुणे * प्रथम वर्ग
दिव्या दत्तात्रय कदम * सोयगाव संभाजीनगर * द्वितीय वर्ग
दिव्या बाळासाहेब कडे * * उत्तीर्ण
दिव्या भाऊंना परदेशी * पांडव नगर पुणे * सहभागी
दिव्या मानिक मुळे * पुणे * प्रथम वर्ग
दिशा धर्मराज काकडे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
दीपेश जयराम गायकवाड * पुणे * सहभागी
धनश्री अनिल पाटोळे * पुणे * सहभागी
धनश्री निलेश हिरेमठ * शिरोळ कोल्हापूर * सहभागी
धनश्री राहुल सोमढळे * वडवळ * उत्तीर्ण
धनश्री लक्ष्मण गोरडे * बालानगर * उत्तीर्ण
धनश्री शालिग्राम झाले * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
धनश्री सचिन शिंदे * शिरोळ * द्वितीय वर्ग
धीरज विठ्ठल सिंग कवाली * रांजणी * सहभागी
नंदिनी अंबादास पवार * पुणे * सहभागी
नंदिनी बिरूदेव खताळ * मोहोळ सोलापूर * उत्तीर्ण
निकम श्रावणी बाळासाहेब * पुणे * सहभागी
नितीन कुमार यशवंत पाटील * मोहोळ सोलापूर * सहभागी
निशा अशोक पटेकर * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
नूदनुरे प्रतीक्षा राम * पुणे * सहभागी
नैतिक युवराज कोळी * पुणे * सहभागी
पल्लवी सिद्धेश्वर वाकोडे * पुणे * सहभागी
पवार वैष्णवी संजय * पुणे * सहभागी
पायल धनेश जाधव * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
पायल सरसद * वडवळ * सहभागी
पायल सुरेखा रामकृष्ण गायकवाड * चिखली, पुणे * उत्तीर्ण
पार्थ बापूराव राठोड * रांजणी * सहभागी
पुनम राहुल पाटील * पुणे * सहभागी
पुनम संतोष पवार * गोंदेगाव * उत्तीर्ण
प्रकाश सुबोध येरुंकर * पुणे * सहभागी
प्रगती दत्ता वाडीले * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
प्रगती प्रकाश आवारे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
प्रचिता बाबासाहेब कळसकर * गिधडा * द्वितीय वर्ग
प्रज्ञा गणेश सालुंके * सातारा * विशेष
प्रणव विलास पाटील * उदगाव * प्रथम वर्ग
प्रणाली बाबासाहेब टकले * पुणे * सहभागी
प्रणिती आप्पासाहेब गायकवाड * मोहोळ सोलापूर * सहभागी
प्रतीक ज्ञानेश्वर तुलसे * * द्वितीय वर्ग
प्रतीक्षा अच्युत राठोड * पुणे * सहभागी
प्रतीक्षा कैलास कारेगावकर * रांजणी * उत्तीर्ण
प्रतीक्षा प्रकाश चव्हाण * उदगाव कोल्हापूर * उत्तीर्ण
प्रतीक्षा सागर गायकवाड * मोहोळ सोलापूर * सहभागी
प्रथमेश विठ्ठल विधाते * पुणे * उत्तीर्ण
प्रशांत पांडुरंग जोगदंड * पुणे * सहभागी
प्रांजल संदीप राऊत * पैठण औरंगाबाद * प्रथम वर्ग
प्रांजली फंड * मोहोळ सोलापूर * सहभागी
प्राची सदाशिव राठोड * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
प्राची सहेबराव व्ह्याव्हारे * जालना * प्रथम वर्ग
प्राजक्ता ज्ञानेश्वर गळबे * * सहभागी
प्राजक्ता संदिपान खुळे * पुणे * सहभागी
प्राजक्ता सचिन काकडे * फलटण सातारा * द्वितीय वर्ग
प्रियंका गांधी * फलटण सातारा * प्रथम वर्ग
प्रियंका भाऊसाहेब घोंगडे * बालानगर * उत्तीर्ण
प्रियंका सिताराम पवार * मोहोळ सोलापूर * सहभागी
प्रिया शिवकुमार गुंडगे * पुणे * उत्तीर्ण
प्रीती सदाशिव राठोड * सोयगाव संभाजीनगर * प्रथम वर्ग
बिराजदार दिव्या विनोद * पुणे * सहभागी
भक्ती राजू बोडखे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
भाग्यश्री सोमनाथ मेटे * शिवाजीनगर * सहभागी
भावना ज्ञानोबा जाधव * पुणे * सहभागी
भावेश कैलास मोरे * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
भावेश गोपीचंद पाटील * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
भूमिका कुबेर बुरसे * शिरोळ, कोल्हापूर * विशेष
