Thursday, October 30, 2025

कार्यक्रम अहवाल : एप्रिल २०२५ ते मार्च २०२६

 *मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग*

कार्यक्रम अहवाल : एप्रिल २०२५ ते मार्च २०२६

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत विविध शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले. जागतिक जल दिन, वर्धापन दिन, विज्ञान व्याख्यानमाला, कार्यशाळा, शिबिरे, विज्ञानवारी, पोस्टर स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, डॉ. जयंत नारळीकर जन्मदिनानिमित्त - विज्ञान कथाकथन दिन असे उपक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्यजनांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी आयोजित केले गेले. या उपक्रमांमध्ये मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाला - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, भावार्थ, विद्यार्थी सहाय्यक समिती, रोटरी क्लब, शाळा-महाविद्यालये यांचे सहकार्य मिळाले.

एप्रिल २०२५

१ एप्रिल २०२५ | संध्याकाळी ५.३० 
स्थळ : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क
विज्ञान व्याख्यानमाला – पुष्प १२
विषय : दिनदर्शिकांची कथा
वक्ते : हंसा पद्मनाभन
वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिनदर्शिका कशी विकसित झाली, त्यातील गणितीय व खगोलीय आधार यांचे रोचक विवेचन केले.

• मंगळवार, १५ एप्रिल २०२५ | संध्याकाळी ६.१५ ते ७.४५
स्थळ : फिरोदिया सभागृह, अभियंता भवन, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे
कार्यक्रम : जागतिक जल दिन उत्सव 
संयोजन : द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) पुणे स्थानिक केंद्र, संयुक्त सहभाग : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग + १२ संस्था 
मुख्य विषय :  हिमनद्या वाचवा – हिमालयातील हिमनद्यांना असलेले धोके

प्रमुख वक्ते व सहभागी :
पूर्वा शिंदे सिंग (अनुभवी पर्वतारोही) – प्रस्तावना
वसंत पांदरकर, डॉ. राजेंद्रकुमार सराफ, डॉ. उत्तम अवारी, डॉ. भालचंद्र चव्हाण, अभि. डी. एस. चासकर, डॉ. पी. मालती, रो. अरविंद मीठसागर, श्रीमती शैलजा देशपांडे, अभि. निलेश गांधी, डॉ. एस. डी. लोखंडे, डॉ. राजेंद्र शेंडे, डॉ. डी. एस. बोरमाने, डॉ. सुजाता कोडाग, श्री अमोघ घमंडे
उपस्थित संस्था : NWA, GSDA, ग्रीन टेर्रे, मविप, IPA, रोटरी अपटाऊन, JLRF, ECI, AISSMS COE, DYPCOE आकुर्डी, SCOE वडगाव
उपस्थित मुद्दे :
  • जलवायू बदलामुळे हिमनद्यांची पिछेहाट
  • ग्लेशियर तलाव फुटणे (GLOF)
  • काळा कार्बन व औद्योगिक प्रदूषण
  • मानवी हस्तक्षेप (बांधकाम, पर्यटन)
  • दीर्घकालीन पाणी अभाव
विशेष :
*महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रदर्शन*

• शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ | संध्याकाळी ६.१५
स्थळ : एस एम जोशी फाउंडेशन, नवी पेठ
कार्यक्रम : कार्यशाळा -
विषय : सृजनशीलता म्हणजे काय?
मार्गदर्शन : डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (मानसशास्त्र प्राध्यापक, १२ वर्षांचा संशोधन अनुभव)

सर्जनशीलता ही प्रत्येकात आहे – फक्त मार्गदर्शन हवे. कृतीशील उपक्रमाद्वारे विचार बहर, नवदृष्टी मिळवणे. यात मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग होता .
डॉ. प्रज्ञा कुलकर्णी म्हणाल्या की सर्जनशीलता म्हणजे कल्पनांना मुक्तपणे वाव देण्याची कला ! ती प्रत्येकामध्ये आहे, ती शोधायला जरासे मार्गदर्शन लागते. आपल्या तसेच मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे आपले विचार कसे बहरावेत? नवीन दृष्टिकोन कसा मिळवावा? हे प्रत्यक्ष कृतीतून सहभागींनी जाणून घेतले. 

• शनिवार, १९ एप्रिल २०२५ | संध्याकाळी ५.१५

स्थळ : भावार्थ, कर्वे रस्ता
व्याख्यान - विषय : नद्या, नदीकाठ आणि तटबंदी
वक्ते : प्राजक्ता महाजन (पुणे रिव्हर रिव्हायव्हल)
मुख्य मुद्दे :
नद्यांचा नैसर्गिक प्रवाह संरक्षित ठेवा. नदीकाठावरील शतकानुशतके जुनी झाडे – अमूल्य वारसा, तटबंदी = अप्रभावी, जैवविविधता नष्ट, RFD प्रकल्पात १,००९ झाडे तोडण्यास विरोध, नदीकाठांना "डिम्ड फॉरेस्ट" घोषित करा. १००% सांडपाणी प्रक्रिया होईपर्यंत प्रकल्प थांबवा. प्राजक्ता महाजन यांच्या नद्या, नदीकाठ आणि तटबंदी या विषयावरील विचार प्राजक्ता महाजन या पुणे रिव्हर रिव्हायव्हल (Pune River Revival) या नागरी मोहिमेत सक्रिय सहभागी आहेत, त्या मुळा-मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या मांडणीत नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाचे संरक्षण, नदीकाठावरील जैवविविधतेचे महत्त्व आणि तटबंदी सारख्या अभियांत्रिकी हस्तक्षेपांविरोधातील पर्यावरणीय दृष्टिकोन केंद्रस्थानी होता. नदीकाठावरील प्राचीन वृक्षसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यावर त्यांनी भर दिला. पुण्यातील नदीकाठावरील वृक्षांचे सर्वेक्षण करताना त्यांनी सांगितले की, ही झाडे शतकानुशतके वाढलेली आहेत आणि त्यांचे पर्यावरणीय व सांस्कृतिक मूल्य अमूल्य आहे. "या वारशाला प्रदूषण आणि नाशापासून वाचवणे गरजेचे आहे; अतिरिक्त सौंदर्यीकरणाची गरज नाही, फक्त स्वच्छता आणि संरक्षण पुरेसे आहे," असे त्या म्हणाल्या. तटबंदी आणि पूर व्यवस्थापनावरील टीका केली. तटबंदी बांधणे हा पूर नियंत्रणाचा जुना आणि अप्रभावी मार्ग आहे. यामुळे नैसर्गिक निवासस्थाने नष्ट होतात आणि पाण्याची पातळी वाढण्याची भीती निर्माण होते, सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण होते. त्यांनी नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला प्राधान्य देण्याची वकिली केली आहे. पुण्यातील मुळा-मुठा रिव्हरफ्रंट विकास प्रकल्प (RFD) मुळे नदीकाठावरील १,००९ झाडे तोडली जाणार असल्याच्या विरोधात त्या सक्रिय आहेत. नदीकाठांना "डिम्ड फॉरेस्ट" म्हणून जाहीर करावे म्हणजे जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल, १००% सांडपाणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नदीकाठ प्रकल्प थांबवावेत. शेती, धर्म किंवा आर्थिक स्थिती काहीही असो, स्वच्छ हवा आणि पाण्याची गरज सर्वांसाठी समान आहे; याला प्राधान्य हवे असे आवाहन त्यांनी केले. 

• रविवार, २७ एप्रिल २०२५ | सकाळी १०.०० ते १.३०
स्थळ : विज्ञान भवन, मराठी विज्ञान परिषद 
कार्यक्रम : ६९ वा वर्धापन दिन. 
प्रमुख पाहुणे : प्रा. अजित केंभावी (निवृत्त संचालक, आयुका). पुरस्कार वितरण
उपस्थिती : श्री संजय मा. क.
मराठी विज्ञान परिषदेचा एकोणसाठावा वर्धापन दिन रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत परिषदेच्या विज्ञान भवनात साजरा केला गेला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अजित केंभावी (निवृत्त संचालक, आयुका, पुणे) हे उपस्थित होते. या कार्यक्रमात 'सु.त्रिं. तासकर पुरस्कार', 'सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार', तीन 'विज्ञान संशोधन स्पर्धे'चे पुरस्कार (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचे) आणि 'उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक' यांचे वितरण झाले. तसेच परिषदेच्या तीन इ-पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. अजित केंभावी 'विश्वाची बाल्यावस्था जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीच्या नजरेतून' या विषयावर व्याख्यान दिले. या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने श्री संजय मा. क. उपस्थित होते

*मे २०२५*

• गुरुवार, १ मे २०२५ | संध्याकाळी ५.३०
स्थळ : सायन्स पार्क सभागृह
विज्ञान व्याख्यानमाला – पुष्प १२४
विषय : आहार हेच औषध
वक्ते : रो. आनंद कुलकर्णी
प्रवेश : विनामूल्य

• १६ मे २०२५ | संध्याकाळी ६.१५
स्थळः एस एम जोशी फाउंडेशन चर्चासत्र सभागृह पुणे 30
'आंतर राष्ट्रीय प्रकाशदिना'च्या निमित्ताने आयोजित व्याख्यान
विषय - ऑप्टीक्सचे भवितव्य काय?
वक्ता - डॉ. एकता घाटे M.phil, Ph.d, biophotonics
सहाय्यक प्राध्यापक - कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज
ऑप्टिक्स प्रकाशाच्या गुणधर्मांचा अभ्यास करते. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिनी ऑप्टिक्सच्या योगदानाचे सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व समजून घेऊ या. भविष्यात, ऑप्टिक्समुळे क्वांटम तंत्रज्ञान, दूरसंपर्क, वैद्यकीय क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्र इत्यादी क्षेत्रांमध्ये क्रांती घडेल, मानवी जीवन अधिक समृद्ध होईल. हे डॉ. एकता घाटे यांनी समजावून सांगितले

• १९ ते २४ मे २०२५ | संध्याकाळी ४.०० ते ६.००
स्थळ : भावार्थ, कोथरूड
कार्यक्रम : भावार्थ बालमेळाहसत खेळत विज्ञान (१३–१६ वयोगट) 
दररोजचे मार्गदर्शक :रोमांचक वैज्ञानिक प्रयोग, मजेदार खेळ, माहितीपूर्ण गप्पा-गोष्टी, शोधआणि संशोधकांच्या प्रेरणादायी कथांमध्ये रमण्यासाठी, विज्ञानाच्या दुनियेत डुबकी मारत उत्सुकता जागवण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी ही संधी  
सोमवार, दि. 19 मे 4 ते 6 - रुबी रमा प्रवीण
मंगळवार, दि. 20 मे 4 ते 5 - शिवराज कणसे 5 ते 6 - मृणालिनी वनारसे
बुधवार, दि. 21 मे 4 ते 5 - शिवराज कणसे 5 ते 6 - मृणालिनी वनारसे
गुरुवार, दि. 22 मे 4 ते 5 - रेखा जोशी 5 ते 6 - मृणालिनी वनारसे
शुक्रवार, दि. 23 मे 4 ते 6 - निलिमा सहस्रबुद्धे
शनिवार, दि. 24 मे 4 ते 6 - हर्षदा बाबरेकर
प्रवेशशुल्क : ₹१२०० (सभासद ₹११००)
नियोजन : संजय मा.क., अमोल झिरमिले, विवेक शिळीमकर
कार्यक्रम रद्द : अपु-या प्रतिसादामुळे

*जून २०२५*

• रविवार, १ जून २०२५ | संध्याकाळी ५.३०
स्थळ : सायन्स पार्क
विज्ञान व्याख्यानमाला – पुष्प १२५
विषय : जलसंधारण आणि शाश्वत विकास
वक्ते : पद्मश्री पोपटराव पवार
उद्घाटक : मा. शेखर सिंह (आयुक्त, पिं.चिं. महानगरपालिका)

• बुधवार, ४ जून २०२५ | संध्याकाळी ६.००
डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, मसाप, टिळक रस्ता
 : 
संयोजन : महाराष्ट्र साहित्य परिषद  पुणे + मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग + अ.भा.म.प्रकाशक संघऊ
प्रमुख उपस्थित : सुनिताराजे पवार, राजेंद्रकुमार सराफ, राजीव बर्वे

• शुक्रवार, २० जून २०२५ | संध्याकाळी ६.१५
स्थळ : एस एम जोशी फाउंडेशन
व्याख्यान 

विषय : शाश्वत जीवनशैली : आपली वैयक्तिक जबाबदारी

वक्ते : प्रा. डॉ. समीर शास्त्री
रासायनिक → पर्यावरणपूरक उत्पादने, नैसर्गिक शेती, सार्वजनिक वाहतूक, छोट्या बदलांतून मोठा परिणाम
शाश्वत जीवनशैली अनुकरणे हे अवघड नसले तरी चिकाटीचे काम आहे. कारण त्याकरता आपण सध्याची जीवनशैली आणि विचारसरणी बदलून पर्यावरण पूरक जीवनशैली व विचारसरणी अंगीकारणे आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनिक उत्पादना ऐवजी पर्यावरण पूरक उत्पादने वापरणे, नैसर्गिक शेती, सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शाश्वत जीवनशैली अंगीकारू शकतो. या सर्वाचा परामर्श या व्याख्यानात घेतला गेला.

• शनिवार, २१ जून २०२५ | संध्याकाळी ५.३०
स्थळ : भावार्थ, कोथरूड. 
व्याख्यान 
विषय : अयनदिन आणि हवामान बदल – पृथ्वीच्या लयीची गोष्ट
वक्ते : डॉ. विवेक शिळीमकर
अयनदिन आणि हवामान बदल – पृथ्वीच्या लयीची गोष्ट
पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि तिच्या २३.५ अंश झुकावामुळे आपल्याला दिवस-रात्र आणि ऋतू अनुभवता येतात.
२१ जूनचा ग्रीष्म अयनदिन हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वीच्या दीर्घकालीन हालचाली — झुकावातील बदल, कक्षेतील फरक, आणि अक्षाच्या फिरण्यामुळे — हजारो वर्षांतील हवामान बदल घडतात. ही नैसर्गिक चक्रेच आपल्याला हिमयुगं, उष्ण कालखंड आणि ऋतूंची लय देतात. हे समजून घेतल्यावर आपण पृथ्वीच्या लयीशी एकरूप होऊ शकतो.

