*आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2025*
निकाल
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2025
एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत
एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत

द्वितीय क्रमांक - विद्यार्थी सहायक समिती न्यू गर्ल्स हॉस्टेल
मोबाईल, टिव्ही, टॅब, व्हिडिओ गेम्स, रील्स अशा प्रकारातून सर्वांचा अधिकाधिक वेळ - पडद्याकडे डोळे लावून बघण्यात जात आहे - स्क्रीन टाईम वाढत आहे. तो व्यसनाच्या पातळीपर्यंत पोहोचत आहे. त्याचा परिणाम वैयक्तिक कौटुंबिक तसेच सामाजिक पातळीवर होत आहे तो कसा रोखावा हा एक चिंतेचा विषय आहे याबाबत या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेद्वारे चर्चा घडविण्यात आली. नव्या व्यसनाला आत्ताच पायबंद घालण्यासाठी जनजागृती करायला सहायक ठरण्यासाठी या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचा उपयोग झाला.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग दर वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेत आला आहे. यात वैज्ञानिक विषयाबाबत समाज जागृती करण्याचा हेतू असतो.

यंदाच्या वर्षी मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे सोबत विद्यार्थी सहायक समिती पुणे, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि इनरव्हील ऑफ पुणे विंग्ज यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आयोजित केला.
या आंतरमहाविद्यालयीन आणि आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश जनजागृती बरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य विकसित करणे हा आहे.
या वर्षी १५ गट स्पर्धेत सहभागी झाले. पुणे, पिंपरी चिंचवड सोबतच, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील गटांनी सहभाग घेतला. प्रत्येक गटात 5 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक पालक वा शिक्षक सहभागी झाले.
स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी एक कार्यशाळा 12 ऑगस्ट 2025 व विद्यार्थी सहायक समिती पुणे येथे घेण्यात आली. यात सुमारे 45 व्यक्तींनी सहभाग घेतला. विषय मांडणी श्री. तुषार रंजनकर यांनी केली. पोस्टर रचना, 10-12 पोस्टर कसे बनवावे, प्रदर्शन मांडणी कशी करावी, प्रदर्शन पाहणाऱ्यांशी संवाद कसा साधावा, अहवाल लेखन कसे करावे याबद्दलची माहिती श्री. विनय र. र. व श्रीमती शशी ताई भाटे यांनी दिली. विद्यार्थी सहायक समिती - पुसाळकर हॉल, येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात कार्यशाळा झाली. ज्यांना कार्यशाळेत येणे जमणार नव्हते त्यांच्यासाठी संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळात तुषार रंजनकर यांनी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली. ती यूट्यूबवरही टाकण्यात आली.
पहिली फेरी: सर्व स्पर्धक गटांनी आपण तयार केलेल्या सर्व पोस्टरच्या सॉफ्ट कॉपी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाकडे 19 ऑगस्ट 2025 पर्यंत पाठवल्या. त्यांचे परिक्षण कलाकारा श्रीमती दीप्ती विसपुते यांनी केले. सर्व पोस्टर चांगल्या दर्जाच्या पुढची असल्याचे आढळून आले. काही पोस्टर अधिक आकर्षक करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तर काही पोस्टरमध्ये मजकूराचे प्रमाण जास्त होते ते कमी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पोस्टरची मालिका असणे, किमान मजकूरातून कमाल आशय व्यक्त होणे, सुसंबद्ध आकर्षक चित्र असणे, विषयाची अनेक अंगे सर्व पोस्टर मधून दिसणे या निकषांवर पोस्टर्सचे परिक्षण करण्यात आले.
दुसरी फेरी: 20 ते 26 ऑगस्ट 2025 या काळात सर्व स्पर्धक गटांनी किमान पाच ठिकाणी प्रत्येकी एक तास पोस्टर प्रदर्शन मांडण्याची अपेक्षा केली होती. त्याप्रमाणे बहुतांश गटांनी प्रदर्शने मांडली. काही गटांनी आगावू सुचवा देऊन पोस्टर प्रदर्शन कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी करणार हे स्पष्ट कळवले. ते गट त्यामुळे गुणदानात पुढे गेले. सार्वजनिक ठिकाणी पोस्टर प्रदर्शन दाखविताना सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षिका, मुख्याध्यापिकांनी सहकार्य केले. हुजूरपागा कात्रज शाळेच्या गटांच्या प्रदर्शनाची दखल एका दूरदर्शन वाहिनेने घेतली, वृत्तपत्रात फोटो सकट बातमीही छापून आली. अक्षर नंदन शाळेच्या प्रदर्शनाचा फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या फेरीत आम जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे स्यर्धकांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना आत्मविश्वास मिळतो - हा अनुभव बहुतेकांना आला. ऐनवेळी येणाऱ्या समस्यांमधून मार्ग कसे काढता येतात याचाही प्रत्यय आला.
