- आकांक्षा राजकुमार जगधने, सांगली
- अनुष्का सूर्यकांत घाडगे, फलटण
- अर्णव देवीदत्त खापर्डे, पुणे
- अवंती धनंजय निंबाळकर, फलटण
- दिव्या ज्ञानेश्वर शिमगे, जालना
- ईश्वरी विजय मोहिते, सातारा
- गिरिजा विनायक सुतार, कराड
- हर्षदा हरिश्चंद्र शाहपूरकर, जालना
- हर्षदा मारुती शिंदे, सातारा
- हर्षदा नागावकर जयसिंगपूर
- जानवी गोविंद यादव, जालना
- कांचन पिंटू किरकिरे, नाशिक
- खुशी राजेश दोशी, फलटण
- कुमुद कपिल थोरात पुणे
- माही अजय कडू, अमरावती
- मीताली भीमराव जाधव, जालना
- मिताली कृष्णा मगदुल, कराड
- मुग्धा बाळू मेहतर, फुलंब्री
- निर्मला विठ्ठल साळवे, चिखली
- ओम अंकुश गडे, डोंबिवली
- प्रज्ञा प्रशांत माने, सातारा
- प्रतीक्षा बाळू मेहतर, फुलंब्री
- रसिका बंडू जिरगे, जयसिंगपूर
- सादिया सैपून मिलनमानी, सातारा
- साक्षी राजू मगर, जालना
- सलोनी अनिता संतोष चव्हाण, चिखली
- समिक्षा आप्पासो नरळे, सांगली
- संस्कृती संजय आवताडे, सांगली
- सायली नागेश विसकर, कराड
- शिफा शेख खलील, जालना
- श्रद्धा कलाप्पा बिराजदार, सांगली
- श्रेया निवास पाटील, कराड
- श्रेया सचिनकुमार पवार, कराड
- श्रेया सुरेश यादव, फलटण
- श्रुती अजय द्विवेदी,
- सिद्धी भाऊसाहेब महाडिक, सातारा
- सोहम कल्याणराव जाधव, पुणे
- वृषाली भीमराव जाधव, जालना
- योगेश पुरुषोत्तम वाघ, संभाजीनगर
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि पिंपरी
चिंचवड सायन्स पार्क आयोजित
विज्ञान रंजन स्पर्धा 2025 – अंतिम फेरी –
दिनांक 1 मार्च 2025
स्पर्धकाचे नाव अनुक्रमांक गट
निकष - भाषा आकलन, समानुभूती Empathy, आकर्षक आणि सुटसुटीत, कथेतील मुद्द्यांचा संदर्भ, तर्कसुसंगत
प्रयोग २) द्रावणांचे वर्गीकरण. प्लेट स्वच्छ पुसून
घे,
टिश्यू पेपरने
कोरडी कर. एका ओळीत फेनॉप्थॅलिनचे ५ थेंब ठेव. तसेच दुसऱ्या ओळीत मिथिल ऑरेंजचे ५
थेंब ठेव. दिलेली ५ द्रावणे घे. प्रत्येक द्रावणाचा एक एक थेंब फेनॉप्थॅलिन व
मिथिल ऑरेंजच्या एका एका थेंबावर टाक. रंगाची निरीक्षणे नोंदव. फेनॉप्थॅलिन गुलाबी
झाले तर द्रावण अल्कली अन्यथा आम्ल किंवा उदासीन. मिथिल ऑरेंज लाल झाले तर द्रावण
आम्ल, पिवळे झाले तर द्रावण अल्कली, नारिंगी झाले तर द्रावण उदासीन. परिक्षक – दिगंबर कट्यारे
|
द्रावण क्र. |
फेनॉप्थॅलिन रंग |
मिथिल ऑरेंज रंग |
द्रावण प्रकार |
|
1 |
|
|
|
|
2 |
|
|
|
|
3 |
|
|
|
|
4 |
|
|
|
|
5 |
|
|
|
साहित्य - प्लॅस्टिक प्लेट, टिश्यू पेपर, द्रावणे - फेनॉप्थॅलिन, मिथिल, व्हिनेगर, टॉयलेट क्लिनर, पाणी, स्प्राईट, अमोनिया, चुन्याची निवळी, लिंबूरस, पालक रस, चिंचेचे पाणी, साबणाचे पाणी, दूध पाणी,
हा रसायनशास्त्राचा प्रयोग असूनसुद्धा त्याला टेस्ट ट्यूब वगैरे काही न घेता प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणावर थेंब थेंब रसायन घेण्यात आली हे एक वैशिष्ट्य आहे. दर्शकांच्या रंगात होणाऱ्या बदलावरून एखादे द्रावण आम्ल वा अल्कली वा उदासीन आहे हे ठरवण्याचा हा प्रयोग होता. स्पर्धक आनंदाने प्रयोग करीत होते.प्रयोग करताना आपण वैज्ञानिक असल्याचे जाणवले.गुण देताना त्यांनी रंग बदल, त्या द्रवांचे स्वरुप आम्ल अल्कली उदासीन कसे आहे ते ओळखले जाते की नाही यावर भर दिले.