*जुलै २०२५*

• मंगळवार, १ जुलै २०२५ | संध्याकाळी ५.३०
स्थळ : सायन्स पार्क
विज्ञान व्याख्यानमाला – पुष्प १२६
विषय : कहाणी गंगेची
वक्ते : डॉ. राधिका मुळे

• सोमवार, ७ जुलै २०२५
परिसंवाद 
कार्यक्रम : शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय - हिंदी सक्ती
मविप कार्यकर्ते उपस्थित
प्रमुख : डॉ. दीपक पवार, चिन्मयी सुमीत (मराठी शाळांची सदिच्छादूत)
भूमिका व मागण्या
डॉ. दीपक पवार
निमंत्रक, शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती चिन्मयी सुमीत
अभिनेत्री तथा मराठी शाळांच्या सदिच्छादूत
* मागण्या*
१. पहिली ते पाचवी स्तरावर कायमस्वरूपी तिसरी भाषा लागू न करण्याचा शासननिर्णय त्वरित जारी करावा.
२. पहिली ते पाचवी स्तरावर तिसरी भाषा लागू करण्याबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती तात्काळ बरखास्त करावी.
३. शिक्षणमंत्री श्री. दादा भुसे आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. राहुल रेखावार यांनी पहिली ते पाचवी स्तरावर तिसरी भाषा लागू करताना अपारदर्शक प्रक्रिया राबवली. श्री. रेखावार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची पुस्तके जशीच्या तशी राज्य मंडळाच्या शाळेत लावण्यासाठी बालभारती या स्वायत्त संस्थेवर दबाव आणला. या कारणांसाठी शासनाने दोघांचेही तातडीने राजीनामे घ्यावेत.
४. बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवून एनसीईआरटीची पुस्तके स्वीकारणे बंधनकारक करू नये.
५. १५ मार्च २०२४चा १८ हजार पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडणारा नवीन संचमान्यता निर्णय रद्द करावा.
६. सध्या इंग्रजी भाषा पहिलीपासून अनिवार्य आहे, त्यात बदल करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशीनुसार ती तिसरीपासून शिकवली जावी.
७. राज्याच्या मराठी भाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेला प्राधिकृत करून तिचे सक्षमीकरण करणे.
८. राज्यातील केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो किंवा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी व संबंधितांना त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी अर्धन्यायिक प्राधिकरण स्थापन करणे.
९. मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राबवणे, उदा. मोफत शिक्षण देणे, शासकीय नोकरीत प्राधान्य देणे, इ.
१०. वेगवेगळ्या व्यवहारक्षेत्रांत हिंदीच्या वाढत्या वापराबाबत एक समिती नेमून राज्यातील हिंदी-वापराची वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी.
११. राज्य शासनाच्या वतीने प्रसारमाध्यमांशी साधला जाणारा संवाद केवळ मराठी भाषेतूनच केला जावा. हिंदी भाषेतून त्याची पुनरावृत्ती करू नये.
१२. राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी राज्य शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत घेतली जाणारी हिंदी भाषेची सेवापात्रता परीक्षा यापुढे घेण्यात येऊ नये. केवळ मराठी भाषेचीच परीक्षा घेतली जावी.
१३. सार्वजनिक व्यवहारात हिंदीच्या अतिरिक्त व वाढत्या वापराविरोधात उपाययोजना करणे.

• शुक्रवार, १८ जुलै २०२५ | संध्याकाळी ६.१५

स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन चर्चासत्र सभागृह
व्याख्यान 
विषय : बागेतील तणांचा उपयोग कसा करावा?
वक्ते : डॉ. शिरीष आंबेगावकर
वैशिष्ट्य : तणांचे पर्यावरणीय आणि व्यावहारिक उपयोग स्पष्ट करणारे मार्गदर्शन.
डॉ. शिरीष आंबेगावकर यांनी सांगितले की तण सगळीकडे असतात. शेतात, बागेत. तण हा निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तण म्हणजे घातक, तापदायक अशी समजूत आहे पण सर्वच तण हानिकारक नसतात. काही तण निसर्ग पूरक असतात, काही तण औषधींमध्ये वापरले जातात, तर काही पौष्टिक खाद्य ही असतात. डॉ. शिरीष आंबेगावकर पक्षीशास्त्र तसेच कीटकशास्त्र आणि एथनो वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासक आहेत. फुलपाखरे, रस्त्याकडेच्या वनस्पती, गवत झुडुपांमधील प्राणी जीवन्, बागेतील तण आणि त्यांचे उपयोग या विषयाच्या त्या जाणकार आहेत.

• शनिवार, १९ जुलै २०२५
डॉ. जयंत नारळीकर जन्मदिनानिमित्त
विशेष कार्यक्रम दुपारी ४.०० |
स्थळ : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क
विषय : नारळीकर सरांसोबतच्या माझ्या बहुमोल आठवणी
वक्ते : श्रीमती कल्याणी गाडगीळ (नारळीकर यांच्या दीर्घकाळ सहाय्यक)
उपस्थिती : ~४० प्रेक्षक वैशिष्ट्य : नारळीकरांच्या साध्या जीवनशैली, समानतावादी वृत्ती आणि मजेशीर आठवणी (उदा. कावळ्याचे व्यत्यय, व्यंगचित्र स्पर्धा).

• शनिवार, १९ जुलै २०२५
संध्याकाळी ५.३० |
वैज्ञानिक कथाकथन
वक्ते : श्री. प्रसन्न करंदीकर
वैशिष्ट्य : विज्ञान कथांचे रसाळ सादरीकरण.

• शनिवार, १९ जुलै २०२५ –
राष्ट्रीय मराठी विज्ञान कथा दिन - ११ ठिकाणी कार्यक्रम :
- सरहद पब्लिक स्कूल, कात्रज : डॉ. सुनीता बागवडे यांचे कथाकथन (~२५० विद्यार्थी).
- सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी : डॉ. विद्याधर बोरकर यांचे “आई मला गृहपाठात मदत करशील का?” कथाकथन.
- महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर : श्री. विनय सरांचे ज्ञानेंद्रियांवर व्याख्यान; योगासने सादरीकरण.
- एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, धायरी : श्री. अमोल झिरमिले यांचे “ग्यानबाचे विज्ञान” कथाकथन; विद्यार्थ्यांचे सादरीकरण.
- भावार्थ, कोथरूड : प्रसन्न करंदीकर यांचे “चंदन” (वैज्ञानिक भयकथा) वाचन; चर्चा (~५० श्रोते).
- इतर ठिकाणे : प्रसन्न करंदीकर यांचे कथाकथन - न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग), सिल्वर ब्रेस्ट स्कूल, मॉडर्न महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय.

• १९-२० जुलै २०२५ | सोलापूर
कार्यक्रम : शनिवारी विज्ञानवारी कार्यशाळा
सहभाग : पुणे विभागाचे १२ महाविद्यालयीन विद्यार्थी प्रशिक्षण शिबिरात सहभागी.

• रविवार, २० जुलै २०२५ |
सकाळी ७.०० पासून
पावसाळी कार्यक्रम 
स्थळ : इव्हो ग्रीन सिटी, गाथाग्राम, देहू
कार्यक्रम : वर्षा सहल आणि वृक्ष लागवड
संयोजन : रोटरी प्रांत ३१३१ पर्यावरण विभाग + मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग व अन्य संस्था संघटना 
विशेष :
प्रांतपाल रोटेरिअन संतोष मराठे यांच्यासोबत वृक्षारोपण
छायाचित्र स्पर्धा.
श्री शिवाजीराव मोरे (हरित वारी) यांची भेट
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्याशी संवाद.
गाथा वॉल्डॉर्फ – मुलांसाठी खेळ
नोंदणी शुल्क : ₹१०० | वाहन : स्वतःची

*ऑगस्ट २०२५*


• शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ | संध्याकाळी ६.००
स्थळ : सायन्स पार्क सभागृह
विज्ञान व्याख्यानमाला – पुष्प १२७
विषय : नदी – ज्ञान विज्ञान
वक्ते : डॉ. विश्वास येवले
प्रवेश : विनामूल्य

• शनिवार, २ ऑगस्ट २०२५ | सकाळी ८.०० ते ९.३०
कार्यक्रम : विज्ञान प्रयोग कार्यशाळा (शनिवारी विज्ञानवारी)
स्थळ : सरहद स्कूल, कात्रज
सहभागी : ६वीचे २४० विद्यार्थी; PICT चे १२ स्वयंसेवक
प्रयोग : पृष्ठीय ताण, गुरूत्वीय मध्य, हवा, घनता
प्रतिक्रिया : विद्यार्थ्यांना प्रयोग हाताळण्याची पहिली संधी; शिक्षकांचे कौतुक.


• शनिवार, २ ऑगस्ट २०२५ | 
कार्यक्रम - वैज्ञानिक चित्रपट
स्थळ - 
उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग यांना धन्यवाद. अशोक आणि एकनाथ तुमची दोघांची मेहनत कौतुका पलीकडची आहे
तीनही फिल्म, मुलांना आवडल्या. विशेषतः फिल्म कशी पाहावी हे सुहास किरलोस्कर सरांनी खूप छान समजावून सांगितले. यातून मुलांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागावा हीं अपेक्षा. पुढे त्यांना पक्षी निरीक्षणास घेऊन जाऊ
घड्याळा ची फिल्म भाव पूर्ण व सामाजिक मूल्यांची जपवणूक शिकविणारी होती. मुलांना खूप भावली 

• शनिवार, ७ ऑगस्ट २०२५ | 
कार्यक्रम - युवकांशी विज्ञान संवाद 
स्थळ - विद्यार्थी साहाय्यक समिती वसतिगृह, पुणे १६
उपस्थिती -  २५ युवक युवती 
संवादक - संजय मालती कमलाकर 

• शनिवार, ७ ऑगस्ट २०२५ | 
कार्यक्रम - युवकांशी विज्ञान संवाद 
स्थळ - पी आय सी टी,  पुणे ४२
उपस्थिती - २५ युवक युवती 
संवादक - डॉ. विवेक शिळीमकर 

आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा २०२५
विषय : एक नवे व्यसन – बालकांपासून थोरांपर्यंत
कार्यशाळा : १२ ऑगस्ट (पुसाळकर हॉल)


सॉफ्ट कॉपी मुदत : १९ ऑगस्ट
प्रदर्शन फेरी : २०-२६ ऑगस्ट
अहवाल मुदत : २९ ऑगस्ट
अंतिम फेरी : १ सप्टेंबर (पिंपरी चिंचवड सायन्स पार्क) सहभागी संघ : १० शाळा/महाविद्यालये (न्यू इंग्लिश स्कूल, हुजूरपागा इत्यादी).



* शनिवार, १३ ऑगस्ट २०२५ | 
कार्यक्रम - युवकांशी विज्ञान संवाद 
स्थळ - फर्ग्युसन कॉलेज, पुणे 
उपस्थिती - ३५ युवक युवती 
संवादक - अशोक तातुगडे आणि एकनाथ फाटक
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि विभागाचे विविध कार्यक्रम याविषयी सांगितले. मुख्यत्वे करून १) शनिवारी विज्ञानवारी, २) वैज्ञानिक जाणीव विकास - आकलन, ३) मोबाईल चे व्यसन आणि व्यसनमुक्ती याविषयी चर्चा झाली. आपले कार्यक्रम २३ ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. तरुणांना मराठी विज्ञान परिषदेशी जोडण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तीन-चार महाविद्यालयात असे उपक्रम होतील. भावे हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक वसावे सर, मार्गसिद्धा मॅडम आणि विज्ञान शिक्षक शिक्षिकांसोबत चर्चा झाली.


• मंगळवार १९ ऑगस्ट २०२५
कार्यशाळा
विषय - पर्यावरणस्नेही टेराकोटाच्या गणेशमूर्ती बनविणे
स्थळ -  सौ विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, पुणे ४
यात ३० मुलामुलींनी भाग घेतला. 

कार्यक्रमांची सुरवात मराठी विज्ञान परिषदेचे श्री अशोक तातूगडे यांच्या मूर्तिककलेतील विज्ञान या भाषणाने झाली. अशोक सर म्हणाले, की आजच्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे दोन प्रमुख उद्देश आहेत. १) शिल्पकलेचे शास्त्र म्हणजेच शिल्पकला शिकणे, आणि 
२) पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती करून गणेश विसर्जनाच्या वेळी नद्यामध्ये होणारे प्रदूषण टाळणे.
शिल्पकलेमुळे विज्ञान शिकण्यासाठी आपल्या अंगी अनेक कौशल्य येतात. निरीक्षण, मोजमाप करण्याचे कौशल्य, कल्पनाशक्ती, एकाग्रता, हस्तकला आणि चित्रकला या सर्व कौशल्यांचा आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी चांगला उपयोग होतो.
श्री दिलीप ठकार यांनी उपस्थिताना गणपती बनवून दाखविले व बनविताना छोट्या छोट्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कृतीचा लक्ष्पूर्वक अभ्यास केला व गणपती साकारण्यास सुरवात केली. श्री व सौ ठकार दाम्पत्या बरोबर सर्वश्री एकनाथ पाठक अशोक तातूगडे, श्रीरंग गोखले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सामील झाले.
सहयोग - विज्ञान भारती व श्री विलास रबडे यांच्या सृजन मित्र - कौशल्य विकास - संकल्पने अंतर्गत ही कार्यशाळा संपन्न झाली. 


• शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ | सकाळी: 10 ते 12
शनिवारी विज्ञानवारी 2025_26 अंतर्गत सत्र 1 
विषय: शनिवारी विज्ञानवारी उद्घाटन कार्यक्रम 
ठिकाण: भावे हायस्कूल ( मुलांची शाळा) पुणे 
शिवाजी नगर जंगली महाराज रोड 
उपस्थिती : ७०
२३ ऑगस्ट २०२५ म. ए. सो. मुलांचे माध्यमिक विद्यालय, पेरूगेट भावेस्कूल मध्ये शनिवारी विज्ञानवारीचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. 
तेथे अशोक तातुगडे ,विनय र. र. युवा विद्यान प्रसारक - हंसीनी राहाटे, स्नेहल अंबेकर, श्रुती लोखंडे, सृष्टी डोईजड, पवन बोलसुरे, श्रवण खंदारे
उपस्थित होते. मार्गसिद्धा पवार बाई आणि मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांच्याबरोबर चर्चा झाली. राऊत मॅडमनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सागर मित्रचे श्री विनोद बोधनकर सर यांनी त्यांच्या संस्थेची माहिती दिली. 

• शनिवार, २३ ऑगस्ट २०२५
शनिवारी विज्ञानवारी 
स्थळ - म. ए. सो. मुलांचे माध्यमिक विद्यालय, पेरूगेट, भावे स्कूलमध्ये 
पहिले विज्ञानवारीचे  सत्र झाले.४५-५० मुले व वर्गशिक्षिका हजर होत्या. हंसिनी रहाटे, श्रुती आणि स्वाती यांनी अगदी सराईतपणे प्रयोग सादर केले. त्यांचे हे पहिलेच सादरीकरण आहे असे अजिबात वाटले नाही. मुलांनी आणि शिक्षकांनी ही सत्रे चांगली झाली असे सांगितले.
फर्ग्युसन चे सहा विद्यार्थीही आपल्या प्रकल्पात सामील झाले
आहेत त्यातले आज ३ हजर होते.


* शनिवार, ३० ऑगस्ट २०२५ | 
शनिवारी विज्ञानवारी उपक्रमातील प्रयोग सत्रे सुरू.
स्थळ : सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना, पुणे ४








*सप्टेंबर २०२५*

• सोमवार, १ सप्टेंबर २०२५ | दुपारी ४.०० : 
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा अंतिम फेरी
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा 2025
एक नवे व्यसन - बालकांपासून थोरांपर्यंत! 
स्थळ :  पिंपरी चिंचवड सायन्स पार्क 
अंतिम फेरी सहभागी संघ
* न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी, नाशिक
* हुजूरपागा इंग्रजी माध्यम शाळा मांगडेवाडी
* अक्षर नंदन माध्यमिक शाळा, शिवाजी हौसिंग सोसायटी 
* हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा
* दादा महाराज नाटेकर गुरूकुल, चिखली
* शिक्षण रंजन केंद्र , हडपसर
* शिक्षण रंजन केंद्र, शिवाजीनगर .
* डॉ . डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि रात्र महाविद्यालय, पिंपरी
* सौ. सुंदरा देवी हायस्कूल, पर्वती पायथा
* विक्रमगड ज्युनिअर कॉलेज व हायस्कूल, पालघर
* विद्यार्थी सहायक समिती न्यू गर्ल्स होस्टेल
परीक्षक - डॉ. विद्याधर बोरकर, श्री. बाळकृष्ण माडगुळकर, श्री. नंदकिशोर कासार.


• सोमवार, १ सप्टेंबर २०२५ | संध्याकाळी ५.३० 
विज्ञान व्याख्यानमाला – पुष्प १२८
व्याख्यान –“मोबाईल व्यसनमुक्ती”
वक्ते : श्री. तुषार रंजनकर

• १०-११ सप्टेंबर २०२५
कार्यक्रम : विज्ञान एकांकिका स्पर्धा (पहिली फेरी)
स्थळ : सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ

• शनिवार, १२ सप्टेंबर २०२५
कार्यक्रम : शनिवारी विज्ञानवारी सत्र ३
विषय : पृष्ठीय ताणाची किमया
स्थळ : सौ. विमला ताई गरवारे प्रशाला प्रसारक : ६ युवा (पवन मांडगे इत्यादी) उपस्थिती : ४०

• शनिवार, १३ सप्टेंबर २०२५
कार्यक्रम : शनिवारी विज्ञानवारी सत्र ३
विषय : घनता
स्थळ : भावे हायस्कूल (मुलांची शाळा) प्रसारक : हंसीनी राहाटे उपस्थिती : २४

• रविवार, १४ सप्टेंबर २०२५ | सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.००
कार्यक्रम : वैज्ञानिक जाणिवा विकास शिबिर
आयोजक : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि विद्यार्थी सहाय्यक समिती
सहभागी : ~६० विद्यार्थी
सत्र : वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, मोबाईल व्यसन, पोस्टर प्रदर्शन
मान्यवर : विनय र.र., शशी भाटे, प्रा. केदार, दिगंबर कट्यारे, तुषार रंजनकर, अशोक तातुगडे,


• शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 | संध्याकाळी 6.15
स्थळ - एस. एम. जोशी फाउंडेशन चर्चासत्र सभागृह 
चर्चा-संवाद
मानसिक आजार हा समाजात अजूनही गैरसमज आणि कलंकाचा विषय आहे. याविषयी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे कारण दडपण्याने व्यक्तीच्या जीवनावर गंभीर परिणाम होतात, आत्मविश्वास कमी होतो आणि उपचार मिळण्यास विलंब होतो. युवकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे महत्त्वाचे आहे, कारण हे वय भावनिक आणि मानसिक बदलांचे असते. चर्चासत्राद्वारे त्यांना मानसिक आजार स्वीकारणे, मदत घेणे आणि एकमेकांना समजून घेण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल आणि समाजात सकारात्मक बदल घडेल.
विषय - मानसिक आजार दडवा कशाला?
मांडणी - श्री. समीर शिपुरकर


6) शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 - 4 अश्विन शके 1947, 
संध्याकाळी 6
विशेष व्याख्यान 
नवसंशोधन आणि सर्जनशीलता हे आधुनिक युगाचे आधारस्तंभ आहेत. त्यांमधून नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि नव्या उपायांना जन्म मिळतो. सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीला चालना मिळते. युवकांमध्ये सर्जनशीलता वाढवल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. नवसंशोधनामुळे रोजगार, पर्यावरण संरक्षण आणि जीवनमान सुधारते. युवकांना प्रेरणा मिळेल, ज्यामुळे ते समाजात सकारात्मक बदल घडवतील यासाठी हे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
विषय - अभिनवता आणि नवसृजन
(Innovations and creativity)
वक्ता - पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र उर्फ जे. बी. जोशी, अध्यक्ष‌, मराठी विज्ञान परिषद. प्रख्यात भारतीय रासायनिक अभियंता, अणुशास्त्रज्ञ, सल्लागार आणि प्राध्यापक. 
स्थळ - विद्यार्थी सहायक समिती, शिवाजी हौसिंग सोसायटीच्या मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे 16


• गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ | दुपारी २.३०
स्थळ भेट:
Centre For Science Education and Communication
विज्ञान शिक्षण संप्रेषण केंद्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

• शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ | संध्याकाळी ६.१५
कार्यक्रम : चर्चा-संवाद
विषय: मानसिक आजार दडवा कशाला?
मांडणी : श्री. समीर शिपुरकर
स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन

• शनिवार, २० सप्टेंबर २०२५
कार्यक्रम : विज्ञानवारी सत्र २
विषय : घरगुती नैसर्गिक निर्देशक
स्थळ : यशोधन विद्यालय, देगाव प्रसारक : साक्षी शिंदे, वैष्णवी शिंदे उपस्थिती : ३५

• शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ | संध्याकाळी ६.००
स्थळ : विद्यार्थी सहाय्यक समिती
विशेष व्याख्यान 
विषय: जागतिक तापमानवाढ - अभिनवता आणि नवसृजन
वक्ते : पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी
मुख्य मुद्दे : भाभा कवच, अणुऊर्जा रिॲक्टर्स, हवामान बदल, तक्रार न करता प्रगती.

हे उपक्रम विज्ञानाच्या प्रसारात मोलाचे योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता वाढली. पुढील उपक्रमांसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.


*ऑक्टोबर २०२५*

• मंगळवार, 1 ऑक्टोबर 2025 - 9 अश्विन शके 1947, 
संध्याकाळी 5.30
स्थळ - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क 
विज्ञान व्याख्यानमाला पुष्प १२९
प्रात्यक्षिकासह अनुभव कथन - 
शालेय उपक्रम - कापूस पिकविणे ते कापड विणणे
आबासाहेब अत्रे प्रश्नाला, सोमवार पेठ, पुणे चे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि डॉ. रुबी रमा प्रवीण 

* शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 5 ते 7
युवकांसाठी ऑनलाईन चर्चा संवाद
स्थळ :  इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट
विषय - विज्ञान प्रसाराचे विविध मार्ग
संवादक - विनय र र
विनय र. र.  मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे सभासद आहेत. ते विज्ञान लेखक आणि प्रसारक म्हणून वैज्ञानिक संकल्पना साध्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवतात. ते विज्ञान कथा, व्याख्याने, आणि प्रात्यक्षिकांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर देतात. मापनांचा इतिहास (उदा. किलोग्राम) आणि विज्ञानातील पारिभाषिक संज्ञा सहज समजतील अशा प्रकारे मांडणे हे त्यांच्या प्रसाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 
विनय र. र. यांच्यादृष्टीने विज्ञान प्रसाराचे विविध मार्ग:‌ १) विज्ञान कथा/कादंबरी: विज्ञानातील कठीण संकल्पना रंजक गोष्टींच्या माध्यमातून मांडणे. २) व्याख्याने आणि चर्चासत्रे: वैज्ञानिक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि शंका निरसन.
प्रात्यक्षिके (Demonstrations): प्रयोग करून दाखवून विज्ञानाचे नियम स्पष्ट करणे.
साधी मराठी भाषा: वैज्ञानिक संज्ञांमधील गुंतागुंत दूर करून स्थानिक भाषेतून विज्ञान पोहोचवणे.
मराठी विज्ञान परिषद उपक्रम: विज्ञान विषयांची आवड निर्माण करण्यासाठी स्पर्धा, शिबिरे आयोजित करणे. 
Blogger.com
Blogger.com
 +4
त्यांच्या मते, केवळ माहिती देणे नसून वैज्ञानिक दृष्टिकोन (Scientific Temper) तयार करणे हे विज्ञान प्रसाराचे मुख्य उद्दिष्ट आहे.

• शुक्रवार 17 ऑक्टोबर 25, (25 आश्विन 1947) संध्या. 6.15
डॉ. वा. द. वर्तक जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान
स्थळः एस एम जोशी फाउंडेशन चर्चासत्र सभागृह, नवी पेठ, पुणे 30
व्याख्यान
सडे: महाराष्ट्राचा जैव वारसा
वक्ता - डॉ. अपर्णा वाटवे
सडे म्हणजे जांभा दगडाचे पठार, पश्चिम किनारपट्टी या क्षेत्रांमधील सपाट खडकाळ प्रदेश. त्यांच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे ते ओळखले जातात. या ठिकाणी विविध परिसंस्था, वनस्पती आणि प्राणी यांच्या समृद्ध जैवविविधतेचा ठेवा आहे. महाराष्ट्राच्या या जैव वारशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. या वारशाबद्दल माहिती , छायाचित्रे दाखवत समजून देण्यात आली. पश्चिम किनारपट्टीवर केरळपर्यंत, तसंच महाबळेश्वर, बेळगाव इ. सह्याद्रीच्या माथ्यावर मोठाले सडे आहेत. मराठवाड्याच्या दक्षिण भागात जत, बिदर इ. भागांत असेच फार प्राचीन सडे पाहायला मिळतात. ओडिशामध्येही खूप विस्तृत असे सडे आहेत. 
मात्र, पश्चिम घाट, कोकण आणि मलबार किनारपट्टीवरचे सडे हे जैवविविधतेच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत आहेत

• १८ ऑक्टोबर २०२५ . सकाळी ८.३० वा.

जैवविविधता उद्यान (Biodiversity Heritage Site) पुणे संवाद यांनी योजलेली जैवविविधता उद्यान, गणेश खिंड,ची सफर.
अंदाजे 20- 22 लोकांची उपस्थिती. अमित सिंग यांनी चांगली माहिती दिली.


*नोव्हेंबर २०२५*

• ०१ नोव्हेंबर २०१५ |
कार्यकर्ता सभा
स्थळ - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क 

नरेंद्र दाभोळकर जयंती निमित्त मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग , आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यांनी विज्ञान प्रसाराचे कार्य ग्रामीण भागात एकमेकांच्या सहकार्याने करण्याचे ठरविले.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये अंनिस चे कांहीं स्थानिक पिंपरी-चिंचवडचे कार्यकर्ते आणि दोन राज्य कार्यकारणीत असणारे कार्यकर्ते यांच्यासह मीटिंग झाली. मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, चे अशोक तातुगडे व एकनाथ पाठक हजर होते. उत्तम जोगदंड, विकास सूर्यवंशी, ज्ञानेश, मनीषा महाजन हे अंनिसचे कार्यकर्ते आणि अंगद शिंदे हे शिक्षक संघटनेसाठी काम करणारे, हजर होते. मराठी विज्ञान परिषदेबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे विज्ञान प्रसाराच्या संबंधित सहभागाने काम करण्याचे ठरले. त्याचा पहिला टप्पा म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या मध्ये या कामाची सुरुवात करावी असे ठरले. त्याविषयी चर्चा होऊन काही मुद्दे प्रत्यक्ष कृतीसाठी ठरविण्यात आले.
१) सर्व तालुक्यांच्या ठिकाणी अंनिस आणि मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते/ व्यक्ती/ हितचिंतक संपर्कात असतील त्यांची तालुका निहाय यादी करणे.
२) ज्या तालुक्यांमध्ये जास्त कार्यकर्ते आणि हितचिंतक असतील त्या तालुक्यापासून विज्ञान प्रसाराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.
३) प्रत्यक्ष कामाची सुरुवात मराठी विज्ञान परिषदेच्या कांहीं कार्यक्रमापासून करता येईल. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे अंतर्भूत असेलच.
४) विज्ञान प्रसाराचे असे सहभागाने कार्य करणे हे दोन्ही संस्थांच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये सामील आहे.
५) प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मीटिंग घेऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे या कामाचे पुढील महिन्याचे नियोजन करता येईल.

• शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ | संध्याकाळी ६.१५ वाजता
स्थळ - एस. एम. जोशी फाउंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे ३०  
व्याख्यान 
 विषय - “उत्क्रांती आणि आपली जैवविविधता”
 वक्ते : डॉ. शंतनु ओझरकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मानवशास्त्र विभाग  
आपल्या उत्पत्ती बाबत मानवजातीला कायमच कुतूहल वाटत आले आहे. मानव प्राण्याची उत्पत्ती कशी झाली, आपले दुसऱ्या प्राण्यांबरोबर काय नाते आहे, 'मानव' म्हणजे नक्की काय, वेगवेगळ्या मानवी समुदाय यांचे एकमेकांशी काय नाते आहे अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे हा मानवशास्त्रीय अभ्यासाचा गाभा असतो. आधुनिक मानवशास्त्र जीवाश्म, दगडी हत्यारे आणि आज पृथ्वीवर वावरणाऱ्या आपल्यासारख्या मानवांचा डी एन ए या तीन पुराव्यांची सांगड घालून मानवी उत्क्रांतीच्या क्रमाची मांडणी करत असतं.  माणूस दोन पायांवर केव्हा चालायला लागला ? आपले पूर्वज कोण होते, कसे दिसत होते? आजचे वेगवेगळ्या भूखंडातली माणसं रंगरूपाने वेगळी का आहेत? आणि या अभ्यासाचा आपल्याला उपयोग का या विषयावर माहिती आणि चर्चा चांगली रंगली 
डॉ. शंतनु ओझरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, मानवशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहेत. जीवशास्त्रीय मानवशास्त्राचे संशोधन व अध्यापन करतात. त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी जमातींमधील mtDNA चा अभ्यास केला आहे. भारतातील मानवी विविधतेमागील जनुकीय आणि उत्क्रांती-अनुकुलन इ. कारणे यांचेही संशोधन ते करतात
https://youtu.be/5Y11Ny8mwzc?si=PI5KLwyn-Xjeo8a7 या यूट्यूब लिंक वर पूर्ण भाषण पहाता येईल 

• शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ | दुपारी ४
कार्यशाळा - प्रयोगातून विज्ञान 
स्थळ -  विद्यार्थी सहायक समिती वसतीगृह, पुणे १६
विद्यार्थी साहाय्यक समिती मधील - कमवा आणि शिका योजने अंतर्गत सहभागी झालेल्या १८ विद्यार्थ्यांना मुलांसोबत सहज करता येण्याजोगे दहा - विज्ञान गणित - विषयक प्रयोग याबद्दल कार्यशाळा.. मार्गदर्शन - विनय र. र. या उपक्रमाची आर्थिक जबाबदारी विद्यार्थी साहाय्यक समिती कमवा आणि शिका योजना आणि मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग संयुक्तपणे समसमान उचलतील असे ठरले. प्रत्येक सहभागीने एका शाळेत सर्वांच्या सवडीने दिवसात दोन तास वापरून दहा प्रयोग अगर वैज्ञानिक खेळ घ्यावे.  उपक्रम पूर्ण झाल्यानंतर या योजनेनुसार प्रत्येक सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मार्गदर्शकांस दोन हजार रुपये मानधन देण्यात येईल. या उपक्रमासाठी शशी ताई भाटे प्रमुख काम बघतील. असे ठरले.

*डिसेंबर २०२५*


• शनिवार, ६ डिसेंबर २०२५ | सकाळी १०.३०
व्याख्यान 
विषय - वाचनाचे विज्ञान
वक्ता - नवनाथ तुपे सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
आयोजक - एकनाथ पाठक.

• सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२६
 संशोधनाकडे वळा व्याख्याने 

वक्ता - अंकिता कान्हेरे
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने आठवी ते बारावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी संशोधनाकडे वळा या विषयावर युवा संशोधक  
अंकिता कान्हेरे यांची प्रेरक व्याख्याने आयोजित करण्यात आली. 
त्या कॅन्सरवरील औषध निर्मितीत संशोधन करतात. 
  

• बुधवार - गुरुवार - १६ व १७ डिसेंबर २०२६
विशेष सत्रांचे वेगवेगळ्या शाळांमध्ये आयोजन
स्थळ -जुन्नर 
विज्ञान प्रसाराचे कार्य ग्रामीण पातळीवर जास्त व्यापक स्वरूपात नेण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती, मराठी विज्ञान परिषद आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांनी १६-१७ डिसेंबरला, जुन्नर मध्ये केले होते. अण्णासाहेब आवटे हायस्कूल, काॅर्नेल मेमोरियल स्कूल, मुंडे हायस्कूल इत्यादी शाळांमध्ये मुख्याध्यापिका संगीता बारवे - आवटे हायस्कूल, मुख्याध्यापक शत्रुघ्न लबडे  - कॉर्नेल मेमोरियल स्कूल,तसेच देवराम पोटकुले मुख्याध्यापक मुंडे हायस्कूल यांच्या उपस्थितीत विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने विविध सत्रे घेण्यात आली. 
या सत्रांमधून विज्ञान, विज्ञानाची भारतातील प्रगती, वैज्ञानिक दृष्टिकोन, विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आणि त्यांचे निराकरण, अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व, चमत्कारा मागील विज्ञान इत्यादी विषयांवर अशोक तातुगडे आणि शाहीर शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिंदे यांनी विज्ञानाचे पोवाडे गायले.
आवटे हायस्कूलचे विज्ञान शिक्षक आणि विज्ञान-अध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण ताजणे यांचा आवटे हायस्कूल मधला कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये मोठा वाटा आहे.
काॅर्नेल प्रायमरी स्कूल आणि आवटे हायस्कूल या शाळांमध्ये विज्ञान मंडळे स्थापन करण्यात आली. जुन्नर मधील इतर शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे.
• शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५, २८ अग्रहायण शके १९४७ | संध्याकाळी ठीक ६.१५ वाजता
व्याख्यान 
स्थळ - एस. एम. जोशी चर्चा सभागृह, नवी पेठ, पुणे ४११०३०
विषयः सोनम वांगचुक यांची शाळा SECMOL
वक्तेः संतोष ललवाणी
शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसावे, तर ते जीवनाच्या प्रत्यक्ष आव्हानांना तोंड देण्याचे साधन असावे! लडाखच्या थंडीच्या थरारात, सूर्याच्या ऊर्जेवर चालणाऱ्या एका अद्भुत शाळेची कहाणी ऐकवली. ही शाळा म्हणजे SECMOL (Students' Educational and Cultural Movement of Ladakh) - १९८८ मध्ये अभियंता, पर्यावरणतज्ज्ञ आणि शिक्षणसुधारक सोनम वांगचुक यांनी स्थापन केलेली शाळा



*जानेवारी २०२६*

गुरूवार, १ जानेवारी २०२६
लेख प्रसिद्ध 
वैज्ञानिक जाणिवा विकास या विषयावर मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल आणि म ए सो मुलांचे माध्यमिक विद्यालय, पेरूगेट भावेस्कूल येथे करत असलेल्या संशोधनात्मक कार्या विषयी अशोक तातुगडे यांचा महाराष्ट्र शिक्षण या डिजिटल त्रैमासिकात लेख प्रसिद्ध झाला आहे.



• शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ | संध्याकाळी ६.१५
स्थळ - एस एम जोशी फाउंडेशन चर्चा सभागृह 
व्याख्यान
 विषय - औषधे एवढी महाग का?
वक्ता- डॉ. अंनत फडके
औषधे एवढी महाग असण्याची कारणे थोडक्यात या व्याख्यानात मांडली गेली. मूळ म्हणजे जेनेरिक नावाने (उदा. पॅरासिटॅमॉल) औषधे विकली जाण्याऐवजी निरनिराळ्या औषध कंपन्या ब्रँड नावांनी (उदा- क्रोसिन, कॅलपॉल, क्रोसिन इ.) ती विकतात. एक औषध चांगले, परिणामकारक असतांना औषध-कंपन्या अनेकदा गरज नसताना त्यात एक, दोन औषधे मिसळून बनवलेले मिश्रण विकतात. या औषध-मिश्रणाची किंमत अर्थात जास्त असते. औषधे जीवनावश्यक असूनही सरकारचे त्यांच्या किंमतीवर नियंत्रण नसते.


• मंगळवार, २० जानेवारी २०२६ (आपापल्या शाळेत)
प्रजासत्ताक दिनानिमित्त 
- लोकशाही मूल्ये गणित परीक्षा
शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांना केलेले आवाहन - २६ जानेवारी हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा उत्सव आहे! या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही लोकशाही उत्सव समिती, भोर आणि मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांच्या वतीने एक अनोखी आणि अर्थपूर्ण गणित स्पर्धा आयोजित करत आहोत. ही स्पर्धा केवळ गणिताची नाही, तर लोकशाहीची जीवनशैली शिकवणारी आहे. आजच्या माहिती युगात आपण डेटा, आकडेमोड आणि विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्या समाजातील समस्या ओळखू शकतो आणि त्यावर उपाय शोधू शकतो. पण त्यासाठी लोकशाही मूल्यांची खरी जाणीव असणे गरजेचे आहे.
या स्पर्धेत समाविष्ट असतील अशी लोकशाही मूल्ये - समानता, विचार, अभिव्यक्ती आणि कृतीचे स्वातंत्र्य , निष्पक्षता आणि सामाजिक न्याय, बंधुता, समाजातील एकता आणि सहकार्य, सहकार, सहानुभूती,
सामाजिक जबाबदारी, मतदान, स्वच्छता, कायद्याचे पालन,
संसाधनांचा जबाबदार वापर, पाणी, ऊर्जा, खते यांचा काटकसरीने वापर, समुदाय सहभाग – वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, सामुदायिक काम
पर्यावरण जागरूकता व संरक्षण, प्रदूषण कमी करणे, रीसायकलिंग, झाडे लावणे कारण पर्यावरण हा आपला सामायिक वारसा आहे!

स्पर्धेची वैशिष्ट्ये - स्पर्धकांनी लोकशाही मूल्यांवर आधारित गणिती उदाहरणे सोडवली. उत्तरे काढल्यानंतर त्या उदाहरणातून कोणते लोकशाही मूल्य कसे दिसते हे आपल्या शब्दात लिहीले.

परीक्षा: मंगळवार, २० जानेवारी २०२६ (भोर तालुक्यातील सहा गावांमध्ये परिक्षा झाली. २४ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर झाले. २६ जानेवारी २०२६ रोजी झेंडावंदन कार्यक्रमचे वेळी प्रशस्तिपत्रे वितरीत करण्यात आली. प्रवेश शुल्क नव्हते. संकल्पना  - विनय र. र., संयोजन - धनंजय कोठावळे. सहकार्य - लोकशाही उत्सव समिती भोर 


• सोमवार, २६ जानेवारी २०२६
स्पर्धा
विज्ञान रंजन स्पर्धा २०२६ - प्रश्नावली प्रकाशित 
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग दर वर्षी विज्ञान दिनानिमित्त - विज्ञान रंजन स्पर्धा आयोजित करते. विज्ञान रंजन स्पर्धा सर्वांसाठी खुली असते. कोणत्याही वयाच्या व्यक्ती, कोणत्याही शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
विज्ञान रंजन स्पर्धा 2026 प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे शोधून, लिहून पाठवायची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2026.
या प्रश्नांची उत्तरे शोधताना - आपल्या विज्ञान दृष्टीची तपासणी करण्याची संधी मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोन समजण्याचा अवसर मिळतो. मराठी भाषा आणि मराठी भाषिक विकसित होण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
काही नमुना प्रश्न पहा - 
* २० रुपयांच्या नाण्याला किती कोन आहेत?
* विना सावलीचा दिवा कोठे वापरतात?
* पिठीसाखर, साखर, साखऱ्या ...या मालिकेत चौथे कोण?
* मी एक समुद्र आहे, माझी कोणतीही लाट जमिनीला लागत नाही?
* तव्यावर भाजली की रोटी फुगते पण तंदुरी रोटी का फुगत नाही?
याशिवाय काही प्रयोग घरातली साधने वापरून करायचे, काही गणिते, कारणे, निबंध सुद्धा. मराठी प्रश्नावली चे भाषांतर इंग्रजी आणि हिंदी मध्येही ब्लॉग वर उपलब्ध केले. सर्व ३७७ सहभागींच्या उत्तर पत्रिका तपासून उत्कृष्ट ६२ सहभागींना अंतिम प्रयोग फेरीत पारितोषिके दिली.