भूमिका दत्तात्रय फाळके * पुणे * उत्तीर्ण
भूमिका विलास सरोडे * छत्रपती संभाजीनगर * द्वितीय वर्ग
मंगेश वल्मीक भेरे * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
मनीषा ए. बोराडे * चिखली, पुणे * सहभागी
मनुष्री बबलेश गुगळे * पुणे * सहभागी
मयूर योगेश देसले * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
माधुरी रवींद्र खंडाळे * सोयगाव संभाजीनगर * प्रथम वर्ग
माधुरी राजेंद्र सोनवणे * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
मानसी गोरख बर्वे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
मानसी योगेश खैरनार * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
मिसबाहा फारूक मुल्ला * जयसिंगपूर * विशेष
मुग्धा दीपक देऊळगावकर * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
यश अभिजीत पवार * मोहोळ सोलापूर * प्रथम वर्ग
यश संतोष शिरसाठ * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
यश सोळंके * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
यशवर्धन शशिकांत कदम * पुणे * सहभागी
यशस्विनी किशोर मोरे * पुणे * सहभागी
यशस्वी सोनसिंग सोळंके * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
युवराज राजू मस्के * घाटकोपर * उत्तीर्ण
युवराज श्रीपाद अंभोरे * पुणे * उत्तीर्ण
योगिता सुधीर पाटील * गोंदेगाव * उत्तीर्ण
रविराज भगवत जाधव * रांजणी * सहभागी
रसिका राजेंद्र मदने * शिरोळ कोल्हापूर * द्वितीय वर्ग
राज अनाजी जानकर * रामजी नगर भटवाडी घाटकोपर * उत्तीर्ण
राज समाधान अभंग * चिखली पुणे * द्वितीय वर्ग
राजंता भगवान पवार * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
राजनंदिनी अविनाश थिटे * मोहोळ सोलापूर * सहभागी
राजनंदिनी नितीन पाटील * उदगाव कोल्हापूर * प्रथम वर्ग
राणी धनाजी शेंडगे * मोहोळ सोलापूर * सहभागी
राधिका गौतम तांबोळी * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
राम राजाराम ढेबे * रामजी नगर भटवाडी * उत्तीर्ण
रामेश्वरी मंगेश गाडेकर * फलटण सातारा * प्रथम वर्ग
रितेशा सचिन बोके * फलटण सातारा * प्रथम वर्ग
रिया परशुराम कोळी * पुणे * सहभागी
रुद्र दीपक मिरगुले * घाटकोपर * द्वितीय वर्ग
रुद्र नानासो होले * फलटण सातारा * प्रथम वर्ग
रुद्र संजय ढेंबरे * फलटण सातारा * उत्तीर्ण
रुद्रा जाधव * रांजणी * सहभागी
रेश्मा चरण सिंग शिंदे * सोयगाव संभाजीनगर * द्वितीय वर्ग
रेहान आरिफ पठाण * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
रोशन रमेश गुरव * भटवाडी * उत्तीर्ण
रोशनी राजू काथार * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
रोशनी रोहिदास मोरे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
रोहन गजानन मालोकर * चिखली, पुणे * द्वितीय वर्ग
रोहन तात्यासाहेब शिंदे * बालानगर * सहभागी
रोहिणी संतोष सूर्यवंशी * गोंदेगाव * सहभागी
रोहित उद्धव पवार * चिखली, पुणे * उत्तीर्ण
वंशिका पिंटू विश्वकर्मा * पुणे * सहभागी
वर्षा मल्लेश छत्री * पांडव नगर पुणे * सहभागी
वाघचवेर प्राजक्ता प्रवीण * मोहोळ सोलापूर * सहभागी
विद्या दत्तात्रय कदम * सोयगाव संभाजीनगर * द्वितीय वर्ग
विनंती प्रफुल्ल शिंदे * पुणे * सहभागी
विरश्ट नितीन शिंदे * गोंदेगाव * सहभागी
विश्वजीत सूर्यकांत धायगुडे * फलटण सातारा * प्रथम वर्ग
विश्वास मल्लप्पा ईटकी * पुणे * सहभागी
वेदांत सचिन दातखिळे * येणेरे * प्रथम वर्ग
वेदिका नवनाथ गोरडे * बालानगर * द्वितीय वर्ग
वैदही करे * फलटण सातारा * उत्तीर्ण