प्रयोग ३) चवीची परिक्षा – ५ लिंबू सरबतांची दोन दोन थेंबात चव
घे. सरबताचा आंबटपणा,
गोडपणा आणि
खारेपणा किती 1 ते 5 या श्रेणीत लिही. परिक्षक – प्राची चिंचोलकर.
|
सरबत क्र. |
आंबटपणा |
गोडपणा |
खारेपणा |
|
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
|
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
|
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
|
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
|
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
१ २ ३ ४ ५
|
प्रयोग ४) हात आणि दृष्टी समन्वय - ए४ आकाराच्या आडव्या कागदाची घडी घालून दोन भाग कर. उजव्या भागावर उजव्या हाताने आणि डाव्या भागावर डाव्या हाताने विज्ञान संबंधी संज्ञा एकाचवेळी लिहायच्या. एक अट - डाव्या बाजूच्या संज्ञा आरशात प्रतिबिंब असल्या सारख्या दिसायला पाहिजेत. ५ मिनिटात जास्तीत जास्त संज्ञा लिही. परिक्षक – योगेश हके
माझ्याकडे प्रयोग क्रमांक ४ होता तर हा प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेताना खूप छान अनुभव आला व तसेच मला ही काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. या प्रयोगामध्ये विज्ञान विषयासंबंधी ५ शब्द लिहायचे होते. एकाच वेळी दोन्ही हाताने प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला त्यातील एक नेहमीसारखा दुसरा आरशातील प्रतिबिंबा सारखा!
प्रयोग ५) आवारात जाऊन शेजारी शेजारी असणाऱ्या चार वनस्पतींच्या पानांची चित्रे काढ. पानावरील शिरांच्या रचनेचे प्रकार कोणते त्याचे वर्णन कर. परिक्षक – कल्याणी नलगे
माझ्याकडे - झाडांच्या पानावरील शिरा व त्यांची रचना हा प्रयोग आला होता तरी विद्यार्थ्यांनी हा प्रयोग करताना काढलेले चित्र व त्यांची रचना अतिशय चांगल्या प्रकारची होती. वेगवेगळे रचना प्रकार बघण्यास मिळाले व त्यामधून खूप सारे शिकायला मिळाले. पेपर चेक करत असताना नक्की कोणाला मार्क द्यावा हेच कळत नव्हतं कारण एवढी सुंदर सुंदर चित्र विद्यार्थ्यांनी काढले होते व त्यावरील रचनाही अगदी सुंदर प्रकारे केली होती. शेवटी गुण देताना आम्ही विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र कशाप्रकारे काढले आहे त्यावरील शिरांच्या रचना बरोबर आहेत का व त्या पानांविषयी केलेली रचना हे सर्व बघून गुण दिले.विद्यार्थ्यांबरोबर आम्हालाही खूप सारे शिकायला भेटले व खूप छान वाटले पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही नक्की सहभागी होऊ धन्यवाद! - कल्याणी नलगे
पेला बनवण्यासाठी संबंधित व्हिडिओ मूक पद्धतीने तेथील स्क्रीनवर सतत चालू ठेवला होता जो बघत स्पर्धकांनी काम करायचे होते.
परीक्षक म्हणून माझी निरिक्षणे पुढीलप्रमाणे :
* स्पर्धक एकाग्रतेने व्हिडिओ पहायचा प्रयत्न करत होते, परंतु सहजासहजी ते जमत नव्हते. काहीजण तर बावचळत होते.