तिसरी फेरी: पोस्टर प्रदर्शनाचा अहवाल पाठवणे. अंतिम मुदत: 29 ऑगस्ट होती. ज्या गटांनी आपले पोस्टर प्रदर्शन झाल्या झाल्या अहवाल नोंदवले होते त्यांचे अहवाल ताजे आणि वेळेआधीच पूर्ण झाले होते. या अहवालांमध्ये पाच ठिकाणचे फोटो पाठवले. काहींनी जास्त फोटो ही जोडले. तसेच गटाने काम सुरू करताना काय विचार विमर्श केला, कामे कशी वाटून घेतली, प्रत्यक्ष पोस्टर प्रदर्शन मांडताना आलेले अनुभव, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या गोष्टीचा उल्लेख आपल्या अहवालात केला. या अहवालाचे परिक्षण निवृत्त प्राचार्य श्रीमती नीता शहा यांनी केले.

या फेऱ्यांचा परिक्षणांतून अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. महाविद्यालयीन पातळीवर दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले तर विद्यालयीन पातळीवर नऊ संघांची निवड करण्यात आली.
अंतिम फेरी दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, चिंचवड येथे दुपारी पाच वाजता सुरू झाली. सभागृहातील मंचावर प्रदर्शन मांडून एक एक गटाने निवेदन केले. निवेदनाचे कौशल्य, भाषा, उत्स्फूर्तता, विषयाचा आवाका यांचे परिक्षण करण्यात आले. महाविद्यालयीन गटातील दोन्ही संघांनी संगणकाचा वापर केला होता. मात्र त्या बरोबर चित्रे चित्तवेधक करणे, संपूर्ण चित्र मालिकेचा बाज एकसंध राखण्यात डॉ डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी पुणे 18, महाविद्यालयाचा संघ सरस ठरला. त्यांना प्रथम क्रमांक - रोख रुपये 3000, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रे मिळाली. द्वितीय क्रमांक - विद्यार्थी सहायक समिती न्यू गर्ल्स होस्टेल, पुणे यांना रोख रुपये 2000, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
शालेय पातळीवर -

द्वितीय क्रमांक - न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी, नाशिक. रोख रुपये 2000, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र.

उत्तेजनार्थ - रोख रुपये 500 आणि प्रशस्तीपत्र
* अक्षर नंदन माध्यमिक शाळा, शिवाजी हौ सोसा. पुणे, * शिक्षण रंजन केंद्र, हडपसर आणि शिवाजीनगर, * दादा महाराज नाटेकर गुरूकुल, चिखली, * विक्रमगड ज्युनिअर कॉलेज व हायस्कूल, पालघर, * हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा यांना देण्यात आली.
अंतिम फेरीचे परिक्षण डॉ. विद्याधर बोरकर आणि श्री. भालचंद्र माडगूळकर यांनी केले.
या कार्यक्रमाला धरून श्री. तुषार रंजनकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी ते होऊ शकले नाही. त्याबद्दल बोलताना श्री. रंजनकर म्हणाले की स्पर्धक गटांचा सांगण्यातला उत्साह आणि त्यांना सापडलेले नवे नवे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. मी माझ्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत त्यांचा समावेश करेन.
या स्पर्धेच्या संयोजिका श्रीमती शशीताई भाटे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. त्यांना श्रीमती मेघना परांजपे, श्री. संजय मा. क., श्री . सुनील पोटे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे पदाधिकारी विनय र. र., कार्यकारिणी सभासद अशोक तातुगडे उपस्थित होते. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चे प्रमुख तुपे सर, डॉ. श्रद्धा खांपरिया, कासार सर, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. इनरव्हील ऑफ पुणे विंग्ज यांच्या सेक्रेटरी सुविधा नाईक, राष्ट्रीय खेळाडू अंजली वर्टी - दळवी उपस्थित होत्या.