विज्ञान रंजन स्पर्धा 2026 प्रश्नावली, उत्तरे आणि तपशीलवार माहिती साठी पहा - 
https://mavipapunevibhag.blogspot.com/2025/12/2026.html

*फेब्रुवारी २०२६*

 
1. 01 फेब्रुवारी 2026 - दुपारी 4
शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित कार्यशाळा
मार्गदर्शक - लक्ष्मण गोगावले, ठिकाण - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क. श्री.‌ गोगावले यांनी खालील प्रकारचे प्रयोग करून दाखवले: अतिशय वेगवान आकडेमोड – मोठ्या संख्यांचा गुणाकार, भागाकार, वर्गमूळ इत्यादी क्षणार्धात करून दाखवले. वैदिक गणितातील सोप्या पद्धती – उदा. दोन संख्यांचा गुणाकार करण्याच्या युक्त्या. गणितातील मजेदार कोडी आणि जादू – जसे की विशिष्ट नियम वि सूत्र वापरून अचूक उत्तर कसे काढता येते हे शिकवले. 50 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

रविवार01 फेब्रुवारी 2026 - संध्याकाळी 5.30 
पालक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी 
व्याख्यान
स्थळ - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क .
 विषय - गणितातील गंमती जंमती 
मार्गदर्शक - लक्ष्मण गोगावले ठिकाण 

π (पाय) च्या मूल्याशी संबंधित प्रदर्शन – त्यांनी π ची नेमकी किंमत म्हणून (17 - 8√3) असा दावा केला आहे आणि त्याची भौमितिक रचना व गणिती पुरावा दाखवून स्पष्ट केले.हे त्यांचे सर्वात चर्चिलेले काम आहे, मुख्य प्रवाहातील गणितज्ञ π ला transcendental मानतात.दैनंदिन जीवनातील गणित – स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उपयुक्त सोपी उदाहरणे आणि सूत्रे दाखवली. तारखे वरून हजार वर्षांतील वार त्यांनी झटक्यात काढून दाखवले.

• शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ 
कार्यशाळा
शनिवारी विज्ञानवारी फेज दोन
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काम्प्युटर टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांना शनिवारी विज्ञानवारी उपक्रमाच्या दुसऱ्या फेज बद्दल डॉ. विवेक शिळीमकर यांनी माहिती दिली. जुन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी अनुभव सांगून प्रात्यक्षिके दाखवली. विमलाबाई लुंकड विद्यालयात उपक्रम चालू केला. 

• सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ | दुपारी १२ ते १
वैज्ञानिक गप्पा
ठिकाण: अण्णासाहेब मगर कॉलेज, रसायनशास्त्र विभाग 
संचालक.- केदार, अशोक तातुगडे 
रसायनशास्त्र विषयाच्या सुमारे ३० मुलांसोबत वैज्ञानिक जाणीव याबाबत गप्पा झाल्या. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निकम सर यांच्यासोबत वैज्ञानिक जाणीव शिबिर बाबत प्लॅनिंग झाले. कॉलेजच्या सायन्स असोसिएशन मध्ये पुढील वर्षी मराठी विज्ञान परिषद मदत करेल. तसेच एनएसएस च्या मुलांसोबत पण पुढच्या वर्षी काम करेल. कॉलेजमधील कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अंतर्गत मराठी विज्ञान परिषद मुलांना कशी एंगेजमेंट देऊ शकते याबाबतही बोलणे झाले. 28 फेब्रुवारीला लागून  चार तासाचे वैज्ञानिक जाणीव शिबिर आयोजित केले आहे.

• रविवार, 15 फेब्रुवारी 2026 - 
विज्ञान रंजन स्पर्धा 2026 -अंतिम दिवस - 
उत्तरपत्रिका स्वीकार. 
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 30.. विज्ञान रंजन स्पर्धा 2026 ची प्रश्नावली सालाबादप्रमाणे विनय र. र. यांनी केली. त्यांना डॉ. विवेक शिळीमकर, दिव्या माळोदे, शीतल वाघोळे, राखी डहाळे, गणेश महाजन यांनी साथ दिली. ब्लॉगच्या माध्यमातून 8000+ लोकांनी प्रश्नावली पाहिली. 
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, या जिल्ह्यातील स्पर्धकांनी नोंदणी केली. प्राथमिक फेरीत 377 व्यक्तींनी सहभाग घेतला. त्यापैकी 62 व्यक्ती अंतिम फेरीसाठी निवडलल्या गेल्या. या स्पर्धेसाठी उत्तरपत्रिका तपासणी करण्याचे काम विद्यार्थी साहायक समितीच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी वेळेत करून दिले. या स्पर्धेची व्यवस्थापकीय जबाबदारी डॉ. विवेक शिळीमकर, संजय मालती कमलाकर आणि शशीताई भाटे यांनी घेतली. स्पर्धेच्या खर्चासाठी केलेल्या आवाहनाला अ. पां. देशपांडे, भारत सावळवाडे, जगदीश काबरा, डॉ. राजेश्वरी देशपांडे, बंकटलाल धूत, सुनील तांबे, लक्ष्मीकांत वरणगावकर, अब्दुल रहमान कमाल, वर्षा वाघ, रामचंद्र खळदकर, ललीत महातेकर, डॉ. गौरी भागवत यांनी प्रतिसाद दिला.

गुरुवार ते रविवार - 19 ते 22 फेब्रुवारी 2026 - 
नर्मदा जीवनशालांचा बालमेळा - विज्ञान कक्ष 
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गोपाळपूर या छोट्याशा आदिवासी गावात - पुनर्वसन वसाहतीत वेगळेच चैतन्य जाणवत होते. नर्मदा खोऱ्यातील नर्मदा नदीकाठच्या मणिबेली, डनेल, भादल, खाऱ्याभादल, सावऱ्या दिगर, भाबरी, थूवानी अशा वेगवेगळ्या जीवनशाळांमधून आलेल्या सुमारे 350 चिमुकल्या मुलामुलींचा वार्षिकोत्सव - बालमेळा होता. "जीवनशाला की क्या है बात? - लडाई पढाई साथ साथ!", "जीवनशाला मे सीखेंगे - आगे बढते जायेंगे।" आणि जल - जंगल - जमीन वाचवण्याच्या बालस्वरातल्या नाऱ्यांनी अवघा परिसर दुमदुमून गेला. आज शिवजयंतीही होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष ही निनादत होता. तिरंगी झेंड्यासह ' नर्मदा बचाओ - मानव बचाओ ' हा संदेश देणारे निळे झेंडे लक्ष वेधून घेत होते. गोपाळपूर पुनर्वसन वसाहतीच्या जिल्हा परिषद शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर झालेल्या या बालमेळामध्ये सर्व जीवनशाळांचे झेंडे रोवून बालमेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई, पुणे, धुळे, अकोला, झारखंड अशा विविध ठिकाणाहून समर्थक आले होते. आदिवासी क्रांतिकारक तंट्या भील यांच्या स्मृती जागवणारा, जल जंगल जमीन वाचवण्याचे आवाहन करणारा स्टॉल लक्ष वेधून घेत होता. त्याचप्रमाणे नर्मदा बचाओ आंदोलनाच्या चाळीस वर्षांचा प्रवास दर्शवणारे चित्र प्रदर्शन, विविध गमतीचे खेळ, आरोग्य तपासणी, मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वैज्ञानिक खेळ, अशा सर्व स्टॉल्सवर मुलांमुलींची झुंबड उडत होती. कागदाचा वापर करून विविध पक्षी, मासे, वस्तू, हेलिकॉप्टर बनवून त्यांची भिरभिरणारी वैज्ञानिक खेळणी बनवून खेळण्यात मुलामुलींना मजा येत होती. मेणबत्तीच्या वापरातून हवेचा दाब, प्लॅस्टिक मोजांच्या वापरातून स्थिर विद्युत, काड्या पेटी माध्यमातून खेळताना गती, जडत्व यांचे नियम अनुभवातून विद्यार्थी विद्यार्थिनींना जाणवत होते. रसायनशास्त्र समजण्यासाठी लिंबातून आरपार जाणारे रंगीत दोरे रंग बदलतात हे बघितले. संजय मा क आणि विनय र र यांनी मार्गदर्शन केले.

शनिवार. 21 फेब्रुवारी 2026, | संध्याकाळी 6.15 
सदीप व्याख्यान 
विषय - ग्रेट निकोबार द्वीप - उलथापालथीच्या कडेवर -
वक्ता - डॉ. पंकज सेखसरिया 
ठिकाण - एस. एम. जोशी फाउंडेशन चर्चासत्र सभागृह, नवी पेठ, पुणे 30 
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे उपाध्यक्ष विनय र. र. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यावरण शास्त्र हा विज्ञान विषय म्हणून निर्माण झाल्यामुळे आपली जाणीव विस्तृत झाली. त्या अंतर्गत विविध प्रकल्प आणि त्यांचे पर्यावरणीय परिणाम यांतून सामाजिक, आर्थिक प्रभावांची चर्चा घडवून आणली आहे. व्याख्यात्यांचा परीचय डॉ. अंजली साठे यांनी करून दिला. डॉ. पंकज सेखसरिया यांनी ग्रेट निकोबार द्वीपाच्या जैवविविधतेचे सौंदर्य आणि वर्तमान संकट सांगितले. हे द्वीप UNESCO जैवावरण संरक्षित आहे, ज्यात दुर्मीळ प्रजाती (निकोबार मॅकॉक, लेदरबॅक कासव) आणि प्राचीन वर्षावने आहेत. मुख्य संकट: ₹७२,०००+ कोटींचा मेगा-प्रकल्प (आंतरराष्ट्रीय पोर्ट, विमानतळ, टाउनशिप) – १६६ चौरस किमी क्षेत्र, ८ लाख+ झाडे नष्ट होणार. गलाथिया बे मधील लेदरबॅक कासवांच्या नेस्टिंग साइट धोक्यात. भूकंप-सुनामी जोखीम (रिंग ऑफ फायर). आदिवासी प्रभाव: शॉम्पेन (फक्त २००-३०० लोक) आणि निकोबारी जनजातींची भूमी, संस्कृती आणि अस्तित्व धोक्यात. सहमतीशिवाय प्रकल्प पुढे – कायद्याचे उल्लंघन. हा प्रकल्प "मेगा फॉली" आहे; शाश्वत पर्यटन आणि संरक्षण हा पर्याय. NGT मंजुरी असली तरी उल्लंघने आहेत. डॉ. सेखसरिया यांनी जनजागृती, याचिका आणि आंतरराष्ट्रीय दबावाची गरज सांगितली. कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण केली. हा प्रकल्प द्वीपाला "भारतीय सिंगापूर किंवा हाँगकाँग" बनवण्याच्या दाव्याने पुढे सरकवला जात आहे, पण वास्तवात तो पर्यावरणीय आपत्ती आहे. त्यांनी सरकारच्या "स्ट्रॅटेजिक आणि राष्ट्रीय महत्व" च्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आणि पर्याय सुचवले. विद्यार्थी, पर्यावरण कार्यकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिक असे ऐंशी लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम पर्यावरण जागृतीसाठी प्रेरणादायी ठरला, प्रेक्षकांना द्वीपाच्या संकटाची जाणीव झाली. सूत्रसंचालन अमोल झिरमिले यांनी केले.

बुधवार. 25 फेब्रुवारी 2026 - 
प्राथमिक फेरी निकाल - 
विज्ञान रंजन स्पर्धा 2026 उत्तर पत्रिका तपासून प्राथमिक फेरीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली 
https://mavipapunevibhag.blogspot.com/2025/12/2026.html 

गुरूवार - 26 फेब्रुवारी 2026, | स. 9.30 ते दु. 1.30 -
स्थळ - अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे २८
वैज्ञानिक जाणीव शिबिर
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि अण्णासाहेब मगर कॉलेज हडपसर आयोजित वैज्ञानिक जाणीव शिबिर कार्यक्रमाची प्रमुख सत्रे आणि मार्गदर्शक: 
1. चमत्कारामागील विज्ञान: श्री. भारत विठ्ठल. 
2. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण: केदार निर्मला.
3. मोबाईल व्यसनमुक्ती: किरण तारामती.
 मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे लतेश निकम सर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. चमत्कारामागील विज्ञान: प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून विज्ञानातील गंमत उलगडली. वैज्ञानिक दृष्टिकोन: विज्ञान केवळ प्रयोगशाळेत नसून दैनंदिन जीवनाचा भाग कसा आहे, हे अनुभवांतून मांडले. मोबाईल व्यसनमुक्ती: सोशल मीडियाचा मेंदूवर होणारा परिणाम आणि डेटाचा वापर यावर प्रभावी प्रकारे मांडणी झाली. "दैनंदिन जीवनातही विज्ञान आहे हे आज उमजले. खूप काही शिकायला मिळाले." - असे सुप्रिया वाघमारे यांनी सांगितले. "मोबाईलमुळे मेंदूचा विकास कसा खुंटतो हे समजले. ही माहिती मी इतरांपर्यंत नक्की पोहोचवेल." असे गणेश क्षीरसागरने सांगितले. पुढील पाऊल: कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात सायन्स असोसिएशन, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम' अंतर्गत विद्यार्थ्यांशी अधिक काळ संवाद कसा साधता येईल, यावरही सकारात्मक चर्चा झाली.