वैभव तुकाराम शिंदे * फलटण सातारा * सहभागी
वैभवी महादेव जाधव * शिरोळ कोल्हापूर * प्रथम वर्ग
वैभवी सुरेश तारे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
वैष्णवी गणेश कोलते * वडवळ * उत्तीर्ण
वैष्णवी तुषार दभाडे * कराड * विशेष
वैष्णवी मच्छिंद्र पवार * खोडद जुन्नर पुणे * उत्तीर्ण
वैष्णवी सुदर्शन सोनवणे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
शर्वरी भाऊसाहेब गायकवाड * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
शर्वरी स्वप्निल देशपांडे * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
शितल पापालाल गल्हाटे * पैठण औरंगाबाद * प्रथम वर्ग
शिफा एजाज शेख * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
शिवराज संदीप तुपे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
शिवानी सुरेश गव्हाणे * पुणे * सहभागी
शीतल संतोष गोरडे * * द्वितीय वर्ग
शुभदा विजय सरोदे * पुणे * सहभागी
शुभम ऋषिकेश वष्ट * फलटण सातारा * प्रथम वर्ग
शुभम सटवाजी गायकवाड * पुणे * उत्तीर्ण
शुभांगी किरण भोई * गोंदेगाव * सहभागी
शुभांगी किरण भोई * गोंदेगाव * उत्तीर्ण
शुभांगी सिद्धार्थ सोनवणे * सोयगाव संभाजीनगर * उत्तीर्ण
शोउनक मंगेश विदर * सातारा * सहभागी
शौर्य धनंजय शिंदे * घाटकोपर मुंबई * द्वितीय वर्ग
श्रद्धा मारोती गिराम * * उत्तीर्ण
श्रद्धा समाधान शिंदे * मोहोळ सोलापूर * उत्तीर्ण
श्रावणी अविनाश घरात * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
श्रावणी गजानन यादव * शिरोळ कोल्हापूर * उत्तीर्ण
श्रावणी दीपक यमकर * पुणे * सहभागी
श्रावणी संतोष पवार * रांजणी * उत्तीर्ण
श्रावणी संतोष लाटे * मोहोळ सोलापूर * सहभागी
श्रावणी सुमित चिकणे * खोडद जुन्नर पुणे * उत्तीर्ण
श्रीमती कुंभकर्ण वैशाली भगवानराव * बालानगर * द्वितीय वर्ग
श्रीमती साळवे सुमेगा वसंतराव * बालानगर * द्वितीय वर्ग
श्रुतिका ज्ञानेश्वर गोरडे * बालानगर * उत्तीर्ण
श्रुतिका विजय कुंभार * पुणे * सहभागी
श्रुती आप्पासाहेब तुपे * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
श्रुती संजय पाटील * मोहोळ सोलापूर * सहभागी
श्रुती संतोष आली * पुणे * सहभागी
श्रेयस जितेंद्र रजपूत * शिरोळ कोल्हापूर * प्रथम वर्ग
श्रेया पाठक * पुणे * प्रथम वर्ग
श्रेया अजित एरंडे * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
श्रेया मनोज जाधव * सातारा * प्रथम वर्ग
श्रेया संपत नवले * येणेरे * प्रथम वर्ग
श्रेया सरंगधर धाकणे * * द्वितीय वर्ग
श्वेता शिवानंद राठोड * वडवळ * उत्तीर्ण
संकल्प अक्षय जामगावकर * पुणे * अतिविशेष
संकेत दत्ता हलगे * रांजणी * सहभागी
संजना प्रकाश दळवी * पुणे * उत्तीर्ण
संपदा संतोष पारनेरकर * छत्रपती संभाजीनगर * उत्तीर्ण
संस्कार अमोल पवार * मोहोळ सोलापूर * सहभागी
सई गणेश साई * पुणे * सहभागी
सई शिरीष भाले * वडवळ * उत्तीर्ण
सपकाळ दिव्या अण्णा * सिल्लोड संभाजीनगर * प्रथम वर्ग
समर्थ अरविंद ओव्हाल * चिखली, पुणे * उत्तीर्ण
समर्थ जीवन मोरे * पुणे * सहभागी
समर्थ राम घोडके * * उत्तीर्ण
समर्थ वैजिनाथ गडेकर * पुणे * द्वितीय वर्ग
समीक्षा कुबेर बुरसे * शिरोळ, कोल्हापूर * द्वितीय वर्ग
समीक्षा तुकाराम थोरात * खोडद जुन्नर पुणे * प्रथम वर्ग
समीक्षा राहुल कांबळे * जयसिंगपुर * विशेष
समीक्षा संतोष भोर * खोडद जुन्नर पुणे * प्रथम वर्ग
समीक्षा सचिन जाधव * पुणे * सहभागी
समृद्धि बाळिराम सूर्यवंशी * कराड * विशेष
समृद्धी अभय कुमावत * पुणे * सहभागी