प्रेक्षकांमध्ये प्रज्ञा पिसोळकर, यशवंत लिमये, दिगंबर कट्यारे, अमोल झिरमिले व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी रोख रकमेची बक्षिसे मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि विद्यार्थी सहायक समिती यांनी दिली तर ट्रॉफी इनरव्हील ऑफ पुणे विंग्ज यांच्या वतीने श्रीमती उज्ज्वला नवले यांनी उपलब्ध करून दिल्या. ग्रीन ग्राफिक्स चे रमाकांत धनोकर यांनी प्रमाणपत्रे तयार करून दिली. त्यांचे तसेच ही स्पर्धा उत्तम तऱ्हेने पार पाडण्यासाठी आपला सहयोग दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
.jpeg)

आयोजक -
* मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग *विद्यार्थी सहायक समिती पुणे, * पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, * इनरव्हील ऑफ पुणे विंग्ज
----------------------------------
*आवाहन पत्र*
विषय: *एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत*
*आवाहन पत्र*
विषय: *एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत*

https://drive.google.com/drive/folders/1VUcxnBoWAgxgJcakQHZ8nCBteE-lsHER?usp=sharing
मोबाईलच्या व्यसनाबाबत श्री. तुषार रंजनकर यांनी केलेले प्रतिपादन जरूर पहा.
मान्यवर मुख्याध्यापक/प्राचार्य,
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग दर वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षी एक आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेत असतो. यात वैज्ञानिक विषयाबाबत समाज जागृती करण्याचा हेतू असतो.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, यांच्या वतीने आपल्या शाळेला आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देत आहोत. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य विकसित करणे हा आहे.
*स्पर्धा तपशील:*
- *गट रचना:* प्रत्येक गटात 5 विद्यार्थी विद्यार्थिनी + 1 मार्गदर्शक (पालक/शिक्षक).
- एका शाळेतून / महाविद्यालयातून एकापेक्षा जास्त गट सहभागी होऊ शकतात.
- *स्पर्धा विषय:*एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत.*
*स्पर्धेच्या टप्प्यांचा तपशील:*
1. *कार्यशाळा:*
- *दिनांक:* 12 ऑगस्ट 2025
- *माहिती:* विषय मांडणी, पोस्टर रचना, 10-12 पोस्टर कसे बनवावे, प्रदर्शन मांडणी, प्रदर्शन पाहणाऱ्यांशी संवाद कौशल्य, अहवाल लेखन कौशल्य इत्यादी.
- *ठिकाण:*
विद्यार्थी सहायक समिती - पुसाळकर हॉल,
लाला लजपतराय विद्यार्थी भवन
103 ए शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या मागे,
सेनापती बापट रोड, पुणे 411016
- *वेळ:* सकाळी 10 ते दुपारी 4
103 ए शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या मागे,
सेनापती बापट रोड, पुणे 411016
- *वेळ:* सकाळी 10 ते दुपारी 4
( न जमल्यास संध्याकाळी 6.30 ते 7.30 संक्षिप्त स्वरूपात माहितीसाठी यावे )
2. *पहिली फेरी:*
- सर्व पोस्टरच्या सॉफ्ट कॉपी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाकडे पाठवणे.
- *अंतिम मुदत:* 19 ऑगस्ट 2025
- *ईमेल:* mavipa.pune@gmail.com
3. *दुसरी फेरी:*
- किमान पाच ठिकाणी प्रत्येकी एक तास पोस्टर प्रदर्शन मांडणे.
- *कालावधी:* 20 ते 26 ऑगस्ट 2025
4. *तिसरी फेरी:*
- पोस्टर प्रदर्शनाचा अहवाल पाठवणे.
- *अंतिम मुदत:* 29 ऑगस्ट 2025
- यातून अंतिम फेरीसाठी निवड होईल.
5. *अंतिम फेरी व बक्षीस समारंभ:*
- *दिनांक:* 1 सप्टेंबर 2025
- *ठिकाण:* पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, चिंचवड.
- *वेळ:* - नंतर जाहीर करण्यात येईल.
शालेय व महाविद्यालयीन गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
स्पर्धा संयोजक -
श्रीमती शशीताई भाटे 9420732852
ई-मेल mavipa.pune@gmail.com
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग,
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030
आपल्या शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या अनोख्या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, ही विनंती. सहभागासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी.