* व्हिडिओबर हुकूम घड्या घालण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होते.
* तसे करताना कागद घडीमय होत होता व त्यामुळे पुढे परत करताना अडचण येऊन दुसरा कागद घ्यावा लागत होता.
* यामधे बराच मोठा वेळ जात होता गोंधळत होते स्पर्धक.
* बरं पेला पूर्ण केला व नंतर पाणी ओतायला लागले तर पेल्यावरील पकड पाणी धारेने सावकाश ओतणे व नंतर सावकाशीने मोजणी पेल्यात ओतणे यामधेही त्यांचा कस लागत होता तारांबळ उडत होती. काही जणांच्या घड्या निसटत होत्या व परत नवीन कागद घेऊन घड्या घालाव्या लागत होत्या. सर्व धडपडीअखेर मोजणी पेल्यातील पाणीमोजणी किती मिलि आहे हे नोंदवायचे व ते परीक्षकांना पेल्यासहित दाखवणे हेही कस लावणारे होते. पेल्यावरील आकडे मिलि सापडवताना काहीजणांना ते पटकन सापडत नव्हते. या सर्व टप्प्यातून पुढे जात अखेर परीक्षक नोंदी करून गुण देत होते.
दोन स्पर्धक सोडून अन्य सर्व शालेय विद्यार्थी होते. त्यांचे निरिक्षण करताना मुलांची एकाग्रता सूचनेनुसार काम सुरू करण्याचे कौशल्य व शिस्त असे गुण प्रकट होत होते. व्हिडिओ एक-दिशा व मूक पद्धतीने चालू असल्याने व सद्यःस्थितीत याची सवय नसल्याने अवघड वाटत होते. दोन घड्या झाल्या व जरा लक्ष ढळले की व्हिडिओ पूर्ण होऊन परत सुरू होईपर्यंत चुळबुळ चालत होती. व्हिडिओ मागे किंवा पॉझ करता येत नाही का अशी विचारणा होत होती. अशा पद्धतीने या प्रयोगाचेबाबत माझे अनुभव आहेत. या सर्व 2 तासांच्या कालावधीत स्पर्धकांना कृती करताना पाहताना आनंद व मजा येत होती. तरीही एका स्पर्धकाने 400 मिलि पाणी यशस्वीपणे भरून पहिला नंबर मिळवला. अनेकांनी 350 मिलि एवढे पाणी भरले. काहींना दोनदा बनवावे लागले तर खूपजणांच्या घड्या गबाळ्या येत होत्या.
प्रयोग ७)
बटाट्याचा धन - बटाट्याचे १
सेंटीमीटर मापाचे ८ घन काप. त्यापासून २ सेंटीमीटर मापाचा एक घन बनव. आणखी किती
मापाचे घन बनविता येतील? परिक्षक – दीपाली
अकोलकर
प्रयोग ८) झाडाचे वस्तुमान किती? - झाडाचे वजन माहिती करून घेण्यासाठी झाडाची दोन मापे घे. 1.5 मीटरवर झाडाचा घेर आणि झाडाची उंची. झाडावर 1.5 मीटर आणि 3.0 मीटर च्या खुणा केल्या आहेत.
|
झाड क्रमांक |
1.5 मी उंचीवर झाडाच्या खोडाचा घेर मीटर (C) |
झाडाची उंची
मीटर (H) |
झाडाचे वस्तुमान Kg |
|
1 |
|
|
|
|
2 |
|
|
|
हा प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेताना खूप छान अनुभव आला व मलाही काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. या प्रयोगामध्ये झाडाचा घेर, उंची व वस्तुमान काढायचे होते, तसं तर या प्रयोगाचे परफेक्ट उत्तर येणे अशक्य होते तरी सुद्धा सर्व मुलांनी खूप छान प्रयत्न केला व तो प्रयोग आनंदाने केला... आधी मी प्रयोग करून पाहिला होता त्याच नुसार गुण दिले. माझ्या उत्तरा प्रमाणे ज्यांचे उत्तर होते त्यांना जास्त व ज्यांचे उत्तर थोडे मागे पुढे होते त्यांना कमी असे दिले. प्रयोगा साठी 2 झाडे होते तर एका झाडाला पाच गुण. मर्यादा, घेर, उंची यासाठी एक एक गुण व वस्तुमान काढण्यासाठी दोन गुण कारण सूत्राचा उपयोग करायचा होता .. हे सगळे पाहून गुण दिले. स्पर्धकांना घेर मोजतान टेप धरण्यात अडचण येत होती मात्र पेन्सिलचा वापर करून लांबून झाडाची उंची मोजणे सोपे गेले.