28 फेब्रुवारी 2026 - संध्याकाळी 6. 
व्याख्यान 
ठिकाण - महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता,  
 विषय - विश्वनिर्माण क्षणाचा - आदिम प्रकाश आणि आवाज
वक्ते - श्री. सुकल्प कारंजेकर.‌

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने विज्ञानदिन कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे - आदिम प्रकाश व आदिम आवाज, विश्वनिर्मितीचा क्षण.. याबाबत "आपलं विश्व आणि त्याची नवलकथा" या पुस्तकाचे लेखक श्री सुकल्प कारंजेकर यांचे व्याख्यान झाले. त्याचा गोषवारा :'आजच्या 28. 2.2026 या दिवशी 13.78 अब्ज वर्षांनंतर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ठिकाणी आपण जमले आहोत. अवकाशातील अनेक तारकाविश्वांमधील एका विश्वातील एका पृथ्वी या ग्रहावरील भारत या देशातील महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरातील अनेक ठिकाणावरून प्रवास करुन मसापमधे जमल्याब‌द्दल आपल्या सर्वांचे स्वागत..' कारंजेकरांनी अशा शब्दात कार्यक्रमाची सुरुवात केली. पृथ्वीचा स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याचा वेग व सूर्याचा व विश्वाचा फिरण्याचा वेग अशी मांडणी करून अशा अस्थिर गतिमान स्थितीत नागरिक आले म्हणून हे स्वागत करण्यात आले. 'Let there be Light' ही बायबलमधील गोष्ट त्याला असलेली विविध धर्माची मान्यता हे सांगून 100 वर्षांमागे काय झाले असा विषय मांडला. तेव्हा विश्वाविषयीची संकल्पना एकदम छोटीशी होती. आपल्या आकाशगंगेशिवाय अन्य विश्व असेल हा विषयही नव्हता. त्यानंतरच याबाबत बदल येण्यास सुरुवात झाली. आईनस्टाईन व एडविन हबल यांनी अनुक्रमे सापेक्षता सिद्धांत व विश्वाचा होत असलेला विस्तार या गोष्टी पुढे आणल्या. आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादामधून आपल्या विश्वाला लावल्यावर विश्व स्थिर नाही असं लक्षात येत होतं. मात्र सुरुवातीला आईनस्टाईन यांचा विश्व स्थिर आहे यावर विश्वास होता, म्हणून त्यांनी सापेक्षतावादाच्या सिद्धांतामध्ये बदल केला होता. एडविन हबल हे त्या काळातील सर्वात मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण करत होते. हबलच्या निरीक्षणांतून हे सिद्ध झाले की विश्वात आकाशगंगेसारखी इतर अनेक तारकाविश्वे आहेत आणि ती एकेमकांपासून दूर जात आहेत. हबल यांच्या निरीक्षणामुळे विश्व स्थिर नसून, विश्वाचा विस्तार होतो आहे हे सिद्ध झालं. आईनस्टाईन यांनी देखील याचा स्वीकार केला. यावरून पुढील अभ्यासात अवकाशाच्या पोकळीचे तापमान २.७ केल्विन किंवा -२७० सेल्सियस इतके असते. निरपेक्ष शून्य तापमान - २७३.१५ इतके असते. म्हणजे अवकाशाच्या पोकळीचे तापमान अंदाजे ३ केल्विनने जास्त असते. सेल्सिअस असे तापमान अवकाशाच्या पोकळीत आहे असे समजले. या पोकळीत हा प्रकाश व हे तापमान तिथे कुठून आले असे अभ्यासण्यात आले. दीर्घ अभ्यासाने असे समजले की हाच तो विश्वनिर्मितीवेळचा पहिला प्रकाश व तापमान आहे.
पदार्थाच्या 3 अवस्था व प्लाझ्‌मा अवस्था असा सूर्य आहे. त्याच्या बाहेरील बाजूस 5000° व आतमधे 1.5 कोटी सेल्सिअस तापमान असून तिथे फक्त वायू आहेत. एरवी अणूची जी रचना आहे ती या तापमानात नष्ट होऊन ते घटक स्वतंत्र फिरत राहतात व प्लाझ्माला धडकत राहतात. निर्माण झालेल्या तापमानानुसार ताऱ्यांच्या रंगांची निर्मिती जसे की खूप जास्त तापमानाचे तारे निळे पांढरे व जसजसे तापमान कमी तसतसा लाल रंग येत जातो. अशा प्रकारे सूर्य लाल रंगाचा बनला. विश्वाची प्लाझ्मा अवस्था सुरुवातीचे ३.८० लाख इतके वर्षे टिकली. त्यानंतर प्लाझ्मा थंड होऊन त्याचे हायड्रोजन वायूचे ढग बनले. त्यानंतर आतापर्यंतच्या काळात विश्वाचा ११०० पट विस्तार झालेला आहे. या विस्तारामुळे विश्वाचे तापमान ३००० केल्विन पासून २.७ केल्विन इतके उतरले, आणि सुरुवातीच्या काळात निघालेल्या दृश्य प्रकाशाची तरंगलांबी वाढून तो प्रकाश रेडियो तरंगलांबीच्या स्वरूपाचा झाला. 
आद्य विश्वाचा फोटो बघता त्यामधे पिवळ्यालाल रंगांचे हॉटस्पॉट तर निळ्याकाळ्या रंगांचे हॉटस्पॉट आढळून येतात. प्रकाश पदार्थ व गुरुत्वाकर्षण अशी या सर्वांची जोरदार रस्सीखेच चालते. तिथेच डार्क मॅटरही असते. व त्यामुळे ध्वनीतरंग उमटत राहतात. या तरंगांमधे हे हॉटस्पॉट बनत गेले. आवाज निर्माण होत राहिला व एक क्षण हा आवाज थांबला गोठला व त्याच क्षणावर जागेवर आज आपण जणू थबकून थांबलो आहोत.
पहिला प्रकाश हा रेडियो तरंगांच्या स्वरूपात आपल्या आजूबाजूला आजही आहे. टीव्हीवर खरखर दिसते, त्याचं एक कारण म्हणजे हा आद्य प्रकाश. विश्वाच्या सुरुवातीला निघालेले ध्वनितरंगांचे प्रतिबिंब आपल्याला अवकाशातील तारकाविश्वांच्या मोठ्या प्रमाणातील पॅटर्न मध्ये शोधता येते. जर विश्वाचा विस्तार ते त्याचे लहान रूप असा आलेख काढला तर लहान स्थितीत विश्व अत्यंत घनदाट स्वरूपाचे दिसून येते व येथेच big bang महास्फोट ही संकल्पना मूर्त रूपात येताना दिसते. पुराव्यादाखल न्यू जर्सी येथील रेडिओ तरंगांचा अभ्यास काय होता हे सांगितले. शोध घेत असताना सर्व दिशातून खरखर् असा जो आवाज समोर येत होता तेच रेडिओ तरंग असून सर्वत्र प्रकाश भरून आहे हे लक्षात आले.आपल्या सभोवती सततच हा जो पहिला प्रकाश निर्माण झाला होता तो असतो. आपण त्या किरणांमधेच असतो. याचे एक उदाहरण म्हणजे टीव्ही सेटवर जुन्या काळी जी खरखर् यायची ज्याला सामान्य भाषेत मुंग्या आल्या असे म्हटले जायचे ते काय आहे? तोच हा प्रकाश ध्वनीतरंगांच्या रूपात आपल्यापर्यंत पोचायचा. असे व अन्य अनेकविध मुद्दे अतिशय सहज सुलभ व प्रवाही भाषेत मांडण्यात आले व सर्व उपस्थितांपर्यंत ते नीट पोचले. श्रोत्यांच्या प्रश्नांचीही उत्तरादाखल नीट उकल करण्यात आली. 3000 केल्विन ते 3 केल्विन या कमी होत गेलेल्या तापमानात रेडिओ तरंगांमधे झालेले बदल ते आपण किती अस्थिर अनिश्चित स्थितीत आहोत ते सांगण्यात आले. आजच्या कृत्रिम बु‌द्धिमत्तेच्या काळात काय होईल व निर्माण होऊ शकणाऱ्या आकडेमोडीचा वेध अथवा ती समजणे सर्वात उच्च शास्त्रज्ञांनाही कसे अशक्य असू शकते हे बोलण्यात आले. श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात वक्त्यांचे आभार मानले व विज्ञानदिन उत्तम साजरा झाला. 
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि समारोप मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे उपाध्यक्ष विनय र. र. यांनी केला. वक्त्यांची ओळख डॉ. अंजली साठे यांनी करून दिली. आभार प्रदर्शन रेखा जोशी यांनी केले. सूत्रसंचालन अमोल झिरमिले यांनी केले. कार्यक्रमातस सुमारे ४० प्रेक्षक उपस्थित होते.

मार्च २०२६


• रविवार, 1 मार्च २०२६ |  सकाळी 10 - 
विज्ञान रंजन स्पर्धा 2026
 *अंतिम प्रयोग फेरी*
स्पिंथळ - पिपरी चिंचवड सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर समोर, चिंचवड. 

प्राथमिक फेरीत 107 हून अधिक गुण मिळवत अंतिम फेरीत निवड झालेल्या 62 स्पर्धकांचे स्वागत आणि नोंदणी करण्याचे काम शशीताई भाटे आणि मेघना परांजपे, उज्ज्वला नवलै यांनी केले. स्पर्धकांना नाश्ता, चहा, भोजनाची व्यवस्था निःशुल्क करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आलेल्या पालक, शिक्षक, सहकारी यांना सशुल्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. त्यांची व्यवस्था सुनील पोटे यांनी केली. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्पर्धकांना 150 मिनिटात 10 प्रयोग करायचे होते. त्याची माहिती विनय र. र. यांनी दिली. 
प्रयोगांची मांडणी त्याच आवारात संजय मा. क. यांनी केली. 
डॉ. विवेक शिळीमकर यांनी प्रयोग परिक्षकांना प्रयोगांच्या निरीक्षणावरून गुण कसे द्यायचे ते समजावून सांगितले. 

प्रयोग 1) छायाचित्र भावना  आणि इमोजी - पहिला प्रयोग जागेवरच सभागृहात करण्यात आल्या. मेंदू अभ्यासक, लेखिका आणि व्याख्यात्या डॉ. श्रुती पानसे यांनी मांडला. हा मानसशास्त्रीय प्रयोग होता. स्पर्धकांना पाच चित्रे दाखवली. त्या चित्रातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणत्या भावना आहेत ते त्यांनी ओळखून लिहावं, अशी सूचना दिली होती. तसेच त्या भावना व्यक्त करतील अशी इमोजी तयार करावी. याला १० गुण दिले होते. ते या प्रकारे दिले. एक गुण- भावना अचूक ओळखायला आणि दुसरा गुण योग्य इमोजी काढायला दिला. परिक्षणात सारखेपणा असावा म्हणून खेळाडूंचे फोटो दिले होते. आनंद, अभिमान, चीड, संताप, चूक झाल्याची भावना, उत्साह अशा अनेक भावना त्या चित्रांमधून व्यक्त होत होत्या. बहुतेक सर्व स्पर्धकांनी 1,2,3 आणि 5 क्रमांकाच्या भावना बरोबर ओळखल्या. 4 क्रमांकाची भावना ओळखण्यात काही जणांचा गोंधळ उडला. काही जणांनी भावना तर योग्य पद्धतीने ओळखल्याच, शिवाय  थोडं स्पष्टीकरण पण केलं होतं. काहींनी भावना ओळखल्या पण ईमोजी नीट काढता आले नाहीत. खूप छोटा ईमोजी असल्यामुळे ते नीट समजलं नाही, असंही झालं. ज्यांनी भावना अचूक ओळखल्या आणि व्यवस्थित ईमोजी काढले. अशांना पूर्ण मार्क दिले. असे डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले. हर्षिता सुदर्शन पाटील म्हणते की
प्रयोग खूप मजेशीर होता. बहुतेक स्पर्धकांनी चित्रांमधील भावना योग्य ओळखल्या. काही विद्यार्थ्यांनी Happy आणि Excited भावना ओळखण्यात थोडा गोंधळ केला. इमोजी काढताना विद्यार्थ्यांनी खूप उत्साह दाखवला. विद्यार्थ्यांना हा उपक्रम मजेदार आणि वेगळा वाटला.या कृतीमुळे त्यांची निरीक्षणशक्ती व भावनांची समज वाढली. परी‌क्षक: हर्षिता सुदर्शन पाटील.

प्रयोग २) एका डोळ्याची दृष्टी - मी घेतलेल्या “डोळा-हात समन्वय” या प्रयोगाबद्दल थोडक्यात सांगणार आहे. या प्रयोगात आम्ही मोठी पिन आणि लहान पिना वापरल्या. प्रथम दोन्ही डोळे उघडे ठेवून पिना अडकवल्या आणि वेळ नोंदवला. तेव्हा काम सोपे आणि जलद झाले. नंतर एक डोळा बंद करून तीच कृती केली. तेव्हा अंतर ओळखणे कठीण झाले, काही पिना खाली पडल्या आणि जास्त वेळ लागला. विद्यार्थ्यांना थोडी अडचण आणि गोंधळ जाणवला. या प्रयोगातून आम्हाला समजले की दोन्ही डोळे उघडे असताना आपण वस्तूचे अंतर अचूक ओळखू शकतो आणि काम सहज होते. त्यामुळे डोळे आणि हात यांचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद! परिक्षकं: समीक्षा माधव मोरतळे

प्रयोग 3) खेळ शक्यतांचा - हा प्रयोग एक काडीपेटीचा बॉक्स आणि एक गोट्यांनी भरलेल्या बॉक्सला टेबलच्या कडेवर ठेऊन टिचकी मारण्याचा होता. टिचकी मारल्यावर कोणत्या पृष्ठभागावर किती वेळा ते बॉक्स पडू शकतात याचा स्पर्धकांना अंदाज लावायचा होता. खूप सुंदर आणि सोप्पा प्रयोग होता. सर्व सहभागी स्पर्धक अतिशय उस्फुर्त होते. त्यांना प्रयोग करताना खूप छान वाटले आणि मलाही त्यांना मार्गदर्शन करायला खूप छान वाटले. धन्यवाद! परिक्षक: तनुश्री मंगेश सुरवसे.