*नोंदणी प्रक्रिया:*
कृपया शाळेचे / महाविद्यालयाचे नाव, स्पर्धकांची नावे, आणि मार्गदर्शकांचे नाव ईमेलद्वारे अथवा गुगल फॉर्म द्वारे, 17 ऑगस्ट 2025 पर्यंत कळवावे.
नोंदणीसाठी पुढील गुगल फॉर्म वापरावा -
नोंदणीसाठी पुढील गुगल फॉर्म वापरावा -
https://forms.gle/MY7HdQKu1HBKp71LA
- प्रत्येक गटास प्रवेश शुल्क रु. 300/- फक्त
- शुल्क भरण्यासाठी माहिती -
- खात्याचे नाव -
- Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag , मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग. IDBI आय डी बी आय बँक शाखा सदाशिव पेठ पुणे-30 बचत खाते क्र.49010010077236 IFSC CODE-IBKL0000490
पोस्टर रचनेच्या टिप्स
1. स्पष्ट आणि आकर्षक संदेश:
- पोस्टरचा मुख्य संदेश (उदा. "एक नवे व्यसन") थोडक्यात, ठळक आणि लक्षवेधी असावा.
- मोठ्या, वाचण्यास सोप्या फॉन्टचा वापर करा (उदा. Arial, Verdana).
2. रंगसंगती आणि डिझाइन:
- रंगांचा वापर मर्यादित आणि विषयाशी सुसंगत ठेवा (उदा. व्यसनासाठी गडद रंग, जागरूकतेसाठी चमकदार रंग).
- पांढऱ्या जागेचा (white space) योग्य वापर करा, जेणेकरून पोस्टर गर्दीचे वाटणार नाही.
3. प्रतिमा आणि ग्राफिक्स:
- विषयाशी संबंधित उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमा किंवा रेखाचित्रांचा वापर करा.
- जास्त ग्राफिक्स टाळा; साधेपणा ठेवा.
4. माहितीचे स्तर:
- शीर्षक (मोठे आणि ठळक), उपशीर्षक आणि मुख्य मजकूर असे तीन स्तर ठेवा.
- बुलेट पॉइंट्स किंवा क्रमांक वापरून माहिती संक्षिप्त मांडा.
5. फॉन्ट आणि आकार:
- शीर्षकासाठी 36-48 पॉइंट्स, उपशीर्षकासाठी 24-36 पॉइंट्स आणि मजकूरासाठी 18-24 पॉइंट्स फॉन्ट आकार वापरा.
- एक किंवा दोन फॉन्ट प्रकार वापरा (जास्त प्रकार टाळा).
6. व्हिज्युअल प्रवाह:
- माहिती डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली अशा क्रमाने मांडा, जेणेकरून पाहणाऱ्यांना वाचणे सोपे जाईल.
- महत्त्वाच्या मुद्द्यांना हायलाइट करा (उदा. रंग, बॉर्डर किंवा आकार).
7. विषयाशी सुसंगती:
- "एक नवे व्यसन" या विषयावर लक्ष केंद्रित करा. उदा. व्यसनाचे प्रकार, परिणाम, उपाय यांवर माहिती द्या.
- आकडेवारी, उदाहरणे किंवा छोट्या कथा वापरून संदेश प्रभावी करा.
8. टिकाऊपणा आणि साहित्य:
- टिकाऊ कागद (उदा. ग्लॉसी किंवा मॅट) वापरा.
किंवा फ्लेक्स प्रिंट करून घ्या
- पोस्टरचा आकार (उदा. A2 किंवा A1) प्रदर्शनाच्या ठिकाणानुसार ठरवा.
9. चाचणी आणि सुधारणा:
- पोस्टर तयार केल्यानंतर 2-3 मीटर अंतरावरून पाहून वाचनीयता तपासा.
- सहकारी किंवा मार्गदर्शकांकडून अभिप्राय घेऊन सुधारणा करा.
10. संपर्क माहिती:
- पोस्टरवर आयोजकांचा संपर्क (उदा. मराठी विज्ञान परिषद, पुणे) आणि स्पर्धेची माहिती (उदा. तारीख, ठिकाण) नमूद करा.
प्रदर्शनासाठी टीप:
- पोस्टर मांडताना स्टँड, पिन-अप बोर्ड किंवा भिंतीचा योग्य वापर करा.