प्रयोग ९)
जीवाश्म किंवा स्फटिक ओळख. परिक्षक – डॉ. विद्याधर बोरकर
|
जीवाश्म किंवा स्फटिक |
क्रमांक |
जीवाश्म किंवा स्फटिक |
क्रमांक |
|
कवडीचा जीवाश्म. |
|
खेकड्याच्या आकड्याचा अवशेष. |
|
|
चुनखडक |
|
जिप्सम नावाच्या खनिजाचा स्फटीक |
|
|
झाडाच्या पानाचा जीवाश्म |
|
नामशेष अमोनॉइड प्राण्याचा जीवाश्म |
|
|
पंकाश्म (Mudstone) |
|
पट्टेदार ॲगेट नावाचे खनिज. |
|
|
शंखाचा जीवाश्म. |
|
शिंपल्याचा जीवाश्म. |
|
कवडीचा, शंखाचा आणि झाडाच्या पानाचा; असे तीन जीवाश्म बहुतेक स्पर्धकांनी सहज ओळखले. त्याखालोखाल खेकड्याच्या आकड्याचा जीवाश्मही बऱ्याच स्पर्धकांनी ओळखला. पट्टेदार ॲगेट हे खनिज पट्टेदार या शब्दामुळे ओळखणे शक्य होते, पण सगळ्यांना ते सुचले नाही. शिंपल्याचा जीवाश्म ओळखणे सहज शक्य असूनही काहीजणांना ते जमले नाही. कारण त्यांनी बारकाईने पाहिले नाही. आश्चर्य म्हणजे चार विद्यार्थ्यांनी (तिघे विद्यार्थी, आणि एक विद्यार्थी) 'कवडी म्हणजे काय' ते विचारले. दहाबारा जणांनी 'खेकड्याचा आकडा' म्हणजे काय'असे विचारले. पंकाश्म हा शब्द खूप स्पर्धकांना अडला. चार जणांनी दहाच्या दहा नमुन्यांची नावे अगदी अचूक ओळखली. त्यांनी नऊ नमुने ओळखल्यावर, राहिला तो दहावा नमुना, म्हणून तो पंकाश्म,असे डोके चालवून पंकाश्मही ओळखला.
प्रयोग १०) प्रतिक्रिया वेळ मोजणे – हा प्रयोग जोडीने करायचा आहे. तू पट्टी उभ्या स्थितीत धर. जोडीदाराने हाताचा अंगठा आणि तर्जनी यात ती पकडायची आहे. बोटांच्या टोकांशी 0 सेंटीमीटरवर पट्टी टांग. कोणतीही पूर्वसूचना न देता, पट्टी सोड. जोडीदाराने शक्य तितक्या लवकर पट्टी पकडायची. बोटांनी पट्टी कुठे पकडली गेली तो बिंदू (सेमीमध्ये) नोंदव. असे 5 वेळा करा. काय बदल होतो? त्याचे कारण काय? परिक्षक – अंकिता दिघे
|
अनुक्रम |
पट्टी पकडलेला बिंदू सेंटीमीटर |
फरक |
निष्कर्ष |
|
1 |
A |
- |
|
|
2 |
B |
A-B |
|
|
3 |
C |
B-C |
|
|
4 |
D |
C-D |
|
|
5 |
E |
D-E |
English translation available below Marathi questioner
सूचना
*उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 16 फेब्रुवारी 2025 पूर्वी - मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030 येथे पोचवावी
*प्राथमिक विजेत्यांची नावे 26 फेब्रुवारीला जाहीर केली जातील. *प्राथमिक विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरी शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे होईल
*उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे *परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
*आपल्या उत्तरपत्रिके सोबत पुढील माहिती लिहून पाठवावी.
तसेच गुगल फॉर्मद्वारे भरून पाठवावी.