समृद्धी बलभीम वाघमोडे * वडवळ * उत्तीर्ण
समृद्धी सचिन मोरे * पुणे * सहभागी
समृद्धी सागर करंजकर * पुणे * सहभागी
समृद्धी सोमनाथ चौधरी * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
समृद्धी सौदागर भालेराव * पुणे * उत्तीर्ण
सरिता संजय भालेकर * बालानगर * प्रथम वर्ग
सलोनी एकनाथ वाघमोडे * वडवळ * सहभागी
साई गणेश जाधव * पुणे * सहभागी
साई दत्तात्रय दातखिळे * येणेरे * प्रथम वर्ग
साई वैभव जाधव * चिखली, पुणे * उत्तीर्ण
साई श्रीकांत वाघमारे * * उत्तीर्ण
साई सचिन कदम * घाटकोपर * प्रथम वर्ग
साक्षी अंगत कोकाटे * रांजणी * सहभागी
साक्षी अनिल ताकवले * पैठण औरंगाबाद * प्रथम वर्ग
साक्षी अनिल पाटील * शिरोळ कोल्हापूर * द्वितीय वर्ग
साक्षी शंकर जगताप * वडवळ * सहभागी
साक्षी शंकर सलगर * वडवळ * सहभागी
साक्षी संतोष दंडिले * फलटण सातारा * द्वितीय वर्ग
साक्षी सुधाकर तेलंग * रांजणी * सहभागी
सानिका सतीश शिंदे * पुणे * सहभागी
साबा सलीम शेख * पैठण औरंगाबाद * द्वितीय वर्ग
सारा राजकुमार तुर्के वाडकर * पुणे * सहभागी
सार्थक राजेश कोडुले * घाटकोपर * उत्तीर्ण
सार्थक विनोद चव्हाण * पुणे * उत्तीर्ण
सार्थक सतीश मेहेर * पुणे * सहभागी
सार्थकी किरण बालवडकर * पुणे * सहभागी
साहिल भगवान गलधर * बालानगर * सहभागी
साहिल रालामल्ली * पुणे * सहभागी
सिताराम देविदास खंडाळकर * मोहोळ सोलापूर * सहभागी
सिद्धी ज्ञानेश्वर धुमाळ * फलटण सातारा * प्रथम वर्ग
सिद्धी रवींद्र राठोड * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
सिद्धी समाधान ताकमोके * मोहोळ सोलापूर * सहभागी
सिद्धेश्वर ज्ञानेश्वर बोराडे * चिखली, पुणे * द्वितीय वर्ग
सिमरन संतोष झेंडगे * मोहोळ सोलापूर * सहभागी
सिया सुजय गायकवाड * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
सुखदा अजित शेळके * पुणे * सहभागी
सुजल नवनाथ गायकवाड * खोडद जुन्नर पुणे * उत्तीर्ण
सुतार ज्योती सूर्यकांत * पुणे * उत्तीर्ण
सुमित सुरेखा उद्धव भेरे * चिखली पुणे * द्वितीय वर्ग
सुरेश शिवराम महाजन * चाळीसगाव जळगांव * उत्तीर्ण
सृष्टि वर्षा मंगेश मोरे * पुणे * प्रथम वर्ग
सृष्टी बाप्पा आरेकर * पुणे * उत्तीर्ण
सृष्टी सतीश देदे * पुणे * सहभागी
सोनाली हिम्मतराव गायकवाड * फलटण सातारा * प्रथम वर्ग
सोनिया यशवंत वाघमोडे * वडवळ * उत्तीर्ण
सोहम लक्ष्मण पवार * पुणे * उत्तीर्ण
सोहम संतोष भोर * खोडद जुन्नर पुणे * सहभागी
सोहम सचिन चाळके * घाटकोपर * द्वितीय वर्ग
स्नेहल ब्रह्मदेव शिरसाट * मोहोळ सोलापूर * सहभागी
स्नेहा धोंडीबा शिवपुजे * वडवळ * उत्तीर्ण
स्नेहा वाघमोडे * पुणे * सहभागी
स्नेहा साहेबराव गुंडाळे * पुणे * सहभागी
स्नेहा सुरज गुंजाळ * गुंजाळवाडी पुणे * सहभागी
स्मित सचिन पाटील * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
स्मिता मारुती थोरात * खोडद जुन्नर पुणे * उत्तीर्ण
स्वरांजली वैभव घोगरे * येणेरे * प्रथम वर्ग
स्वराज शिवाजी चौधरी * चिखली, पुणे * उत्तीर्ण
स्वामिनी सुदर्शन सोनवणे * गोंदेगाव * उत्तीर्ण
हरिप्रिया ज्ञानेश्वर तरडे * पुणे * सहभागी
हरी ओम विलास राऊत * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
हर्षदा अनिल वराडे * मोहोळ सोलापूर * सहभागी
हर्षदा बाळासाहेब दळवी * वडवळ * सहभागी
हर्षल विलास निकम * सोयगाव संभाजीनगर * सहभागी
हर्षाली पर्वत मस्के * छत्रपती संभाजीनगर * सहभागी
हिंदवी ज्ञानेश्वर घोंगडे * * उत्तीर्ण
होमसिंग चंद्रसिंग शिंदे * सोयगाव संभाजीनगर * सहभागी