- प्रदर्शनादरम्यान पाहणाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तयार रहा; मुख्य मुद्दे थोडक्यात सांगण्याचा सराव करा.
या टिप्स वापरून आकर्षक, माहितीपूर्ण आणि प्रभावी पोस्टर तयार करा! यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा!
प्रदर्शन कौशल्य विकास टिप्स
("एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत" या विषयावरील आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धेसाठी)
1. विषयाची तयारी:
- पोस्टरवरील माहिती पूर्णपणे समजून घ्या. व्यसनाचे प्रकार, परिणाम, आकडेवारी आणि उपाय यांवर संशोधन करा.
- विषयाशी संबंधित 2-3 छोटी उदाहरणे किंवा कथा तयार ठेवा, ज्या पाहणाऱ्यांचे लक्ष वेधतील.
2. प्रस्तुतीकरण कौशल्य:
- स्पष्ट बोलणे: माहिती साध्या, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण भाषेत सांगा. जटिल शब्द टाळा.
- संक्षिप्तता: प्रत्येक मुद्दा 1-2 वाक्यांत मांडा. उदा. "स्मार्टफोन व्यसनामुळे तरुणांमध्ये एकाग्रता कमी होत आहे."
- दृकसंपर्क: पाहणाऱ्यांशी नजर भेटवून बोला; यामुळे विश्वास निर्माण होतो.
3. पाहणाऱ्यांशी संवाद:
- प्रश्नांना तयार रहा. उदा. "तुम्ही व्यसन कसे ओळखाल?" यासारख्या प्रश्नांना संक्षिप्त, तथ्यपूर्ण उत्तरे द्या.
- पाहणाऱ्यांचे प्रश्न ऐकून त्यांना प्रोत्साहन द्या; उदा. "तुम्हाला याबद्दल काय वाटते?"
- सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण वृत्ती ठेवा.
4. पोस्टर मांडणी:
- पोस्टरला व्यवस्थित आणि डोळ्यांच्या पातळीवर लावा, जेणेकरून ते सहज दिसेल.
- महत्त्वाचे मुद्दे दाखवण्यासाठी हातवारे किंवा पॉइंटरचा वापर करा.
- प्रकाशयोजना आणि जागेची निवड याकडे लक्ष द्या; गर्दीच्या ठिकाणी आवाज स्पष्ट असावा.
5. वेळेचे व्यवस्थापन:
- प्रत्येक पाहणाऱ्याला 2-3 मिनिटांत माहिती सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल.
- एक तासाच्या प्रदर्शनात सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होईल याची खात्री करा.
6. गट समन्वय:
- गटातील प्रत्येक सदस्याला विशिष्ट भूमिका द्या; उदा. एकजण माहिती सांगेल, दुसरा प्रश्न हाताळेल.
- सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे आणि सरावादरम्यान एकमेकांचे अभिप्राय घ्यावेत.
7. अहवाल लेखनासाठी तयारी:
- प्रदर्शनादरम्यान पाहणाऱ्यांच्या प्रतिक्रिया, प्रश्न आणि उपस्थिती नोंदवा.
- फोटो, व्हिडिओ किंवा टिपणे घ्या, जे अहवालात उपयोगी पडतील.
- अहवालात प्रदर्शनाचा प्रभाव, शिकलेली धडपड आणि सुधारणा यांचा समावेश करा.
8. सराव आणि आत्मविश्वास:
- प्रदर्शनापूर्वी गटाने एकत्र सराव करावा; उदा. मॉक प्रेझेंटेशन करा.
- शांत आणि सकारात्मक राहण्यासाठी खोल श्वास घेण्याचा सराव करा.
**प्रदर्शनादरम्यान लक्षात ठेवा:**
- प्रत्येक ठिकाणी (किमान ५ ठिकाणी, १८-२४ ऑगस्ट) प्रदर्शनाचा अनुभव वेगळा असेल; त्यानुसार लवचिक राहा.
- "मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग" च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा आणि संपर्कात रहा (mavipa.pune@gmail.com).
या टिप्सचा वापर करून तुम्ही प्रभावी प्रदर्शन सादर करू शकाल आणि स्पर्धेत यश मिळवू शकाल! शुभेच्छा!