1. संपूर्ण नाव. 2. पत्ता. 3. मोबाईल नंबर. 4. ई-मेल. 5. विद्यार्थी असल्यास - शाळा / महाविद्यालय. 6. व्यवसाय. 7. जन्मतारीख. 8. शिक्षण.
9. *वयानुसार पुढावा गुण* -
{वय वर्षे: 13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81च्यावर (6)}.
10 *शिक्षणानुसार पुढावा गुण*- {शिक्षण: पाचवीपर्यंत(10) सातवीपर्यंत (9) दहावीपर्यंत (7) बारावीपर्यंत (5) पदवीपर्यंत (3) शास्त्र-शाखा (0)}. 11. *एकूण पुढावा गुण* -
संपर्क– शशी भाटे 9420732852/संजय मा क 9552526909/ राजेंद्रकुमार सराफ 9822186763/ विनय र. र. 9422048967
विज्ञान रंजन स्पर्धा 2025 प्रश्नावली
1. एका पायाची खुर्ची कुठे कुठे वापरतात?
2. मोबाईलमधील सिम कार्डची लांबी, रुंदी किती?
3. तुमच्या खांद्यांची लांबी आणि तुमची उंची यांचे गुणोत्तर किती?
4. महाराष्ट्राच्या मध्यभागी असणारे स्थान कोणते?
5. भाजी बाजारात हमखास किडकी नसणारी शेंगभाजी कोणती?
6. दिवसभरात एखाद्या खांबाची सर्वात लहान सावली कोणत्या दिशेला पडते?
7. भाजी ताजी आहे हे तुमची कोणती ज्ञानेंद्रिये सांगतात?
8. दोन वाघांचे फोटो येथे चिकटवा. त्यांत कोणते फरक दिसतात?
9. दोन कांदे आणि दोन बटाटे चार दिवस पिशवीत बंद ठेवले तर काय होते?
10. तुमच्या घरातल्या तव्यावर किती लांबीची चौरसाकार रोटी भाजता येईल?
1. झाडाची पाने कोणत्या रसायनामुळे हिरवीगार दिसतात?
2. तुमच्या डोक्यात वळवळणाऱ्या किड्याचे आयष्यु किती असते?
3. जमिनीची धूप मोजण्याचे एकक कोणते?
4. सर्वात वेगाने वाढणारी काष्ठ वनस्पती कोणती?
5. दहा हजार वर्षे चालणाऱ्या मोबाईल बॅटरीत कोणते इंधन वापरतात ?
6. दोन नद्यांच्या संगमानंतर कोणत्या नदीचे नाव रहाते?
7. बैलांची बैलगाडी तर रेड्यांची कोणती गाडी ?
8. भारतात टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीकारी बदल कोणी केले?
9. सर्वाधिक घातक असणारा हरितगृह वायू कोणता?
10. जगातील सर्वात वेगवान कण कोणता?
1. लघुकोन, काटकोन, विशालकोन, (?)
2. घनरूप, द्रवरूप, वायुरूप , (?)
3. A, E, I, (?)
4. अर्धा, पाव, अर्धापाव, (?)
5. डाल्टन, थॉमसन, रुदरफोर्ड, (?)
6. दाढ, उपदाढ, सुळे, (?)
7. लाख, कोटी, अब्ज, (?)
8. अश्विनी, भरणी, कृत्तिका, (?)
9. 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर, (?)
10. किलोमीटर, मीटर, मिलीमीटर, (?)
1. भारताच्या राष्ट्रगीतात असणारे भौगोलिक उल्लेख कोणते?
2. लहानपणी सर्वात आधी येणारे, म्हातारपणी सर्वात आधी पडणारे दात कोणते?
3. उघड्या डोळ्यांपेक्षा डोळे मिटून चांगली करता येणारी चार कामे कोणती?
4. नजर लागणे व उतरवणे यातील संकल्पना कोणती?
5. ताजी मासळी आणि शिळी मासळी यात फरक काय?
6. कोणकोणत्या झाडांच्या फुलाला अनेक फळे येतात?
7. मूकबधीर व्यक्ती कोणत्या भाषते विचार करते?
8. घड्याळ नसताना नमाजची वेळ कशी ठरवतात?
9. तोंडाने फुगवलेला फुगा आणि पंपाने फुगवलेला फुगा यात फरक काय ?