विज्ञान रंजन स्पर्धा 2024 
प्नश्नावली

सूचना 
* प्रवेशमूल्य नाही 
* वयाची अट नाही 
* शिक्षणाची अट नाही.
* खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, इतरत्र शोधून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळवावी 
* उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 16 फेब्रुवारी 2024 पूर्वी -
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग,टिळक स्मारक मंदिर,टिळक रस्ता,पुणे 411030 येथे पोचवावी.
* प्राथमिक विजेत्यांची नावे 26 फेब्रुवारीला जाहीर केली जातील.
* प्राथमिक 
विजेत्यांची अंतिम फेरी रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता -  पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे होईल. 
*उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे .
*परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील .
*आपल्या उत्तरपत्रिके सोबत पुढील माहिती लिहून पाठवावी.
तसेच गुगल फॉर्मद्वारे भरून पाठवावी.


1. संपूर्ण नाव. 2. पत्ता. 3. मोबाईल नबर. 4. ई-मेल. 5. विद्यार्थी असल्यास - शाळा / महाविद्यालय. 6. व्यवसाय. 7. जन्मतारीख. 8. वयाप्रमाणे पुढावा गुण - [वय वर्षे: 13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81च्यावर (6)]. 9 शिक्षण - [शिक्षणानुसार पुढावा गुण- शिक्षण: पाचवीपर्यंत(10) सातवीपर्यंत (9) दहावीपर्यंत (7) बारावीपर्यंत (5) पदवीपर्यंत (3) शास्त्र-शाखा (0)]. 10. एकूण पुढावा गुण
*शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील .

या प्रश्नावालीचा प्रचार, प्रसार करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसाराचे काम आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही, वयाची, शिक्षणाची अट नाही. प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे शोधून लिहायची, काही प्रयोग करून मिळवायची आहेत. स्पर्धकांच्या मेंदूला यातून खुराक मिळतो. उत्तम उत्तरांना प्रमाणपत्रे देतो. अंतिम प्रयोग फेरीत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांना रोख बक्षिसे देतो. या उपक्रमाच्या खर्चासाठी आपण आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.

आपल्याकडून यथाशक्ती यथामती आर्थिक देणगी मिळावी. ही विनंती*
बँक ट्रान्स्फर साठी. खात्याचे नाव - Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag. बँक IDBI Branch- Sadashiv Peth Pune 30.
बचत खाते * क्र.49010010077236 * IFSC CODE- IBKL0000490

 
संपर्क–
शशी भाटे 9420732852/ राजेंद्रकुमार सराफ 9822186763 /
संजय मा.क. 9552526909/ विनय र. र. 9422048967

विज्ञान रंजन स्पर्धा 2024
प्रश्नावली
प्रश्न  1 - निरीक्षण करून उत्तर द्या ( गुण 10)
1. घरांना उभे दरवाजे असतात, आडवे दरवाजे कोठे असतात?
2. फाईल मध्ये लावण्यासाठी पंच ने कागदाला भोके पाडतात त्यात किती अंतर असते?
3. कौलारू घराच्या छपराचा उतार किती अंशाचा असतो ?
4. सैनिकांच्या गणवेशात कोणते तीन रंग असतात?
5. 2024 सालचा रंग म्हणून जाहीर झालेल्या पीच फज रंगाची फुले कोणत्या झाडावर येतात?
6. एक सपाट चमचा मीठ कमीत कमी किती चमचे पाण्यात विरघळते?
7. सौरवीज निर्मितीच्या सौर पॅनलची कोणत्या दिशेकडील कड वरती असते?
8 पाच फेब्रुवारी 2024 ला पहाटेच्या अंधारात दिसणारी चंद्रकोर कोणत्या ताऱ्याला झाकून पुढे सरकते?
9. घोरणाऱ्या व्यक्तीच्या ऑक्सिजन पातळीत कोणता फरक पडतो?
10.  मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषवलेल्या या महिला वैज्ञानिक कोण आहेत? 







प्रश्न 2 - एका शब्दात उत्तर द्या - (गुण 10)
1. जागतिक विज्ञान दिवस कधी असतो?
2. कोणाच्या डोक्यावर नाक असते?
3. पृथ्वीवरून मंगळावरच्या माणसाला फोन केला तर त्याचा प्रतिसाद यायला किती वेळ लागेल?
4. तेलाची गळती झाल्यावर समुद्रावर पसरणाऱ्या तवंगांची जाडी किती असते?
5. वाया जाणारे खरकटे फस्त करण्याचे काम कोणता सजीव उत्तम करू शकतो?
6. पोटाबाहेर पिशवी असणारा कोणता प्राणी उत्तर अमेरिकेत आढळतो?
7. पृथ्वीवरील शून्य प्रकाश प्रदूषण असणारे ठिकाण कोणते?
8. वादळाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?
9. जिनचे कापड आणि महात्मा गांधींचा एक सत्याग्रह यात सामायिक असणारी वनस्पती कोणती?
10. एका सप्तकात असणारे ऐकू येणारे ध्वनी किती?