नमुन्यादाखल एक पोस्टर प्रदर्शन मालिका
विषय: एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत
खालील मालिका १० पोस्टरची आहे, प्रत्येक पोस्टरचे शीर्षक, मजकूर आणि प्रस्तावित चित्र/ग्राफिक्स यांचा तपशील खाली दिला आहे. प्रत्येक पोस्टर विषयाचा एक विशिष्ट पैलू हाताळेल, जेणेकरून मालिका सर्वंकष आणि प्रभावी होईल. पोस्टर साधे, आकर्षक आणि माहितीपूर्ण असावेत, जे बालकांपासून थोरांपर्यंत सर्वांना समजतील.
---
पोस्टर १: व्यसन म्हणजे काय?**
- मजकूर:
- व्यसन म्हणजे कोणत्याही गोष्टीची सवय ज्यामुळे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान होते.
- उदाहरणे: स्मार्टफोन, सोशल मीडिया, दारू, तंबाखू, गेमिंग.
- "तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम आहात का?"
- चित्र/ग्राफिक्स:
- माणसाच्या हाताला साखळदंडाने बांधलेला स्मार्टफोन किंवा सिगारेट.
- प्रश्नचिन्ह आणि विचार करणारी व्यक्ती यांचे रेखाचित्र.
- रंग: गडद पार्श्वभूमीवर पांढरे किंवा पिवळे मजकूर.
पोस्टर २: व्यसनाचे नवे चेहेरे
- मजकूर:
- आजच्या काळात व्यसन फक्त दारू किंवा तंबाखूपुरते मर्यादित नाही.
- नवे व्यसन: स्मार्टफोन, सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग, बिंज-वॉचिंग.
- "तुम्ही किती तास स्क्रीनवर घालवता?"
- चित्र/ग्राफिक्स:
- स्मार्टफोन, गेमिंग कन्सोल आणि टीव्ही स्क्रीन यांचा समूह.
- एका मुलाच्या डोळ्यांवरून स्क्रीनचा प्रकाश परावर्तित होताना दाखवा.
- रंग: निळा (स्क्रीन लाइट) आणि लाल (सावधानता).
पोस्टर ३: बालकांवर व्यसनाचा परिणाम*
- मजकूर:
- लहान वयातच स्मार्टफोन आणि गेमिंगच्या व्यसनाची लागण.
- परिणाम: अभ्यासात अडथळा, एकाग्रता कमी होणे, सामाजिक अंतर.
- "मुलांना स्क्रीनपासून मुक्त करा!"
- चित्र/ग्राफिक्स:
- एक मूल स्मार्टफोन पाहत असताना आणि पुस्तके बाजूला पडलेली दाखवा.
- उदास चेहरा किंवा एकटेपणाचे रेखाचित्र.
- रंग: गुलाबी आणि राखाडी.
पोस्टर ४: तरुणांमधील व्यसनाची कारणे*
- मजकूर:
- सोशल मीडियावर लाइक्स आणि फॉलोअर्सचा दबाव.
- तणाव, एकटेपणा आणि मनोरंजनाची गरज यामुळे व्यसन वाढते.
- "तुम्ही खरे आहात की ऑनलाइन आवृत्ती?"
- चित्र/ग्राफिक्स:
- सोशल मीडियाच्या लाइक बटणांचा ढीग आणि त्याखाली दबलेली व्यक्ती.
- तणावग्रस्त तरुणाचा चेहरा.
- रंग: लाल आणि काळा.
पोस्टर ५: प्रौढांमधील व्यसनाची लक्षणे
- मजकूर:
- व्यसनाची लक्षणे: कामात अडथळा, नातेसंबंध बिघडणे, आरोग्याची हानी.
- उदाहरण: ऑफिसमधील सतत फोन तपासणे, दारू/तंबाखूचे सेवन.
- "तुमच्या सवयी तुम्हाला नियंत्रित करतात का?"
- चित्र/ग्राफिक्स:
- ऑफिसमध्ये फोन पाहणारी व्यक्ती आणि त्यामागे घड्याळ.
- तंबाखूच्या धुराचे प्रतीकात्मक रेखाचित्र.
- रंग: गडद निळा आणि पांढरा.
पोस्टर ६: वृद्धांमधील व्यसनाचे स्वरूप
- मजकूर:
- वृद्धांमध्ये व्यसन: टीव्ही, औषधांचा गैरवापर, जुगार.
- परिणाम: एकाकीपणा, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास.
- "वय वाढले तरी सवयी बदलता येतात!"