10. कडी असणाऱ्या ग्रहांच्या ध्रुव प्रदेशांचे वर्णन करा.
1. चपला बूट संध्याकाळी विकत घ्यावेत.
2. नव्यानेच व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे अंग व्यायामनंतर दुखते.
3. उंच टाचांच्या चपला घालणाऱ्यांना पाठीचा त्रास होतो.
4. रेल्वेत वापरली जाणारी चाके सपाट नसतात.
5. अंतराळ प्रवासात कपातून पाणी पिता येत नाही.
6. पाणी शिळे होत नाही तरी पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट असते.
7. महानदीला त्रिभुज प्रदेश आहे पण नर्मदेला नाही.
8. रॉकेट प्रक्षेपण करताना त्याच्या खालची जमीन ओली करतात.
9. मैसूरपाकला जाळी असते.
10. टोमॅटोच्या शेजारी झेंडूची लागवड फायदेशीर ठरते.
[6] गणिते सोडवा. (16 गुण)
1. क्=1, ख=2, ग् =3 ---- अशा प्रकारे देवनागरीतील व्यंजनांच्या किमती मानल्या आणि अ किंवा आ = 40, इ किंवा ई = 50, उ किंवा ऊ = 60, ए किंवा ऐ =70, ओ किंवा औ = 80 मानले तर युक्ती = य् + उ + क् + त् + ई = 147 येते. तर तुमच्या संपूर्ण नावाची किंमत किती?
2. 90 ने सुरु होणारे दोन मोबाईल क्रमांक आहेत. पुढील लगतच्या अंकाच्या चार जोड्या केल्या तर त्या प्रत्येक जोडीची बेरीज नऊ येते. तर सर्वात मोठा क्रमांक किती? सर्वात लहान? त्यांची बेरीज किती वजाबाकी किती?
3. भोलाकडे 9 कोंबड्या होत्या. एके दिवशी सगळ्यांनी मिळून 50 अंडी दिली. प्रत्येक कोंबडीने विषम संख्येने अंडी दिली. तर कोणत्या कोंबडीने किती अंडी दिली?
4. एका शाळेत चार शिक्षिका अ ब क ड आहेत. त्या प्रत्येकी गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान यांपैकी दोन विषय शिकवतात. अ आणि ब यांचे विषय वेगळे आहेत. इंग्रजीच्या एक शिक्षिका ड आहेत. क विज्ञान आणि गणित शिकवतात. अ गणित शिकवत नाहीत. समाजशास्त्राच्या एक शिक्षिका ब आहेत. तर कोणत्या शिक्षिका कोणते विषय शिकवतात?
[7] प्रयोग करा. (15 गुण)
1. 7 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता तुमच्या घराजवळ एका सपाट पृष्ठभागावर एक पेन्सिल काटकोनात उभी करा. पेन्सिलची लांबी आणि तिच्या सावलीची लांबी मोजा. यांचा वापर करून एक काटकोन त्रिकोण काढा. शिरोबिंदूचा कोन मोजा. 9.30 आणि 10 वाजता हाच प्रयोग करा. निष्कर्ष लिहा. तुमच्या ठिकाणाचे अक्षांश रेखांश लिहा.
2. तीन एकसारखी भांडी घ्या. प्रत्येक भांड्यात 100 मिलीलिटर पाणी घ्या. एक छोटा चमचा घ्या. पहिल्या भांड्यात जास्तीत जास्त किती चमचे मीठ विरघळते ते पहा. तेवढेच मीठ दुसऱ्या भांड्यात घालून विरघळवा आणि त्यात किती चमचे साखर विरघळते ते पहा. तिसऱ्या भांड्यात किती चमचे साखर विरघळते ते पहा. प्रयोगाचे निष्कर्ष लिहा.
3. घरगुती वापराची दोन बर्नरवाली शेगडी वापरून हा प्रयोग करा. एक लिटर आकारमानाचे पातले घ्या. त्यात अर्धा लिटर पाणी भरा. पातले मोठ्या बर्नरवर ठेवा. बर्नर पेटवा. पाण्याला उकळी येण्यास किती वेळ लागतो तो मोजा. हीच कृती छोट्या बर्नरसाठी करा. हे दोन्ही कालावधी आणि बर्नरवरची भोके यांच्यात काही संबंध दिसतो का?