प्रश्न 3  - मी/आम्ही कोण? - (गुण 10)
1. 2024 या वर्षात सात पैकी आम्ही दोघे सर्वात जास्त वेळा येतो.
2. सूर्य चंद्र आपली जागा बदलत असतील पण मी नाही बदलत.
3. बँक असो वा कर भरणा, मनरेगा वा जनधन योजना, उपयोगाची ठिकाणे नाना, बारा अंकी मला ओळखा ना.
4. आपले देश प्रेम सिद्ध करण्याच्या नादात मी मानवी संहार करणारे वायू शोधले.
5 मी संगीतातला कर्कशपणा कमी करण्याची यंत्रणा शोधून काढली आज तिच्यामुळेच गोंगाट होतो.
6. उन्हाळ्याची अखेर करणाऱ्या पावसाला माझ्यामुळे सुवास येतो.
7.  मी एक 9000 वर्षे जुने झाड दक्षिण मध्य उटाच्या फिश लेक पार्कमध्ये आहे.
8. जगातले 66 टक्के लोक आमच्या तिघांपैकी एकाला तरी खातातच.
9. माझ्या नावडत्या मुलींची, नेत्यांची नावे वापरून मी वादळांना नावे ठेवायची प्रथा सुरू केली.
10. मी एक चौरसांमधील ठिपक्यांची विचित्र नक्षी तुम्हाला मोबाईल वापरून मदतीला येते

प्रश्न 4 - चूक की बरोबर - उत्तर स्पष्ट करा. (गुण 20)
1. गारुड्याच्या पुंगीच्या आवाजाने नाग डोलतो.
2. कमी बुद्धीच्या लोकांना भावनांवर ताबा ठेवता येतो.
3. चार अंकी पासवर्ड जास्तीत जास्त 9999 बनवता येतात.
4. बेडकीचा पाला खाल्ल्यानंतर गूळ खाल्ला तर तो तिखट लागतो.
5. माणसाच्या खोकण्याच्या आवाजाला वाघ घाबरतो.
6. टॉनिके घेतल्याने आपले स्नायू दणकट होतात.
7. अंतराळवीरांना यानात सर्व पदार्थ शिळेच खावे लागतात.
8. केळी, दूध, चुना यांमधून सतत किरणोत्सार होत असतो.
9. ध्रुवीय प्रदेशात राहणाऱ्या अस्वलाची त्वचा काळी असते.
10. सर्व खनिजे स्फटीक असतात पण सर्व स्फटीके खनिजे नसतात.

प्रश्न 5 - वैज्ञानिक कारणे द्या. (गुण 20)
1. झेब्र्यांच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात.
2. इंद्रधनुष्यात सात रंग दिसतात प्रत्यक्षात हजारो रंग आहेत.
3. गव्हाची यांत्रिक शेती करता येते पण ज्वारीची करता येत नाही.
4. कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी वापरली जाणारी शिट्टी माणसाला ऐकू येत नाही.
5 समुद्रातील मासे पाठीला काळसर तर पोटाला पचंदेरी असतात.
6. माणूस विविध प्रकारचा आहार करू शकतो.
7. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरिया खताचे उत्पादन खूप वाढले.
8. खारी सापाची कात चावून तिचे तुकडे आपल्या अंगाला फासतात.
9. हेडफोन लावून डोळे मिटून गाणी ऐकल्यास डोळ्यांसमोर विविध रंग दिसतात.
10. अभयारण्य कालांतराने रद्द केली पाहिजेत.

प्रश्न 6 -  थोडक्यात उत्तर द्या. (गुण 20)
1. सोबतचा फोटो कशाचा आहे? याचे भौगोलिक महत्त्व काय?
2. पतंगाची शेपूट पतंगाच्या उंचीच्या किती पट असू शकते?
3. हसताना व्यक्तीच्या चेहऱ्यात कोणते बदल होतात?
4. विजेवर चालणारी वाहने हवा प्रदूषणात कोणता फरक घडवतात?
5. दारू पिणाऱ्यांना यकृताचे विकार अधिक का होतात?
6. एखाद्या दगडाचे वय कशावरून ठरवतात?
7. 1/98 चे उत्तर काय? यात कोणते वैशिष्ट्य आहे?
8. आपल्या घरातील कोणती उपकरणे वापरात नसतानाही वीज खर्च करतात?
9. ढेकूण कोणत्या अन्नसाखळीचा भाग आहे?
10. तुमच्याच गावासारखे हवामान असलेले दक्षिण गोलार्धातील ठिकाण कोणते? ते कसे शोधले?