प्रयोग 4) वाहण्याचा वेग - प्रयोग खूप मजेशीर होता. ५ प्रकार चे धान्य होते मोहरी, रवा, साबुदाणा,भगर,राजगिरा हे नरसाळ्यातून जायला किती वेळ लागला, हे नोंदून प्रत्त्येक धान्याला वेगवेगळा वेळ का लागला, याचा निष्कर्ष लिहायचा होता. सर्व स्पर्धकांना हा प्रयोग जास्त वेळ घेत होता म्हणून थोडा कठीण वाटला. तरीही मुलांनी हा प्रयोग खूप चांगल्या रितीने पार पाडला.एक नरसाळे घेऊन त्याला खालून कापूस लावून बंद करायचे. त्यात नरसाळे भरून मोहरी घालायची. नरसाळ्याखाली मोहरीचे भांडे ठेवायचे. कापूस काढून घेतला की मोहरी पूर्ण वाहून जायला किती वेळ लागतो ते मोजायचे. आपण वायू आणि द्रव यांना प्रवाही पदार्थ म्हणतो - फ्लुईड. घन पदार्थ ही काही स्थितीत प्रवाही होऊ शकतात आणि त्यांचा वेग मोजता येतो हे या प्रयोगावरून समजते. परिक्षक: ललिता प्रभाकर तेली

प्रयोग 5) कॅमेराच्या लेन्सचे कार्य ओळखणे‌. प्रयोग खूप सोपा होता यामध्ये आम्ही एक मोबाईल घेतला होता ज्याला 5 लेन्स होत्या. मुलांना त्या प्रत्येक लेन्स चे काम काय आहे किंवा ती लेन्स कशासाठी वापरतात हे ओळखायचे होते. हा प्रयोग आपण रोज वापरत असलेल्या गोष्टीचे किती निरीक्षण करतो या आधारावर बेतला होता. प्रयोग करताना विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मलाही हा प्रयोग खूप आवडला. धन्यवाद ! परिक्षक: आरती विलास साखरे .

प्रयोग 6) कूट भाषा - यी बाव खाराद इक्षे - एका कूट भाषेमध्ये या वाक्याचा अर्थ - मी फार कामात आहे - असा होतो. तर तुम्हाला दिलेली काही वाक्ये कूट भाषेमध्ये लिही. प्रयोग खूप मजेशीर होता. या प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांना मराठीतील वाक्य कूट भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे होते. आणि त्यांना त्या प्रश्नामध्येच एक मराठी भाषेचा ट्रान्सलेट कूट भाषेमध्ये करून दाखवलेलं होतं आणि ज्यांना ते लॉजिक समजलं त्यांना ती भाषा समजली पण ते खूप मजेशीर होतं ते सगळ्यांना सोपं वाटत होतं आणि मुलांनी त्यांचा खूप छान प्रतिसाद दिला.  धन्यवाद. परिक्षक: अनुजा दत्तात्रय हंगरगे

प्रयोग 7) रंग स्पर्श ज्ञान - प्रयोग खूप मजेशीर होता. एका खोक्याबाहेर १० कपड्यांचे तुकडे लावले होते.  खोक्यात अनेक रंग आणि पोताचे कापडाचे तुकडे ठेवले होते. बाहेर लावलेल्या कपड्यांचे texture check करुन त्याच texture चा कपडा खोक्यात हात घालून न बघता शोधणं जरा कठीण होते, पण व्यवस्थित check केले तर सोपे होते. हा प्रयोग स्पर्धकांना थोडा कठीण वाटला कारण सेम त्याच texture चा कपडा शोधन जरा कठीण होत, त्यांनी प्रयत्न केले पण कोणालाच 10 कपडे शोधता नाही आले . परिक्षक प्राची चिंचोलकर व अमृता शिवाजी कोळपकर

प्रयोग 8) ॲल्युमिनियम फॉइल वापरून प्रयोग निरीक्षणे व निष्कर्ष
1. CuSO4 द्रावण रासायनिक क्रिया झाली नाही. मीठ घातल्यानंतर द्रावण हिरवट झाले आणि ॲल्युमिनियमवर तांब्याचा लेप बसला.
2. HCl ॲल्युमिनियम च्या टोकाच्या बाजूने वायूचे बुडबुडे आले. हा वायू पेटताना फट आवाज आला.
3. HgCl2 थोड्या वेळाने गरम वाफा आल्या. राखाडी पूड बाहेर पडताना दिसत होती.
4. NaOH ॲल्युमिनियम च्या पृष्ठभागावरून वायूचे बुडबुडे आले. हा वायू पेटताना फट आवाज आला.
5. आयोडीनची पूड आणि ॲल्युमिनियमची पूड एकत्रित करून काही झाले नाही दोन तीन थेंब पाणी टाकल्यावर गरम होऊन जांभळ्या रंगाच्या वाफा आल्या. बहुतेकांनी निरीक्षण योग्य केले, फक्त बाहेर पडणाऱ्या वायुविषयी निरीक्षण करता आले नाही. परिक्षक - दिगंबर कट्यारे

प्रयोग 9) षटमानी संख्या - घनाकृती फाशावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ठिपके काढलेले असतात. 6 म्हणजे 0 धरून षटमानी संख्या तयार होतात. तीन फासे फेकून वर दिसणारे अंक एकापुढे एक लिही. षटमानी संख्या बनेल तिची दशमानी किंमत किती? आधी तुझा जन्मदिवस आणि जन्ममहिना षटमानात लिही. प्रयोग समजायला थोडासा किचकट पण खूप इंटरेस्टिंग होता.  यामध्ये जन्म दिनांक व फासे फेकून वर येणारे अंक षटमानी व दशमानी संख्येत ओळखायचे होते. स्पर्धकांना षटमानी व दशमानी संख्या समजण्यास वेळ लागला. गणित असल्यामुळे काही मुलांना ते खूप आवडलं आणि  काही मुलांना ते खूप कठीण गेलं . एकूण हा प्रयोग मजेशीर आणि खूप रंजक होता व मला यातून मुलांकडूनही काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या. परिक्षक समृद्धी श्रीकांत चौरे.

प्रयोग 10) वृक्षाच्या कब्जात किती CO2? परिसरातील एक वृक्ष निवड. या वृक्षाचा घेर C cm मध्ये जमीनीपासून 1.3 मीटर उंचीवर मोज. एक काठी घे. एक हात जमिनी समांतर कर. डोळ्यापासून हाताच्या मुठी पर्यंत लांबीची एक काठी हातात घे. काठी उभी धर.  वृक्षापासून अशा अंतरावर जा की काठीचे वरचे टोक आणि झाडाचा शेंडा एका रेषेत येईल. हे अंतर नोंदव d मीटर त्यात तुझी डोळ्यांपर्यंतची उंची मिळव h मीटर. वृक्षाची उंची मिळेल‌  m = d + h मीटर
पुढील सूत्र वापरून या वृक्षाने किती कर्ब वायू कब्जात घेतलेला आहे ते गणित करून काढ. 1) C ÷ 3.14 = व्यास. 2) वृक्षाचे जमिनीवरील वस्तुमान AGB (kg) ≈ ०.785 × व्यास² (cm) × उंची (m)  . 3) वृक्षाचे जमिनीखालील वस्तुमान  BGB = AGB (kg) * 0.2. 4) वृक्षाचे एकूण वस्तुमान TB = AGB + BGB. 5) वृक्षाचे शुष्क वस्तुमान DW = TB x 0.725. 6) वृक्षातील कर्ब CW = DW/2. 7) वृक्षाने कब्जात घेतलेला CO2 = CW x 3.67 . आज स्पर्धकांकडून “वृक्षाच्या कब्जात किती CO2 साठते?” हा छोटा प्रयोग करून घेतला. मुलांनी झाडाची उंची व घेर मोजून साध्या गणिताच्या सूत्राने प्रमाण काढले आणि त्यावरून समजून घेतले की यामुळे झाडे वातावरणातील CO₂ कमी करण्यात कशी मदत करतात हे त्यांना समजले. मुलांना प्रत्यक्ष मोजमाप करताना खूप मजा आली. उपक्रम ज्ञानवर्धक व आनंददायी ठरला. हा सर्व उपक्रम करताना मुलांना खूप आनंद झाला. मुले एकदम उत्साहाने सहभागी झाले. धन्यवाद. परिक्षक: रचना बन्सीराम दिवेकर

प्रत्येक प्रयोगाला 15 मिनिटे असा वेळ पुरेसा मिळाला त्यामुळे सर्वांचे सर्व प्रयोग पूर्ण झाले. त्यानंतर जेवणाची सुट्टी होती. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर प्रतिसादाचे सत्र होते. दरम्यान प्रयोग परिक्षेतील गुणांची मोजदाद करून निकाल तयार केला.

दुपारी जेवणानंतर स्पर्धकांच्या प्रतिक्रियांचे सत्र होते. यात काही स्पर्धकांनी आपल्याला कोणते प्रश्न आवडले त्याबद्दल सांगितले. विज्ञान रंजन स्पर्धा प्रश्नावली ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. हे प्रश्न दिसायला सोपे वाटतात पण करताना त्यातील आव्हाने लक्षात येतात. आवडलेल्या प्रश्नांमध्ये पुढील प्रश्न होते - झोपलेली व्यक्ती स्वप्न बघत आहे हे कोणत्या निरीक्षणांवरून समजते? स्वयंपाक घरातल्या कुठल्या 2 गोष्टी एकत्र केल्यावर स्ट्रॉबेरी सारखी चव होऊ शकेल? 7 नंबरची लेडीज चप्पल आणि 7 नंबरची जेण्टस चप्पल यांच्या लांबीत फरक किती? बेगम बहार च्या फुलाचा रंग कोणता असतो? फळ्यावर खडूने येणारा खर्रर आवाज नकोसा वाटतो या भावनेला काय म्हणतात? - हा प्रश्न एका शिक्षिका स्पर्धकांना खूप आवडला. कोणत्या शिखरावर उभं राहिल्यावर आपण माउंट एव्हरेस्टपेक्षा सुमारे 2 किमी आकाशाच्या जातो? - हा प्रश्न चुकीचा आहे असं आधी वाटलं पण नंतर उत्तर शोधल्यावर प्रश्नाची मजा वाटे. महाभारतातील कोणती पात्रे गणितात भेटतात? हा पण एक मजेशीर प्रश्न वाटला. एवढे नवे नवे प्रश्न तुम्हाला सुचतात कसे? हा आम्हाला मोठा प्रश्न पडतो असे एका स्पर्धक मुलीने विचारले. शिक्षकांच्या वतीने सांगलीचे भारत सावळवाडे सर बोलले की गेल्या पाच वर्षांपासून आमच्या शाळेतील मुलीचा प्रतिसाद सतत वाढत आहे.

परिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. उत्तरपत्रिका तपासताना झालेल्या गमती जमती सांगितल्य तसेच प्रयोग फेरीतील स्पर्धकांच्या कृत्याचे, निरीक्षण व निष्कर्षांचे विश्लेषण केले. यामध्ये रेखा जोशी, आरती साखरे, प्राची चिंचोलकर, डॉ. श्रुती पानसे, दिगंबर कट्यारे यांनी आपली मते मांडली. विनय र. र. यांनी सर्वांचा आढावा घेतला.

डायपर किती पाणी / मूत्र शोषतो? डायपरमधील SAP पूडीचे शोषणमूल्य शोधणे हा दिपाली अकोलकर यांनी सुचविलेला प्रयोग उशिरा आल्याने मुख्य स्पर्धेत सामील करता‌ आला नाही त्यामुळे त्याचे प्रात्यक्षिक काही स्पर्धकांना घेऊन करून दाखवले. पुडीच्या शेकडो पण पाणी ती शोषून घेते हे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.  अशा प्रकारे रोजच्या वापरातील किंवा सहजपणे उपलब्ध होऊ शकणाऱ्या वस्तूंचा वापर करून वैज्ञानिक प्रयोग कसे करता येतात याचे ofउदाहरण सर्वांसमोर मांडले. डायपरवर किती वयासाठी किंवा किती वजनाच्या व्यक्तींसाठी तो वापरावा अशी शिफारस केलेली असते त्याचे कारण काय? पाणी शेकडो पट शोषले जाते पण मूत्र तितके पट शोषले जाते का? असे पुढचे प्रश्न डोक्यात आले की पुढचे प्रयोग करायला मौका मिळतो.
या स्पर्धेत 37 शाळांमधून स्पर्धक मोठ्या प्रमाणात आले होते. त्यांच्या साठी दीपाली अकोलकर यांनी एक अनोखी भेट दिली. मेंदूचे घटक आणि त्यांची कार्ये शिकविताना उपयोगी पडेल अशी एक एक प्रिंटेड टोपी प्रत्येक शाळेला सप्रेम भेट दिली. त्याचा वापर कसा करायचा हे डोक्यावर टोप्या ठेवून दाखवले.