- चित्र/ग्राफिक्स:
- वृद्ध व्यक्ती टीव्ही पाहताना किंवा जुगार खेळताना.
- एकाकीपणाचे प्रतीक म्हणून रिकामे घर.
- रंग: राखाडी आणि पिवळा.
पोस्टर ७: व्यसनाचे शारीरिक परिणाम
- मजकूर:
- डोळ्यांचे आजार, झोपेची कमतरता, हृदयविकार, यकृताचे नुकसान.
- स्मार्टफोनमुळे मान आणि पाठदुखी.
- "तुमच्या आरोग्याची किंमत काय?"
- चित्र/ग्राफिक्स:
- मान खाली घालून गप्प बसलेली व्यक्ती आणि डोळ्यांवर ताण दाखवणारी प्रतिमा.
- हृदय आणि यकृताचे साधे रेखाचित्र.
- रंग: लाल आणि पांढरा.
पोस्टर ८: व्यसनाचे मानसिक परिणाम
- मजकूर:
- तणाव, चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होणे.
- सोशल मीडियामुळे तुलना आणि न्यूनगंड.
- "तुमचे मन मुक्त आहे का?"
- चित्र/ग्राफिक्स:
- ढगांखालील उदास चेहरा आणि सोशल मीडिया आयकॉन्स.
- मनाला साखळदंडाने बांधलेले रेखाचित्र.
- रंग: गडद निळा आणि राखाडी.
पोस्टर ९: व्यसनापासून मुक्तीचे मार्ग
- मजकूर:
- वेळेचे नियोजन, छंद जोपासणे, व्यायाम आणि कुटुंबासोबत वेळ.
- समुपदेशन आणि जागरूकता यांचा लाभ घ्या.
- "आजच पहिले पाऊल उचला!"
- चित्र/ग्राफिक्स:
- सूर्यप्रकाशात पुस्तक वाचणारी किंवा खेळणारी व्यक्ती.
- समुपदेशन केंद्राचे प्रतीकात्मक चित्र.
- रंग: हिरवा आणि पिवळा (आशा आणि सकारात्मकता).
पोस्टर १०: समाजाची जबाबदारी
- मजकूर:
- व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी एकत्र यावे.
- शाळा, पालक आणि समुदाय यांनी जागरूकता वाढवावी.
- "एकत्र मिळून व्यसनमुक्त भविष्य घडवूया!"
- चित्र/ग्राफिक्स:
- हातात हात घेऊन उभ्या असलेल्या विविध वयोगटातील लोकांचे रेखाचित्र.
- सूर्योदय आणि एकत्रित समुदायाचे प्रतीक.
- रंग: चमकदार हिरवा, निळा आणि पिवळा.
सामान्य टिप्स:
- फॉन्ट: शीर्षकासाठी मोठा आणि ठळक फॉन्ट (36-48 पॉइंट्स), मजकूरासाठी 18-24 पॉइंट्स.
- आकार: A2 किंवा A1, जेणेकरून प्रदर्शनात दिसेल.
- रंगसंगती: प्रत्येक पोस्टरसाठी 2-3 रंग वापरा; जास्त रंग टाळा.
- माहिती:प्रत्येक पोस्टरवर 3-4 बुलेट पॉइंट्स आणि एक प्रभावी प्रश्न किंवा आवाहन.
- आयोजक माहिती: प्रत्येक पोस्टरच्या तळाशी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, पुणे ४११०३० आणि ईमेल (mavipa.pune@gmail.com) नमूद करा.
प्रदर्शनासाठी सूचना:
- पोस्टर मालिका क्रमाने मांडा, जेणेकरून विषयाचा प्रवाह कायम राहील (उदा. व्यसनाची व्याख्या → परिणाम → उपाय → समाजाची भूमिका).
- प्रत्येक पोस्टरवर एक मुख्य चित्र किंवा ग्राफिक ठेवा, जे विषयाला पूरक असेल.
- सॉफ्ट कॉपी 19 ऑगस्टपर्यंत mavipa.pune@gmail.com वर पाठवताना PDF फॉरमॅट आणि उच्च रिझोल्यूशन (300 DPI) वापरा.
या मालिकेचा वापर करून तुम्ही प्रभावी आणि माहितीपूर्ण प्रदर्शन सादर करू शकाल. यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा!

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला लवकरच संपर्क केला जाईल.