प्रश्न 7 - सविस्तर उत्तर लिहा. (गुण 15)
1. गहू ते बिस्किट - हे रूपांतर होताना कोणकोणत्या क्रिया प्रक्रिया केल्या जातात?
2. हरभरा, मूग, मटकी, मसूर अशी कोणतीही चार कडधान्ये प्रत्येकी एक मूठ चार भांड्यात घ्या. प्रत्येक भांड्यात दोन ओंजळी पाणी टाका. 24 तासानंतर कडधान्याची आणि पाण्याची स्थिती तपासा. निरीक्षणे लिहा. निष्कर्ष लिहा.
3. देशी गाईंच्या शेणामध्ये किरणोत्सारी प्रारणे थोपवण्याची ताकद असते - या विधानाची तपासणी करण्यासाठी काय काय तयारी करावी लागेल? कोणती कृती करावी लागेल? स्पष्ट करा.

प्रश्न 8 - गणिते सोडवा व आवश्यक स्पष्टीकरण द्या. (गुण 15)
1. 'औट घटकेचा राजा' किती मिनिटे राज्य करतो?
2. उन्नीकडे तीन पोती होती. प्रत्येक पोत्यात 30 नारळ होते. बागेपासून बाजाराच्या वाटेवर 30 टोलनाकी होती. प्रत्येक नाक्यावर पोत्यामागे एक नारळ द्यावा लागतो. उन्नी बाजारात किती नारळ नेईल? अनेक उत्तरे द्या.
3. इंग्रजीत 26 मुळाक्षरे, 10 अंक, गणितातील 8 चिन्हे आणि 6 विरामचिन्हे असतात. ही वापरून आठ चिन्हांचा पासवर्ड करायचा तर किती पासवर्ड होतील? अट - वरील चारही गटातील एक चिन्ह वापरलेच पाहिजे.
4. 1, 2, 3, 4, + आणि - असे सहा पुठ्ठे आहेत. ते एकापुढे एक ठेवून येणाऱ्या पदावलीची आकडेमोड करायची. + आणि - शेजारी ठेवायचे नाहीत किंवा कडेलाही ठेवायचे नाहीत. अशाप्रकारे कमाल आणि किमान उत्तर काय येते? त्या दोन उत्तरांमधील कोणत्या संख्यांच्या पदी मांडता येत नाहीत?
5. एका पूर्व पश्चिम पसरलेल्या पुलावर सहा विजेचे खांब आहेत. एका दिवशी सकाळी प्रत्येक खांबाच्या टोकाची सावली शेजारच्या खांबाच्या पायथ्याशी पडलेली दिसली. हे कोणत्या दिवशी, किती वाजता घडले असेल? याचे गणित करण्यासाठी कोणकोणती आकडेवारी लागेल?

प्रश्न 9 - निबंध लिहा . (गुण 15)
खोटारडेपणा - लक्षणे, कारणे आणि उपाय.' खोटारडेपणा करणे. ही प्रकृती आहे की विकृती? माणसे खोटारडेपणा का करतात? खोटारडेपणाचे वागणे कसे ओळखता येते? खोटारडेपणा करणाऱ्या व्यक्तीला काही शारिरीक व मानसिक त्रास होतो का? खोटारडेपणा करण्यामुळे इतर लोकांना काही त्रास होतात का? खोटारडेपणा कमी करण्याचे काही उपाय आहेत का?

विज्ञान रंजन स्पर्धा 2024. आपली उत्तरे 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत - मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग कडे पाठवा.

उत्तरे 
प्रश्न 1 
1) माल चढण्या उतरवण्यासाठी असणारे ट्रक टेम्पोची मागची बाजू रेल्वे फाटक
2) 80 मिलीमीटर
3) 29 अंश
4) गडद हिरवा, पोपटी, राखाडी,खाकी
5) अबोली, गुलाब, डेलिया
6) 3 चमचे
7) उत्तर गोलार्धात उत्तर, दक्षिण गोलार्धात दक्षिण, विषुवृत्तावर सपाट
8) ज्येष्ठा
9) ऑक्सिजन पातळी कमी होते
10) सुलक्षणा महाजन, आदिती पंत, कमल रणदिवे


प्रश्न 2 
1) 10 नोव्हेंबर 
2) देवमासा, डॉल्फीन 
3) 45 मिनिटे
4) एक रेणू
5) झुरळ
6) Virginia Opossum
7) निऊ
8) Saffir–Simpson scale
9) नीळ Indigo
10) 22 श्रुती 

प्रश्न 3 
1) सोमवार, मंगळवार 
2) उत्तर ध्रुव 
3) आधार क्रमांक 
4) फ्रिटझ हाबर 
5) डॉल्बी 
6) Actinomycetes
7) पांडो
8) गहू, तांदूळ, मका
9) Clement Wragg
10)  QR code