[8] चित्र काढून उत्तर द्या. (15 गुण)
1. L I T S O यातील प्रत्येक मुळाक्षर चार चौरस वापरून बनते. बुद्धीबळाच्या पटावरील 64 चौरस ही अक्षरे वापरून झाकायचे आहेत, तर प्रत्येक अक्षर किती वेळा लागेल? दोन अटी- अक्षरे एकावर एक येता कामा नयेत. प्रत्येक अक्षर वापरलेच पाहिजे.
2. तुमच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा करंगळीच्या ठशाच्या आकारापेक्षा किती मोठा आहे?
3. कॅरमच्या खेळात लाल राणी भोवती काळ्या पांढऱ्या सोंगट्या कोणत्या नियमानुसार रचतात? हेच नियम वापरून दोन-तीन पट मोठी रचना करायची असेल तर किती सोंगट्या लागतील?
[9] निबंध लिहा. मी काय करणार? (15 गुण)
गेल्या काही वर्षात जागतिक तापमानवाढ, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, पाऊसमानात बदल, वणवे पेटणे, पूर, दुष्काळ, यांसारख्या आपत्तींमध्ये वाढ झालेली दिसते. याला कोणती कारणेआहेत? त्यापैकी कोणती कारणे मानव निर्मित आहेत? ती टाळण्यासाठी मला, आपल्याला, राज्यकर्त्याना काय करता येईल ते 500 शब्दात लिहा.
Vidnyan Ranjan Competition 2023
* No entrance fee.* Attractive prizes. * You can find the answers to the questions given below, on your own, by asking anyone, by searching anywhere, or by performing the experiments yourself. * Answer as many questions as you can on a foolscap paper.
* Send your answers to - *Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag, Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune 411030 before 16th February 2025.* * Winners of the preliminary round will be announced on 26th February 2025.* Decisions of the judges are considered final.
*The final round will be held on Saturday 1st March 2023 at Pimpri Chinchwad Science Park. * The final round consists of practical experiments * Scores will be normalized across age groups and educational qualifications by giving bonus points according to the following tables -
*Bonus Points: (in parentheses)*
*By Age:* Up to 13 years (6), 14 to 16
(4), 17 to 20 (2), 41 to 60 (2), 61 to 80 (4), and Beyond 81 years(6).
*By Educational Qualification:* Up to 5th Standard (10), Up to 7th (9), Up to 10th (7), Up to 12th (Non-science Branch) (5), Graduate (Non-Science Branch)(3), 11th or higher (Science Branch)(0).
Send your answer papers along with the following information -
1. Full Name, 2 Address With PIN Code, 3. Telephone / Mobile Phone Number, 4 E-Mail ID, 5.Date of Birth, 6.Educational Qualification, 7.Occupation, 8. Bonus Points: By Age + By Educational Qualification.
You may answer in English but as far as possible give your answers in Marathi
Vidnyan Ranjan Spardha Questions
[1] Observe and answer. (10 marks)
1. Where is a one-legged chair used?
2. What is the length and width of the SIM card in the mobile phone?
3. What is the ratio of your shoulder length to your height?
4. Which is the location in the center of Maharashtra?
5. Which leguminous vegetable in the vegetable market is absolutely pest-free?
6. In which direction does the shortest shadow of a pole fall during the day?
7. Which of your senses tell you that a vegetable is fresh?
8. Paste the photo of two tigers here. What are the differences between them?
9. What happens if two onions and two potatoes are kept in a bag for four days?
10. How big a square roti can be baked on a frying pan at your home?
[2] Answer in one word. (10 marks)
1. What chemical causes the leaves of a plant to look green?
2. What is the lifespan of a worm crawling in your head?
3. What is the unit of measurement of soil erosion?
4. What is the fastest growing woody plant?
5. Which fuel is used in a mobile battery that lasts ten thousand years?
6. Which river is named after the confluence of two rivers?
7. Bulls are to bullock cart what buffaloes are to?
8. Who revolutionized the telecom sector in India?
9. Which is the most dangerous greenhouse gas?
10. Which is the fastest particle in the world?
[3] Who is the fourth? (10 marks)
1. Acute angle, Right angle, Optus angle, (?)
2. Solid, liquid, gas, (?)
3. A, E, I, (?)
4. Half, quarter, half-quarter, (?)
5. Dalton, Thomson, Rutherford, (?)
6. Molars, Pre-molars, Caniens, (?)
7. Lakh, crore, billion, (?)
8. Ashwini, Bharani, Krittika, (?)
9. 21 March, 21 June, 23 September, (?)