विज्ञान रंजन स्पर्धा 2026 *निकाल आणि पारितोषिक वितरण* 

अंतिम निकाल - विज्ञान रंजन स्पर्धा. 2026. बक्षिस विजेत्यांची नावे. प्रत्येक विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि पुस्तक बक्षीस देण्यात आले त्याशिवाय  रोख बक्षिसे
1) प्रथम क्रमांक रोख रुपये 5000/- मृण्मयी अरविंद चव्हाण - सांगली
2) द्वितीय क्रमांक रोख रुपये 3000/- श्रेयश संपत सुकाळे - दोंदे, पुणे,
3) तृतीय क्रमांक रोख रुपये 2000/- धनश्री गजानन माळी - कुपवाड , सांगली
४) चतुर्थ क्रमांक रोख रुपये 1000/- प्रत्येकी - 1. खुशी राजेश दोशी - फलटण, सातारा आणि 2. साक्षी सुभाष नाईकरे - कडूस
5) पाचवा क्रमांक रोख रुपये 500/- प्रत्येकी 1. मनस्वी बोंगाळे कुपवाड, सांगली, 2. राजवर्थिनी युवराज पाटील ऐनापूर, कोल्हापूर  3. अथर्व संतोष अभंग दोंदे, पुणे  4. नेहा सागर गुमते, चिंचवड   5. अनुजा बोऱ्हाडे , देहू गाव  6. दिव्या देवानंद भोंडवे - डोमरी, बीड  7. माही रमेश कलढोणे, म्हसवड, सातारा  8. श्रावणी दिपक रेवण्णा - कुपवाड, सांगली
प्राथमिक फेरीतील विजेत्या स्पर्धकांनी फेरी पूर्ण  केली त्यांना एक पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पारीतोषिके व प्रमाणपत्रे - विनय र. र., नंदकुमार कासार, डॉ. श्रद्धा खांपरीया, उज्ज्वला नवलै, शशी भाटे यांच्या हस्ते देण्यात आली.  या स्पर्धेसाठी सुमारे पाऊण लाख रुपये खर्च आला. या उपक्रमांसाठी आर्थिक मदत द्यायची आहे? 9422048967 या नंबर वर संपर्क साधावा. अथवा Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag या नावे बचत खाते क्रमांक 49010010077236, आय डी बी आय बँक सदाशिव पेठ पुणे-30. IFSC CODE-IBKL0000490 येथे NEFT ने पैसे जमा करू शकता.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अन्य उपक्रम पहाण्यासाठी क्लिक करा Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag Activities https://share.google/QN5CXgGNb1xIvEVkh 


• शुक्रवार - २० मार्च २०२६ | संध्याकाळी ६.१५
प्रात्यक्षिकासह व्याख्यान 
विषय - मोबाईलची चटक - कशी ओळखावी कशी सोडावी 
वक्ता - किरण तारामती 
"मोबाईलच्या अमर्याद वापरामुळे आपण आपल्या माणसांपासून, त्यांच्याशी असणाऱ्या नात्यापासून तुटत चाललो आहोत का? हे तपासण्याची वेळ आली आहे.आपल्याला जितक्या लवकर त्याची जाणीव होईल तितकं आपण अधिक जबाबदारीनें वागू शकू" असे उद्गार किरण तारामती यांनी काढले. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने आयोजित - मोबाईलची चटक - कशी ओळखावीकशी टाळावी - या विषयावरील प्रात्यक्षिकासह झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

मराठी विज्ञान परिषद व्याख्यानमालेमध्ये आज किरण तारामती यांनी अतिशय सुलभरीत्या व साध्या, सरळ, सोप्या मराठी भाषेमध्ये मोबाईलची चटक कशा पद्धतीने ओळखावी, त्याच्या जाणिवा व त्याचे व्यसन कसे मान्य करावे व त्या अनुषंगाने कोणकोणत्या साध्या, सरळ मार्गे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यामधून मार्ग कसा काढावा याबद्दल प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले. मोबाईलचा सुनियोजित योग्य वापर आपल्या शारीरिक - मानसिक आणि व्यवहारिक जडणघडणीमध्ये कसा फायदेशीर ठरेल हे किरण तारामती यांनी पटवून सांगितले.

• मोबाईलचा वापर आपण वैयक्तिक पातळीवरती किती करतो हे त्यांनी सेटिंग्स मध्ये जाऊन कसे तपासावे त्याचा विविध अंगी ॲप्स नुसार वर्गीकरण कसे आकलन करायचे हे त्यांनी दाखवले.
• सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेवढा वेळ स्क्रीन टाईम झाला असेल त्यापेक्षा दोन ते तीन तास जास्त झोप घेणे मेंदूच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे हे अधोरेखित केले . 
• त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे आपला मेंदू कसा सजगतिकडून बधिरतेकडे हळूहळू अकार्यक्षम होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले..
• तसेच त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलचा सुनियोजित वापर कसा करावा याचे सादरीकरण केले. 

पालकांनी प्रथम मोबाईल बाजूला ठेवावा त्यावर जाणारा वेळ कमी करावा . मुलांना मोबाईल व्यसनाधीन होण्यासाठी पालक पूर्णपणे जबाबदार आहेत. 
 झोपण्याच्या आधी वाचन करावे. आपल्या मित्रांबरोबर कुटुंबातील सदस्यांबरोबर संवाद करावा त्यांना प्रत्यक्ष भेटावे याने बऱ्याच मानसिक समस्या कमी होतात
१) मोबाईलचे नोटिफिकेशन बंद ठेवावे 
२) झोपताना मोबाईल रात्री उशीखाली घेऊन झोपू नये तो दूर ठेवावा 
३) सकाळचा गजर लावू नये त्यामुळे आपोआपच आपला वेळ थोडासा वाचतो . सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेणे त्यामुळे टळते
४) मोबाईल मधील ॲप्स बंद करून ब्राउझर द्वारे सोशल मीडिया अकाउंट प्रत्येकाने हँडल करावे, जेणेकरून आपल्या शारीरिक क्रियांमध्ये एक सजगता निर्माण होईल. 
६) मोबाईल रात्री शक्यतो करून ग्रेस स्केल वरती ठेवावा.
७) रात्री झोपण्याच्या आधी दोन तास मोबाईल बंद करावा बेड टाईम ॲप डाऊनलोड केल्यास ते उपयोगी ठरू शकते . 

श्रोत्यांमध्ये सर्व वयोगटातील स्त्री पुरुष मुले मुली होत्या शाळकरी मुले सुद्धा होती किरण तारामती यांनी संवादात्मक पद्धतीने मोबाईलच्या व्यसनाबद्दल त्याचे होणारे परिणाम याबद्दल अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले 
या सवयीपासून सुद्धा दूर राहण्यासाठी साधे सोपे उपाय सुचवले त्यांचा चिकित्सक व मार्मिक अभ्यास सहज पटणार होता. त्यांनी काही प्रात्यक्षिकद्वारे हे उपस्थित सर्व विज्ञानप्रेमी रसिक श्रोत्यांना पटवून दिले. 
मोबाईलचा अतिवापर मेंदूमध्ये 'डोपामाईन' नावाच्या रसायनाचा स्राव वाढवतो, ज्यामुळे तात्काळ आनंद मिळतो आणि मोबाईलचे व्यसन लागते. नोटिफिकेशन्स, लाईक्स आणि शॉर्ट व्हिडिओज यामुळे मेंदूला सतत उत्तेजना मिळते, परिणामी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणे, झोप न लागणे, ताण-तणाव आणि नैराश्य यांसारखे मानसिक परिणाम दिसू शकतात. समाजाला येत असलेले असे मानसिक अनुभव रंजक पद्धतीने सांगितले आणि लोकांनी‌ मार्मिक बोध घेतला. मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे हे एक स्तुत्य असे वैज्ञानिक पाऊलच म्हणावे लागेल..!
आज बालवर्ग, शालेय विद्यार्थी, तरुण युवक - युवती व ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते. 
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - 
- आजचा कार्यक्रम खुपच उद्बोधक आणि चांगला झाला. 
- आपल्याला मोबाईलचे व्यसन आहे आणि ते मान्य करणे योग्य आहे हे सर्वांना मनापासून पटले. 
- फक्त व्यसन आहे म्हणण्यापेक्षा त्याची लक्षणं सवयी आणि गुंतत जाणारी व्यक्ती ह्याची उकल केली आणि ठरवून बाहेर कसं पडायचं हेही पटवून दिले.  
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल झिरमिले यांनी केले. अंजली साठे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षस्थानी शशी ताई भाटे होत्या.

क्रमवक्ते / मार्गदर्शकप्रमुख विषय / कार्यक्रम

१. व्याख्याने / चर्चासत्रे → १६ कार्यक्रम
| क्र. | दिनांक | विषय / कार्यक्रम |
| 1 | १ एप्रिल | दिनदर्शिकाची कथा | हंसा पद्मनाभन
| 2 | १५ एप्रिल | जागतिक जल दिन (हिमनद्या वाचवा) | श्रीमती पूर्वा शिंदे सिंग
| 3 | १८ एप्रिल | सृजनशीलता कार्यशाळा | डॉ. प्रज्ञा कुलकर्णी
| 4 | १९ एप्रिल | नद्या, नदीकाठ आणि तटबंदी | श्रीमती प्राजक्ता महाजन
| 5 | २७ एप्रिल | विश्वाची बाल्यावस्था प्रा. अजित केंभावी | (वर्धापन दिन) प्रातिनिधिक सहभाग
| 6 | १ मे | आहार हेच औषध | रो. आनंद कुलकर्णी
| 7 | १६ मे | ऑप्टिक्सचे भवितव्य काय? | डॉ. एकता घाटे
| 8 | १ जून | जलसंधारण आणि शाश्वत विकास | पद्मश्री पोपटराव पवार
| 9 | २० जून | शाश्वत जीवनशैली | प्रा. डॉ. समीर शास्त्री
| 10| २१ जून | अयनदिन आणि हवामान बदल | डॉ. विवेक शिळीमकर
| 11 | १ जुलै | कहाणी गंगेची | डॉ. राधिका मुळे
| 12 | १८ जुलै | बागेतील तणांचा उपयोग | डॉ. शिरीष आंबेगावकर
| 13 | १९ जुलै | नारळीकर सरांसोबतच्या आठवणी | श्रीमती कल्याणी गाडगीळ
| 14 | १ ऑगस्ट | नदी – ज्ञान विज्ञान | डॉ. विश्वास येवले
| 15 | १ सप्टेंबर | मोबाईल व्यसनमुक्ती | श्री. तुषार रंजनकर
| 16 | १९ सप्टेंबर | मानसिक आजार दडवा कशाला? | श्री. समीर शिपुरकर
| 17 | २६ सप्टेंबर | अभिनवता आणि नवसृजन | पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी

२. विज्ञान कथाकथन / साहित्यिक कार्यक्रम → १२ कार्यक्रम
(राष्ट्रीय मराठी विज्ञान कथा दिन – १९ जुलै – ११ ठिकाणी + १ स्वतंत्र)
| क्र. | दिनांक / ठिकाण |
| 1 | १९ जुलै – सरहद स्कूल, कात्रज | डॉ. सुनीता बागवडे
| 2 | १९ जुलै – सरहद स्कूल, धनकवडी | डॉ. विद्याधर बोरकर
| 3 | १९ जुलै – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था | श्री. विनय र. र.
| 4 | १९ जुलै – एशियन कॉलेज, धायरी | श्री. अमोल झिरमिले
| 5 | १९ जुलै – भावार्थ, कोथरूड | श्री. प्रसन्न करंदीकर
| 6 | १९ जुलै – न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग | प्रसन्न करंदीकर
| 7 | १९ जुलै – सिल्वर ब्रेस्ट स्कूल | श्री. प्रसन्न करंदीकर
| 8 | १९ जुलै – मॉडर्न महाविद्यालय | श्री. प्रसन्न करंदीकर
| 9 | १९ जुलै – फर्ग्युसन महाविद्यालय | श्री. प्रसन्न करंदीकर
| 10 | १९ जुलै – गरवारे महाविद्यालय | श्री. प्रसन्न करंदीकर
| 11 |  ४ जून – श्रद्धांजली सभा (डॉ. जयंत नारळीकर) |

३. कार्यशाळा / प्रयोग सत्रे / विज्ञानवारी → ७ कार्यक्रम
| क्र. | दिनांक | कार्यक्रम |
| 1 | १८ एप्रिल | सृजनशीलता कार्यशाळा |
| 2 | १९-२४ मे | बालमेळा (रद्द) → मोजले नाही |
| 3 | २ ऑगस्ट | विज्ञान प्रयोग कार्यशाळा (२४० विद्यार्थी) |
| 4 | १२ सप्टेंबर | शनिवारी विज्ञानवारी – पृष्ठीय ताण |
| 5 | १३ सप्टेंबर | शनिवारी विज्ञानवारी – घनता |
| 6 | २० सप्टेंबर | शनिवारी विज्ञानवारी – नैसर्गिक निर्देशक |
| 7 | १९-२० जुलै | शनिवारी विज्ञानवारी - प्रशिक्षण (सोलापूर) |
एकूण: ६ (बालमेळा रद्द असल्याने वगळला)

४. स्पर्धा / प्रदर्शन → ३ कार्यक्रम
| क्र. | दिनांक | कार्यक्रम |
| 1 | १५ एप्रिल | पोस्टर प्रदर्शन (जल दिन) |
| 2 | १२-२९ ऑगस्ट | आंतरशालेय पोस्टर स्पर्धा (मोबाईल व्यसन) |
किमान ५५ ठिकाणी झालेली पोस्टर प्रदर्शने सुमारे २० हजार प्रेक्षकांनी पाहिली.
| 3 | १०-११ सप्टेंबर | विज्ञान एकांकिका स्पर्धा (पहिली फेरी) |

५. शिबिरे / सहल / वृक्षारोपण → ३ कार्यक्रम
| क्र. | दिनांक | कार्यक्रम |
| 1 | २० जुलै | वर्षा सहल + वृक्षारोपण (देहू) |
| 2 | १४ सप्टेंबर | वैज्ञानिक जाणिवा विकास शिबिर (~६० विद्यार्थी) |
| 3 | १९-२० जुलै | शनिवारी विज्ञानवारी प्रशिक्षण शिबिर (सोलापूर) |

६. विशेष दिवस / वर्धापन / भेट → ४ कार्यक्रम
| क्र. | दिनांक | कार्यक्रम |
| 1 | २७ एप्रिल | ६९ वा वर्धापन दिन |
| 2 | ७ जुलै | शालेय शिक्षण समिती भेट |
| 3 | १९ जुलै | नारळीकर जन्मदिन विशेष |
| 4 | १ ऑक्टोबर | कापूस ते कापड प्रात्यक्षिक (अहवालाबाहेर, पण नमूद) |

एकूण कार्यक्रम प्रकार व संख्या (एप्रिल ते सप्टेंबर २०२५)
| प्रकार | संख्या |
| व्याख्याने / चर्चासत्रे | १७ |
| विज्ञान कथाकथन | १२ |
| कार्यशाळा | २ |ज्ञस सस
| स्पर्धा / प्रदर्शन | ३ |
| शिबिरे / सहल / वृक्षारोपण | ३ |
| विशेष दिवस / भेट | ५ |
| शनिवारी विज्ञानवारी | ६ |

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
कार्यक्रम अहवाल : एप्रिल ते सप्टेंबर २०२५
एकूण कार्यक्रम: ४८
सारांश चार्ट
व्याख्याने       ████████████████ 17
कथाकथन     ████████████ 12
विज्ञानवारी    ██████ 6
स्पर्धा           ███ 3
शिबिरे/सहल  ██ 5
विशेष दिवस  ███ 5




No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्याला लवकरच संपर्क केला जाईल.