प्रश्न 4  
1) चूक. नागाला कान नसतात हालचालीवर लक्ष ठेवून डोलतो
2)  कमी बुद्धीच्या लोकांना भावनांवर ताबा ठेवता येतो.
चूक. त्यांचा विवेक भावनांवर ताबा ठेवू शकत नाही
3). चार अंकी पासवर्ड जास्तीत जास्त 9999 बनवता येतात.
चूक. 10000
4). बेडकीचा पाला खाल्ल्यानंतर गूळ खाल्ला तर तो तिखट लागतो.
चूक. बेचव लागतो
5) माणसाच्या खोकण्याच्या आवाजाला वाघ घाबरतो.
बरोबर. नरभक्षक न झालेला वाघ माणसाच्या ओरडण्याला खोकण्याला घाबरतो
6) टॉनिके घेतल्याने आपले स्नायू दणकट होतात.
चूक. स्नायू व्यायामाने बळकट होतात औषधाने नाही
7) अंतराळवीरांना यानात सर्व पदार्थ शिळेच खावे लागतात.
बरोबर. तीन महिने शिळे पदार्थ खावे लागतात
8) केळी, दूध, चुना यांमधून सतत किरणोत्सार होत असतो.
बरोबर त्यातील पोटॅशियम हा किरणोत्सारी पदार्थ असतो
9) ध्रुवीय प्रदेशात राहणाऱ्या अस्वलाची त्वचा काळी असते.
बरोबर त्याच्या केसांमुळे तो पांढरा दिसतो
10) सर्व खनिजे स्फटीक असतात पण सर्व स्फटीके खनिजे नसतात.
बरोबर. स्पटिकांमधून पुरेशा प्रमाणात धातू काढता येत नाहीत

प्रश्न 5 - वैज्ञानिक कारणे द्या. (गुण 20)
1. झेब्र्यांच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. काळ्या पांढऱ्या पट्ट्यांच्या हालचालीमुळे इतर प्राण्यांना संभ्रम होऊन झेब्र्याचे संरक्षण होते. डास, वाघ सिंह, 
2. इंद्रधनुष्यात सात रंग दिसतात प्रत्यक्षात हजारो रंग आहेत. सूर्यप्रकाशाचे वर्णपटलात ठळकपणे दिसणारे सात रंग असतात. अन्य रंग विविध प्रकारचे प्रकाश लहरींचे तसेच प्रकाशाच्या कमी अधिक प्रखरतेचे मिश्रण असते. 
3. गव्हाची यांत्रिक शेती करता येते पण ज्वारीची करता येत नाही. गव्हाच्या सर्व रोपांची उंची समान असते ज्वारीच्या एकाच प्रकारच्या बियाण्यात न उगवलेल्या ताटांची उंची कमी जास्त असते
4. कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी वापरली जाणारी शिट्टी माणसाला ऐकू येत नाही. कुत्र्याच्या शिट्ट्या सामान्यत: 20,000 आणि 50,000 हर्ट्झच्या दरम्यान आवाज उत्सर्जित करतात, जो सामान्य मानवी ऐकण्याच्या श्रेणीच्या पलीकडे असतो, जो सामान्यत: 20 आणि 20,000 हर्ट्झच्या दरम्यान असतो.
5 समुद्रातील मासे पाठीकडून काळसर तर पोटाकडून चंदेरी असतात.
ती क्लृप्ती असते. सुरक्षा आणि एकरुपता 
6. माणूस विविध प्रकारच्या आहार करू शकतो.
अन्न शिजवून खाल्ल्यामुळे बरेचसे अन्न शरीराबाहेरच पचते
7. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरिया खताचे उत्पादन खूप वाढले.
महायुद्धानंतर अमोनिअम नायट्रेट स्फोटक तयार करण्याची आवश्यकता संपली त्यामुळे अमोनिया पासून युरियाचा खत म्हणून वापर सुरू झाला
8. खारी सापाची कात चावून तिचे तुकडे आपल्या अंगाला फासतात.
सापाच्या तातडीच्या वासामुळे खारीला खाणारे अन्य प्राणी घाबरून दूर राहतात
9. हेडफोन लावून डोळे मिटून गाणी ऐकल्यास डोळ्यांसमोर विविध रंग दिसतात.
संगीत ऐकताना रंग पाहणेहा  साउंड-कलर सिनेस्थेसिया किंवा क्रोमेस्थेसिया नावाचा सिनेस्थेसियाचा एक प्रकार असू शकतो. या प्रकारच्या सिनेस्थेसियामध्ये, आवाज अनैच्छिकपणे रंग, आकार आणि हालचालींच्या भावनांना चालना देऊ शकतात 
10. अभयारण्ये कालांतराने रद्द केली पाहिजेत.
अभयारण्यात एकाच प्रकारच्या प्राण्यांची वाढ भरमसाठ होऊ शकते व त्यामुळे नैसर्गिक समतोल ढासळू शकतो

1 comment:

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला लवकरच संपर्क केला जाईल.