10. Kilometre, metre, millimeter, (?)
[4] Answer in brief – (20 Marks)
1. What are the geographical references in India's national anthem?
2. Which teeth come first in childhood and first loss in old age?
3. What are four things that can be done better with eyes closed than with eyes open?
4. What are the presumptions of नजर लागणे and नजर उतरवणे?
5. What are the differences between fresh fish and stale fish?
6. Which trees bear many fruits per flower?
7. In which language does a deaf and dumb person think?
8. How to determine the time of Namaz without a clock?
9. What is the difference between a mouth-inflated balloon and a pump-inflated balloon?
10. Describe the polar regions of any two of the planets with rings.
[5] Write a scientific reason - (20 marks)
1. Shoes should be bought in the evening.
2. A person who is new to exercise feels sore after exercise.
3. High heel wearers suffer from back pain.
4. Wheels used in railways are not flat.
5. You can't drink water from a cup in space travel.
6. Although water does not go stale, there is an expiry date on the water bottle.
7. Mahanadi has a delta region but Narmada does not have it.
8. Why is the ground below a rocket sprinkled with water before it is fired
9. Mysore-Pak is porous.
10. Planting Marigolds next to Tomato is beneficial.
[6] Solve Maths - (16 Marks)
1. क् =1, ख् =2, ग् =3----Thus considering the values of consonants in Devanagari and अ or आ = 40, इ or ई = 50, उ or ऊ = 60, ए or ऐ = 70, ओ or औ = 80 then युक्ती = य् + उ + क् + त् + ई = 147. So how much is your full name worth?
2. There are two mobile numbers starting with 90. If you make four pairs of the next adjacent digits, the sum of each pair is nine. So what is the largest number? The smallest? What is their sum? What is the difference?
3. Bhola had 9 chickens. One day, they all laid 50 eggs together. Each chicken laid an odd number of eggs. So which chicken laid how many eggs?
4. There are four teachers A B C D in a school. Each of them teaches two subjects out of Mathematics, English, Social Studies and Science. The subjects of A and B are different. One of the teachers of English is D. C teaches Science and Mathematics. A does not teach Mathematics. One of the teachers of Social Studies is B. So which teachers teach which subjects?
[7] Experiment- (15 marks)
1. On 7th February at 9 am, place a pencil at a right angle on a flat surface near your house. Measure the length of the pencil and the length of its shadow. Using these, draw a right angle triangle. Measure the angle of the vertex. Repeat the same experiment at 9.30 and 10 am. Write the conclusion. Write the latitude and longitude of your place.
2. Take three identical vessels. Take 100 ml of water in each vessel. Take a small spoon. See how many spoons of salt dissolve in the first vessel at most. Add the same amount of salt to the second vessel and dissolve it and see how many spoons of sugar dissolve in it. See how many spoons of sugar dissolve in the third vessel. Write the results of the experiment.
3. Perform this experiment using a household two-burner grill. Take a one liter size pot. Fill it with half liter of water. Put the pan on a high burner. Light up the burner. Measure how long it takes the water to boil. Do the same for the smaller burners. Do you see any connection between these two periods and holes on the burner?
[8] Draw the picture and answer. (15 marks)
1. Each of the letters L I T S O is made using four squares. If you want to cover all 64 squares on a chess board using these letters, how many times will each letter be used? Two conditions - letters should not overlap. Every letter must be used.
2. How much larger is the imprint of your thumb than the imprint of your little finger?
3. In the game of carrom, by what rule do black and white pieces form around the red queen? Using the same rule, how many pieces will be required if you want to make a composition that is two to three times larger?
[9] Write an Essay - What Should I Do? (15 points)
• Global warming, cyclones, unseasonal rains, changes in rainfall patterns, wildfires, floods, droughts, etc. have seen an increase in disasters in recent years. What causes this? Which of those causes are human-made? What can I, you, the rulers do to avoid it? Write it in 500 words.


















No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला लवकरच संपर्क केला जाईल.